नीतिवचनं
२९ बरंच ताडन दिल्यावरही जो माणूस आपला हट्ट सोडत नाही,+
तो अचानक असा चिरडला जाईल, की पुन्हा कधीच उठणार नाही.+
२ नीतिमान पुष्कळ असतात, तेव्हा लोक जल्लोष करतात;
पण दुष्ट सत्ता चालवतो, तेव्हा ते कण्हू लागतात.+
३ जो बुद्धीवर प्रेम करतो, त्याच्या वडिलांना त्याच्यामुळे आनंद होतो,+
पण जो वेश्यांची संगत धरतो, तो आपली संपत्ती उधळून टाकतो.+
४ न्यायामुळे राजा देशात शांती आणतो,+
पण लाच घेणारा माणूस देशाचा नाश करतो.
५ शेजाऱ्याची खोटी स्तुती करणारा,
त्याच्या पायांसाठी जाळं पसरवतो.+
९ बुद्धिमान माणसाने मूर्खाशी वाद घातला,
तर आरडाओरड आणि थट्टा होईल, पण तोडगा निघणार नाही.+
११ मूर्ख माणूस आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतो,+
पण बुद्धिमान माणूस त्यांवर नियंत्रण ठेवून शांत राहतो.+
१२ जेव्हा एखादा शासक खोट्या गोष्टींकडे लक्ष देतो,
तेव्हा त्याचे सर्व सेवक दुष्ट होतात.+
१३ गरीब माणूस आणि अत्याचार करणारा यांच्यात एक गोष्ट सारखी आहे:*
दोघांच्याही डोळ्यांना यहोवाच प्रकाश देतो.*
१५ काठी* आणि ताडन यांमुळे बुद्धी मिळते,+
पण मोकाट सोडलेला मुलगा, आपल्या आईला शरमेने खाली पाहायला लावतो.
१६ दुष्ट वाढले की अपराधही वाढतात,
पण नीतिमान त्यांचा नाश होताना पाहतील.+
१९ सेवक शब्दांनी सुधरत नाही,
कारण त्याला कळतं, तरी तो आज्ञा पाळत नाही.+
२० बोलण्याची घाई करणारा माणूस तू पाहिला आहेस का?+
त्याच्यापेक्षा मूर्खाला जास्त आशा आहे.+
२१ सेवकाला लहानपणापासून लाडवलंस,
तर नंतर तो तुझे उपकार विसरून जाईल.