नीतिवचनं
४ माझ्या मुलांनो, एका पित्याचं हे मार्गदर्शन* मन लावून ऐका;+
त्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजशक्ती मिळेल.
४ ते मला शिकवायचे आणि म्हणायचे: “माझे शब्द मनात जपून ठेव.+
माझ्या आज्ञा पाळ, म्हणजे तुझं आयुष्य वाढेल.+
५ बुद्धी मिळव, समजशक्ती मिळव.+
मी सांगितलेल्या गोष्टी कधीच विसरू नकोस, त्यांपासून भरकटू नकोस.
६ तिला* कधीही सोडू नकोस म्हणजे ती तुझं रक्षण करेल.
तिच्यावर प्रेम कर म्हणजे ती तुला सांभाळेल.
७ बुद्धीच सर्वात महत्त्वाची* आहे,+ म्हणून बुद्धी मिळव
आणि जे काही मिळवशील, त्यासोबत समजशक्तीही मिळव.+
८ तिला खूप मौल्यवान समज, म्हणजे ती तुझा सन्मान करेल.+
तू तिला जवळ केल्यामुळे ती तुझा गौरव करेल.+
९ ती तुझ्या डोक्यावर फुलांचा सुरेख मुकुट ठेवेल;
ती सुंदर मुकुटाने तुला सजवेल.”
१२ चालताना तुझ्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही
आणि तू धावशील तेव्हा तू अडखळणार नाहीस.
१३ ताडनाला* धरून ठेव, ते सोडू नकोस.+
त्याचं रक्षण कर, कारण तेच तुझं जीवन आहे.+
१५ त्यावर जाऊ नकोस, त्याचा तिरस्कार कर.+
त्यापासून वळ, त्याच्या जवळही जाऊ नकोस.+
१६ कारण काही वाईट केल्याशिवाय दुष्टांना झोप लागत नाही.
कोणाचं नुकसान केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.
१७ ते दुष्टपणाच्या भाकरीने आपलं पोट भरतात;
ते हिंसेचा द्राक्षारस पितात.
१८ पण, नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो;
दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्या उजेडासारखा तो असतो.+
१९ दुष्टांच्या मार्गावर अंधार असतो;
आपण कशामुळे अडखळलो हेही त्यांना कळत नाही.
२० माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष दे;
मी सांगितलेल्या गोष्टी मनापासून ऐक.*
२१ त्या नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेव;
त्या आपल्या मनात अगदी खोलवर साठवून ठेव.+
२२ कारण त्यांचा स्वीकार करणाऱ्यांना जीवन मिळतं+
आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य मिळतं.
२३ ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर,+
कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात.
२५ तू नेहमी पुढे पाहत राहा;
तुझी नजर नेहमी समोर खिळवून ठेव.+
२७ डावीकडे किंवा उजवीकडे वळू नकोस.+
वाईट मार्गापासून दूर राहा.