नीतिवचनं
२ तुझ्या स्वतःच्या तोंडाने नाही, तर दुसऱ्याने* तुझी प्रशंसा करावी;
तुझ्या ओठांनी नाही, तर इतरांच्या* ओठांनी तुझी स्तुती करावी.+
३ दगड आणि वाळू दोन्ही वजनदार असतात,
पण मूर्खामुळे होणारा मनस्ताप त्यांच्यापेक्षाही जड असतो.+
५ मनात लपवलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे दिलेलं ताडन बरं!+
७ ज्याचं पोट भरलेलं असतं, तो पोळ्यातल्या मधालाही नको म्हणतो,*
पण जो भुकेला असतो, त्याला कडू पदार्थही गोड लागतो.
८ स्वतःचं घर सोडून भटकणारा माणूस,
आपल्या घरट्यातून उडून जाणाऱ्या पक्ष्यासारखा असतो.
९ तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो,
तसाच प्रामाणिक* सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.+
१० तुझ्या मित्राला किंवा तुझ्या वडिलांच्या मित्राला सोडून देऊ नकोस
आणि संकटाच्या दिवशी आपल्या भावाच्या घरी पाऊल ठेवू नकोस;
दूर राहणाऱ्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा!+
११ माझ्या मुला, सुज्ञपणे* वाग म्हणजे मला मनापासून आनंद होईल+
आणि मला टोमणे मारणाऱ्याला मी उत्तर देऊ शकेन.+
१३ जर कोणी अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याचं वस्त्र घे;
त्याने वाईट चालीच्या स्त्रीचं* कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याच्याकडून तारण जप्त कर.+
१४ कोणी पहाटे उठून मोठ्या आवाजाने आपल्या मित्राला आशीर्वाद दिला,
तर तो आशीर्वादही शाप समजला जाईल.
१५ भांडखोर* बायको पावसाच्या दिवसांत सतत गळणाऱ्या छतासारखी असते.+
१६ जो तिला आवरू शकतो तो वाऱ्याला आवरू शकेल
आणि आपल्या उजव्या हाताने तेल पकडू शकेल.
१८ जो अंजिराच्या झाडाची काळजी घेतो, तो त्याचं फळ खाईल+
आणि जो आपल्या मालकाची काळजी घेतो, त्याचा सन्मान केला जाईल.+
१९ पाण्यात चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं,
तसं एका माणसाच्या मनात दुसऱ्याच्या मनाचं प्रतिबिंब दिसतं.
२१ सोनंचांदी शुद्ध करण्यासाठी जसं आगीत टाकतात,+
तशीच माणसाची परीक्षा त्याला मिळणाऱ्या प्रशंसेमुळे होते.
२२ अक्कलशून्य माणसाला धान्यासारखं
उखळात घालून मुसळाने कुटलं,
तरी त्याचा मूर्खपणा जात नाही.
२३ तुला आपल्या कळपाची पूर्ण माहिती असली पाहिजे.
आपल्या मेंढरांची चांगली काळजी घे.*+
२५ हिरवं गवत सुकून, पुन्हा कोवळं गवत उगवतं
आणि डोंगरांवरून हिरवळ कापून गोळा केली जाते.
२६ कोकरांमुळे तुला वस्त्रं मिळतात
आणि बकरे विकून तुला शेत घेता येईल.
२७ तुझ्याकडे बकऱ्यांचं इतकं दूध असेल,
की तू आणि तुझ्या कुटुंबातले सर्व जण तृप्त होतील,
तसंच, तुझ्या दासींचंही पोषण होईल.