स्तोत्र
चढणीचं गीत.
१२६ सीयोनमधून नेलेल्या बंदिवानांना यहोवाने परत आणलं,+
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत आहोत असं आम्हाला वाटलं.
२ त्या वेळी आम्ही आनंदाने हसून
जल्लोष करू लागलो.+
इतर राष्ट्रांतले लोक एकमेकांना म्हणाले:
“यहोवाने त्यांच्यासाठी अद्भुत कार्यं केली आहेत.”+
३ यहोवाने आपल्यासाठी अद्भुत कार्यं केली आहेत.+
त्यामुळे आपल्या आनंदाला सीमा राहिली नाही.
४ हे यहोवा, नेगेबच्या झऱ्यांसारखं,
आम्हाला बंदिवासातून परत आण.
५ जे अश्रू गाळत पेरणी करतात
ते आनंदाने कापणी करतील.