वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • शुद्ध आणि अशुद्ध प्राणी (१-४७)

लेवीय ११:२

तळटीपा

  • *

    किंवा “पृथ्वीवर.”

समासातील संदर्भ

  • +अनु १४:४-६; यहे ४:१४

लेवीय ११:४

समासातील संदर्भ

  • +अनु १४:७, ८

लेवीय ११:५

तळटीपा

  • *

    खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.

समासातील संदर्भ

  • +नीत ३०:२६

लेवीय ११:७

समासातील संदर्भ

  • +यश ६५:४; ६६:३, १७

लेवीय ११:८

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०२०, पृ. १

लेवीय ११:९

समासातील संदर्भ

  • +अनु १४:९, १०

लेवीय ११:११

समासातील संदर्भ

  • +अनु १४:३

लेवीय ११:१३

तळटीपा

  • *

    किंवा “कैकर.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३९:२७, ३०
  • +अनु १४:१२-१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. २-३

लेवीय ११:१६

तळटीपा

  • *

    एक समुद्री पक्षी.

लेवीय ११:१७

तळटीपा

  • *

    किंवा “छोटं घुबड.”

  • *

    पाण्यात सूर मारून मासे पकडणारा एक पक्षी. याच्या पायांची बोटं त्वचेच्या पडद्यांनी जोडलेली असतात.

लेवीय ११:१९

तळटीपा

  • *

    सुतार पक्ष्यासारखा दिसणारा एक पक्षी.

लेवीय ११:२०

तळटीपा

  • *

    किंवा “प्रत्येक किडा.”

लेवीय ११:२२

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:४; मार्क १:६

लेवीय ११:२४

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:४६, ४७; १५:८; १७:१५; २२:४-६

लेवीय ११:२५

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:२, ८; १५:२, ५; गण १९:१०

लेवीय ११:२६

समासातील संदर्भ

  • +अनु १४:७, ८

लेवीय ११:२८

समासातील संदर्भ

  • +लेवी १७:१५, १६
  • +लेवी ५:२

लेवीय ११:२९

समासातील संदर्भ

  • +यश ६६:१७

लेवीय ११:३१

समासातील संदर्भ

  • +अनु १४:१९
  • +लेवी ११:२४; २२:४, ५

लेवीय ११:३३

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:१२

लेवीय ११:३९

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:२३, २४; गण १९:११, १६

लेवीय ११:४०

समासातील संदर्भ

  • +लेवी १७:१५; २२:३, ८; अनु १४:२१; यहे ४:१४; ४४:३१

लेवीय ११:४१

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:२१

लेवीय ११:४२

समासातील संदर्भ

  • +अनु १४:३

लेवीय ११:४३

तळटीपा

  • *

    किंवा “तुमचा जीव घृणास्पद होऊ देऊ नका.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२५

लेवीय ११:४४

तळटीपा

  • *

    किंवा “तुमच्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२
  • +निर्ग १९:६; लेवी १९:२; अनु १४:२; १थेस ४:७
  • +१पेत्र १:१५, १६; प्रक ४:८

लेवीय ११:४५

तळटीपा

  • *

    किंवा “मिसर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:७; २९:४६; होशे ११:१
  • +निर्ग २२:३१; गण १५:४०; अनु ७:६
  • +लेवी २०:७, २६; यहो २४:१९; १शमु २:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २३

लेवीय ११:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. २-३

लेवीय ११:४७

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२५; यहे ४४:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. २-३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. ११:२अनु १४:४-६; यहे ४:१४
लेवी. ११:४अनु १४:७, ८
लेवी. ११:५नीत ३०:२६
लेवी. ११:७यश ६५:४; ६६:३, १७
लेवी. ११:८प्रेका १०:१४
लेवी. ११:९अनु १४:९, १०
लेवी. ११:११अनु १४:३
लेवी. ११:१३ईयो ३९:२७, ३०
लेवी. ११:१३अनु १४:१२-१९
लेवी. ११:२२मत्त ३:४; मार्क १:६
लेवी. ११:२४लेवी १४:४६, ४७; १५:८; १७:१५; २२:४-६
लेवी. ११:२५लेवी १४:२, ८; १५:२, ५; गण १९:१०
लेवी. ११:२६अनु १४:७, ८
लेवी. ११:२८लेवी १७:१५, १६
लेवी. ११:२८लेवी ५:२
लेवी. ११:२९यश ६६:१७
लेवी. ११:३१अनु १४:१९
लेवी. ११:३१लेवी ११:२४; २२:४, ५
लेवी. ११:३३लेवी १५:१२
लेवी. ११:३९लेवी ११:२३, २४; गण १९:११, १६
लेवी. ११:४०लेवी १७:१५; २२:३, ८; अनु १४:२१; यहे ४:१४; ४४:३१
लेवी. ११:४१लेवी ११:२१
लेवी. ११:४२अनु १४:३
लेवी. ११:४३लेवी २०:२५
लेवी. ११:४४निर्ग २०:२
लेवी. ११:४४निर्ग १९:६; लेवी १९:२; अनु १४:२; १थेस ४:७
लेवी. ११:४४१पेत्र १:१५, १६; प्रक ४:८
लेवी. ११:४५निर्ग ६:७; २९:४६; होशे ११:१
लेवी. ११:४५निर्ग २२:३१; गण १५:४०; अनु ७:६
लेवी. ११:४५लेवी २०:७, २६; यहो २४:१९; १शमु २:२
लेवी. ११:४७लेवी २०:२५; यहे ४४:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय ११:१-४७

लेवीय

११ मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांगा, ‘जमिनीवर* राहणाऱ्‍या जीवजंतूंपैकी तुम्ही हे खाऊ शकता:+ ३ ज्याचे खूर दुभागलेले आहेत आणि जो रवंथ करतो असा प्रत्येक प्राणी तुम्ही खाऊ शकता.

४ पण जे फक्‍त रवंथ करतात किंवा ज्यांचे फक्‍त खूर दुभागलेले आहेत, त्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ नका: उंट, कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.+ ५ तसंच बिजू,*+ कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ६ त्याच प्रकारे ससा, कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ७ त्याचप्रमाणे डुक्कर,+ कारण त्याचे खूर दुभागलेले असतात, पण ते रवंथ करत नाही. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ८ तुम्ही त्यांच्यापैकी कोणाचंही मांस खाऊ नका किंवा त्यांच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करू नका. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.+

९ पाण्यातल्या जीवजंतूंपैकी तुम्ही हे खाऊ शकता: ज्यांना पंख आणि खवले आहेत, मग ते जीव समुद्रातले असोत किंवा नदीतले, तुम्ही ते खाऊ शकता.+ १० पण नदी किंवा समुद्रात राहणाऱ्‍या जीवजंतूंपैकी, ज्यांना पंख आणि खवले नाहीत, असे प्राणी तुमच्यासाठी घृणास्पद आहेत, मग ते घोळक्यांत राहणारे असोत किंवा इतर कोणतेही जीवजंतू असोत. ११ खरोखरंच, तुम्ही त्यांना घृणास्पद समजलं पाहिजे. त्यांचं मांस खाऊ नका+ आणि अशा मेलेल्या जीवजंतूंची तुम्हाला घृणा वाटली पाहिजे. १२ ज्याला पंख आणि खवले नाहीत, असा पाण्यात राहणारा प्रत्येक जीव तुमच्यासाठी घृणास्पद आहे.

१३ उडणाऱ्‍या जीवजंतूंपैकी हे तुमच्यासाठी घृणास्पद आहेत आणि त्यांचं मांस तुम्ही खाऊ नये: गरुड,+ काळं गिधाड,+ मासेमारी घार,* १४ लाल घार आणि सर्व प्रकारच्या काळ्या घारी, १५ सर्व प्रकारचे कावळे, १६ शहामृग, घुबड, कुरव,* सर्व प्रकारचे ससाणे, १७ पिंगळा,* करढोक,* लांब कानांचं घुबड, १८ हंस, पाणकोळी, गिधाड, १९ करकोचा, सर्व प्रकारचे बगळे, हुदहुद* आणि वटवाघूळ. २० पंख असलेला व घोळक्यांत राहणारा चार पायांचा प्रत्येक जीव* तुमच्यासाठी घृणास्पद आहे.

२१ पंख असलेल्या व घोळक्यांत राहणाऱ्‍या चार पायांच्या जीवांपैकी, ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी दोन लांब पाय असतात, फक्‍त ते तुम्ही खाऊ शकता. २२ त्यांपैकी तुम्ही हे खाऊ शकता: स्थलांतर करणारे वेगवेगळ्या प्रकारचे टोळ, इतर खाण्यालायक टोळ,+ रातकिडे आणि नाकतोडे. २३ पंख असलेले व घोळक्यांत राहणारे, चार पायांचे इतर सर्व जीवजंतू तुमच्यासाठी घृणास्पद आहेत. २४ त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध होऊ शकता. जो कोणी अशा जीवजंतूंच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ २५ जो कोणी असे मेलेले जीवजंतू उचलेल, त्याने आपले कपडे धुवावेत.+ तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.

२६ ज्या प्राण्याचे खूर पूर्णपणे दुभागलेले नाहीत आणि जो रवंथ करत नाही, तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. अशा प्राण्यांना स्पर्श करणारा प्रत्येक जण अशुद्ध असेल.+ २७ चार पायांवर चालणारा प्रत्येक प्राणी जो आपल्या पंजांवर चालतो, तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. जो कोणी त्याच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. २८ जो कोणी असे मेलेले प्राणी उचलेल, त्याने आपले कपडे धुवावेत+ आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ हे प्राणी तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

२९ जमिनीवर रांगणाऱ्‍या प्राण्यांपैकी हे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत: घूस, उंदीर,+ सर्व प्रकारच्या पाली, ३० घोरपड, पाणसरडा, सापसुरळी, छोटी पाल आणि सरडा. ३१ हे सर्व रांगणारे प्राणी तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.+ जो कोणी त्यांच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+

३२ यांपैकी एखादा मेलेला प्राणी एखाद्या वस्तूवर पडला, तर ती वस्तू अशुद्ध होईल. मग ते एखादं लाकडाचं भांडं असो किंवा वस्त्र, कातडी असो किंवा गोणपाटाचा कपडा. रोजच्या वापरातलं कोणतंही भांडं जरी असलं, तरी ते पाण्यात बुडवून ठेवावं आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील; मग ते शुद्ध होईल. ३३ जर असा मेलेला प्राणी मातीच्या भांड्यात पडला, तर ते भांडं फोडून टाका. त्यात जे काही असेल ते अशुद्ध होईल.+ ३४ अशा भांड्यातल्या पाण्याचा स्पर्श झालेले कोणतेही खाण्याचे पदार्थ अशुद्ध असतील आणि अशा भांड्यात ठेवलेला कोणताही पिण्याचा पदार्थ अशुद्ध असेल. ३५ हे मेलेले प्राणी कोणत्याही वस्तूवर पडले, तर ती अशुद्ध होईल. मग ती भट्टी असो किंवा लहान शेगडी, तिचे तुकडेतुकडे केले जावेत. या वस्तू अशुद्ध आहेत आणि त्या तुमच्यासाठी अशुद्ध राहतील. ३६ जर असा मेलेला प्राणी एखाद्या झऱ्‍यात किंवा पाणी साठवण्याच्या कुंडात पडला, तर तो झरा किंवा ते कुंड शुद्धच राहील, पण जो कोणी त्याचं मेलेलं शरीर पाण्यातून काढेल, तो अशुद्ध होईल. ३७ हे मेलेले प्राणी पेरणीसाठी असलेल्या बियाण्यावर पडले, तर ते बियाणं शुद्धच राहील; ३८ पण जर या प्राण्यांच्या मेलेल्या शरीराचा एखादा भाग, पाण्याने भिजलेल्या बियाण्यावर पडला, तर ते बियाणं अशुद्ध होईल.

३९ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या प्राण्यांपैकी एखादा मेला, तर त्याच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करणारा संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.+ ४० त्या मेलेल्या प्राण्याचं मांस खाणाऱ्‍याने आपले कपडे धुवावेत आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ जो कोणी त्या मेलेल्या प्राण्याचं शरीर उचलून नेईल, त्याने आपले कपडे धुवावेत आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ४१ जमिनीवर घोळक्यांत राहणारे जीवजंतू घृणास्पद आहेत,+ ते खाऊ नका. ४२ पोटावर सरपटणारे कोणतेही प्राणी, चार पायांवर चालणारे कोणतेही जीवजंतू किंवा जमिनीवर घोळक्यांत राहणारे व अनेक पाय असणारे जीवजंतू तुम्ही खाऊ नका, कारण ते घृणास्पद आहेत.+ ४३ घोळक्यांत राहणाऱ्‍या कोणत्याही प्राण्यामुळे तुम्ही घृणास्पद होऊ नका.* त्यांच्यामुळे स्वतःला दूषित करू नका आणि अशुद्ध होऊ नका.+ ४४ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.+ तुम्ही शुद्ध राहून स्वतःला पवित्र करा,+ कारण मी पवित्र आहे.+ तेव्हा जमिनीवर चालणाऱ्‍या व घोळक्यांत राहणाऱ्‍या कोणत्याही जीवजंतूमुळे स्वतःला* अशुद्ध करू नका. ४५ मी तुमचा देव आहे हे सिद्ध व्हावं, म्हणून तुम्हाला इजिप्त* देशातून बाहेर काढणारा मी यहोवा आहे.+ तुम्ही पवित्र असलं पाहिजे,+ कारण मी पवित्र आहे.+

४६ हा प्राण्यांबद्दल, उडणाऱ्‍या जीवजंतूंबद्दल, पाण्यातल्या प्रत्येक जीवजंतूबद्दल आणि जमिनीवर घोळक्यांत राहणाऱ्‍या प्रत्येक जीवजंतूबद्दलचा नियम आहे. ४७ जे प्राणी शुद्ध आणि जे अशुद्ध आहेत, तसंच जे खाल्ले जाऊ शकतात आणि जे खाल्ले जाऊ शकत नाहीत, त्यांमध्ये फरक करता यावा म्हणून हा नियम आहे.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा