होशेय
४ इस्राएली लोकांनो, यहोवाचा संदेश ऐका,
देशाच्या रहिवाशांविरुद्ध यहोवाचा खटला आहे,+
कारण देशात सत्य, एकनिष्ठ प्रेम किंवा देवाबद्दलचं ज्ञान नाही.+
२ खोट्या शपथा घेणं, खोटं बोलणं,+ हत्या करणं,+
चोरी आणि व्यभिचार+ सगळीकडे होत आहे,
हत्येमागून हत्या होत आहे.+
३ म्हणून हा देश शोक करेल;+
त्यातला प्रत्येक रहिवासी अशक्त होत जाईल.
रानातले पशू, आकाशातले पक्षी,
आणि समुद्रातले मासेही नष्ट होतील.
४ “म्हणून कोणीही दुसऱ्याचा विरोध करू नये किंवा दोष दाखवू नये,+
कारण याजकाचा विरोध करणाऱ्या लोकांसारखे तुझे लोक झाले आहेत.+
५ म्हणून तू भरदिवसा अडखळशील,
आणि रात्र असल्याप्रमाणे, संदेष्टा तुझ्यासोबत अडखळेल.
आणि मी तुझ्या आईचा आवाज बंद करीन.*
६ मी माझ्या लोकांचा आवाज बंद करीन,*
कारण त्यांना माझी ओळख नाही.
त्यांनी मला नाकारल्यामुळे,+
मीही त्यांना नाकारीन आणि माझे याजक म्हणून सेवा करू देणार नाही.
७ त्यांची संख्या जितकी वाढली, तितकंच जास्त त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केलं.+
मी त्यांचा गौरव अपमानात बदलून टाकीन.*
८ माझ्या लोकांच्या पापांवर ते आपलं पोट भरतात,
त्यांच्या अपराधांसाठी ते हपापले आहेत.*
९ लोकांशी आणि याजकांशी मी एकसारखाच व्यवहार करीन;
त्यांच्या वागणुकीबद्दल मी त्यांच्याकडून हिशोब मागीन,
आणि त्यांच्या कृत्यांचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन.+
१० ते खातील पण तृप्त होणार नाहीत.+
ते व्यभिचार करतील,* पण त्यांची संख्या वाढणार नाही.+
कारण त्यांनी यहोवाचा अनादर केला आहे.
१२ माझे लोक आपल्या लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात,
त्यांची काठी* सांगेल तसं ते वागतात;
कारण व्यभिचारी* वृत्तीमुळे ते भरकटले आहेत,
आणि व्यभिचार* करून ते आपल्या देवाच्या अधीन राहायला नकार देतात.
१३ ते पर्वतांच्या माथ्यांवर बलिदानं देतात,+
आणि टेकड्यांवर हवन करतात.
अल्लोन* आणि लिवने* वृक्षांखाली आणि प्रत्येक मोठ्या झाडाखाली ते बलिदानं देतात,+
कारण या झाडांखाली चांगली सावली असते.
म्हणून तुमच्या मुली वेश्येसारखी कामं* करतात
आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.
१४ मी तुमच्या मुलींना वेश्यांसारखं वागल्याबद्दल,*
आणि तुमच्या सुनांना व्यभिचार केल्याबद्दल जबाबदार धरणार नाही.
कारण पुरुष वेश्यांसोबत जातात
आणि मंदिरातल्या वेश्यांसोबत बलिदानं देतात.
समजबुद्धी नसलेल्या या लोकांचा+ नाश होईल.
१६ एखाद्या हट्टी गायीसारखा इस्राएल हट्टी झाला आहे.+
कोकऱ्याला मोकळ्या कुरणात* चरायला नेतात, तसं आता यहोवा त्याला चरायला नेईल का?
१७ एफ्राईम मूर्तींच्या नादी लागला आहे.+
त्याला सोडून द्या!
त्याच्या शासकांना* नीच कामं आवडतात.+
१९ वारा त्याला आपल्या पंखांत लपेटून टाकेल,*
त्याच्या बलिदानांमुळे त्याची लाजिरवाणी स्थिती होईल.