वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • मोलखची उपासना; भूतविद्या (१-६)

      • पवित्र असा आणि आईवडिलांचा आदर करा (७-९)

      • अनैतिक शरीरसंबंधांसाठी मृत्युदंड (१०-२१)

      • देशात राहण्यासाठी पवित्र असा (२२-२६)

      • भूतविद्या करणाऱ्‍यांना मृत्युदंड (२७)

लेवीय २०:२

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२१; अनु १८:१०

लेवीय २०:३

समासातील संदर्भ

  • +यहे ५:११

लेवीय २०:४

समासातील संदर्भ

  • +अनु १३:६-९

लेवीय २०:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्यासोबत व्यभिचार.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:५

लेवीय २०:६

तळटीपा

  • *

    किंवा “जीव.”

  • *

    किंवा “जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३१; अनु १८:१०-१२; गल ५:१९, २०; प्रक २१:८
  • +लेवी २०:२७; प्रेका १६:१६
  • +१इत १०:१३

लेवीय २०:७

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:४४; १पेत्र १:१५, १६

लेवीय २०:८

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:४; उप १२:१३
  • +निर्ग ३१:१३; लेवी २१:८; १थेस ५:२३; २थेस २:१३

लेवीय २०:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:१७; अनु २७:१६; नीत २०:२०; मत्त १५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २४

लेवीय २०:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शरीरसंबंध ठेवतो.”

समासातील संदर्भ

  • +अनु ५:१८; २२:२२; रोम ७:३; १कर ६:९, १०

लेवीय २०:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या वडिलांची नग्नता.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:८; अनु २७:२०

लेवीय २०:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१५, २९

लेवीय २०:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:५; लेवी १८:२२; शास १९:२२; रोम १:२६, २७; १कर ६:९, १०; यहू ७

लेवीय २०:१४

तळटीपा

  • *

    किंवा “लाजिरवाणी वागणूक; बीभत्स.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१७; अनु २७:२३
  • +लेवी २१:९

लेवीय २०:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:१९; अनु २७:२१

लेवीय २०:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२३

लेवीय २०:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या बहिणीची नग्नता.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:९; अनु २७:२२

लेवीय २०:१८

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९१, पृ. २४-२५

लेवीय २०:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१२, १३

लेवीय २०:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या काकांची नग्नता.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१४

लेवीय २०:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या भावाची नग्नता.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:१६; अनु २५:५

लेवीय २०:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:१; अनु ५:१; उप १२:१३
  • +लेवी १८:२६, २८

लेवीय २०:२३

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:३, २४; अनु १२:३०
  • +लेवी १८:२७; अनु ९:५

लेवीय २०:२४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१७; ६:८; अनु ८:७-९; यहे २०:६
  • +निर्ग १९:५; ३३:१६; १रा ८:५३; १पेत्र २:९

लेवीय २०:२५

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्या जिवांना.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:४६, ४७; अनु १४:४-२०
  • +लेवी ११:४३

लेवीय २०:२६

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:२; स्तो ९९:५; १पेत्र १:१५, १६; प्रक ४:८
  • +अनु ७:६

लेवीय २०:२७

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांच्यात भविष्य सांगणारा दुष्ट स्वर्गदूत असेल.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:१८; लेवी १९:३१; २०:६; अनु १८:१०-१२; प्रक २१:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. २०:२लेवी १८:२१; अनु १८:१०
लेवी. २०:३यहे ५:११
लेवी. २०:४अनु १३:६-९
लेवी. २०:५निर्ग २०:५
लेवी. २०:६लेवी १९:३१; अनु १८:१०-१२; गल ५:१९, २०; प्रक २१:८
लेवी. २०:६लेवी २०:२७; प्रेका १६:१६
लेवी. २०:६१इत १०:१३
लेवी. २०:७लेवी ११:४४; १पेत्र १:१५, १६
लेवी. २०:८लेवी १८:४; उप १२:१३
लेवी. २०:८निर्ग ३१:१३; लेवी २१:८; १थेस ५:२३; २थेस २:१३
लेवी. २०:९निर्ग २१:१७; अनु २७:१६; नीत २०:२०; मत्त १५:४
लेवी. २०:१०अनु ५:१८; २२:२२; रोम ७:३; १कर ६:९, १०
लेवी. २०:११लेवी १८:८; अनु २७:२०
लेवी. २०:१२लेवी १८:१५, २९
लेवी. २०:१३उत्प १९:५; लेवी १८:२२; शास १९:२२; रोम १:२६, २७; १कर ६:९, १०; यहू ७
लेवी. २०:१४लेवी १८:१७; अनु २७:२३
लेवी. २०:१४लेवी २१:९
लेवी. २०:१५निर्ग २२:१९; अनु २७:२१
लेवी. २०:१६लेवी १८:२३
लेवी. २०:१७लेवी १८:९; अनु २७:२२
लेवी. २०:१८लेवी १८:१९
लेवी. २०:१९लेवी १८:१२, १३
लेवी. २०:२०लेवी १८:१४
लेवी. २०:२१लेवी १८:१६; अनु २५:५
लेवी. २०:२२निर्ग २१:१; अनु ५:१; उप १२:१३
लेवी. २०:२२लेवी १८:२६, २८
लेवी. २०:२३लेवी १८:३, २४; अनु १२:३०
लेवी. २०:२३लेवी १८:२७; अनु ९:५
लेवी. २०:२४निर्ग ३:१७; ६:८; अनु ८:७-९; यहे २०:६
लेवी. २०:२४निर्ग १९:५; ३३:१६; १रा ८:५३; १पेत्र २:९
लेवी. २०:२५लेवी ११:४६, ४७; अनु १४:४-२०
लेवी. २०:२५लेवी ११:४३
लेवी. २०:२६लेवी १९:२; स्तो ९९:५; १पेत्र १:१५, १६; प्रक ४:८
लेवी. २०:२६अनु ७:६
लेवी. २०:२७निर्ग २२:१८; लेवी १९:३१; २०:६; अनु १८:१०-१२; प्रक २१:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय २०:१-२७

लेवीय

२० यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘इस्राएलच्या एखाद्या माणसाने किंवा इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या एखाद्या विदेश्‍याने, आपल्या मुलांपैकी कोणाला मोलख दैवताला अर्पण केलं, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ देशातल्या लोकांनी त्याला दगडमार करून ठार मारावं. ३ मी त्या माणसाला नाकारीन आणि त्याला ठार मारीन, कारण त्याने आपल्या मुलांना मोलखला अर्पण केलं आहे. त्याने माझ्या उपासना मंडपाला दूषित केलं आहे+ आणि माझ्या पवित्र नावाचा अनादर केला आहे. ४ तो माणूस आपल्या मुलांना मोलखला अर्पण करतो, तेव्हा जर देशातल्या लोकांनी मुद्दामहून त्याकडे डोळेझाक केली आणि त्याला ठार मारलं नाही,+ ५ तर मी नक्कीच त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला नाकारीन.+ मी त्या माणसाला आणि त्याच्याप्रमाणेच मोलखची उपासना* करून माझ्याशी अविश्‍वासूपणे वागणाऱ्‍या सर्वांना ठार मारीन.

६ जो कोणी* भूतविद्या करणाऱ्‍यांकडे+ आणि ज्योतिष्यांकडे+ जाऊन माझ्याशी अविश्‍वासूपणे वागतो त्या माणसाला* मी नक्कीच नाकारीन आणि ठार मारीन.+

७ तुम्ही शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे. ८ तुम्ही माझे नियम पाळले पाहिजेत.+ तुम्हाला शुद्ध करणारा मी तुमचा देव यहोवा आहे.+

९ जो आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ त्याने आपल्या वडिलांना किंवा आईला शाप दिल्यामुळे त्याच्या रक्‍ताची जबाबदारी त्याच्यावरच आहे.

१० जो दुसऱ्‍याच्या बायकोसोबत व्यभिचार करतो,* म्हणजे जो आपल्या शेजाऱ्‍याच्या बायकोसोबत व्यभिचार करतो त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. व्यभिचार करणाऱ्‍या त्या पुरुषाला आणि स्त्रीलाही ठार मारलं जावं.+ ११ जो आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवतो, तो आपल्या वडिलांची लाज* उघडी करतो.+ त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांच्या रक्‍ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. १२ एखाद्याने आपल्या सुनेशी शरीरसंबंध ठेवले, तर त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांनी अनैसर्गिक कृत्य केलं आहे. त्यांच्या रक्‍ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.+

१३ एखादा पुरुष स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतो, तसे जर त्याने एखाद्या पुरुषासोबत ठेवले, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केलं आहे.+ त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांच्या रक्‍ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

१४ जर कोणी एखाद्या स्त्रीशी आणि तिच्या आईशी शरीरसंबंध ठेवले, तर ते एक घृणास्पद कृत्य* आहे.+ त्याला आणि त्या दोघींना जाळून टाकावं,+ म्हणजे पुढे तुमच्यामध्ये अशी घृणास्पद कृत्यं होणार नाहीत.

१५ एखाद्याने प्राण्याशी संभोग केला, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं. तसंच, तुम्ही त्या प्राण्यालाही ठार मारावं.+ १६ जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी संभोग करायला त्याच्याजवळ गेली,+ तर त्या स्त्रीला आणि त्या प्राण्याला ठार मारावं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं. त्यांच्या रक्‍ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

१७ जर एखाद्या पुरुषाने आपल्या बहिणीशी, म्हणजे आपल्या वडिलांच्या मुलीशी किंवा आपल्या आईच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवले; आणि त्याने तिची नग्नता पाहिली आणि तिने त्याची नग्नता पाहिली, तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.+ त्यांना आपल्या भाऊबंदांच्या देखत ठार मारलं जावं. त्याने आपल्या बहिणीची लाज* उघडी केली आहे. त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळेल.

१८ एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची मासिक पाळी सुरू असताना तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, तर त्या दोघांनीही तिच्या रक्‍ताचा अनादर केला आहे.+ त्या दोघांना ठार मारलं जावं.

१९ तू आपल्या मावशीशी किंवा आत्याशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण हे रक्‍ताच्या नातेवाइकाची लाज उघडी करण्यासारखं आहे.+ त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा मिळेल. २० जो पुरुष आपल्या काकूशी शरीरसंबंध ठेवतो, त्याने आपल्या काकांची लाज* उघडी केली आहे.+ त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं. २१ एखाद्याने आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवले, तर ही एक घृणास्पद गोष्ट आहे.+ त्याने आपल्या भावाची लाज* उघडी केली आहे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं.

२२ तुम्ही माझे सगळे नियम आणि न्याय-निर्णय पाळले पाहिजेत,+ म्हणजे ज्या देशात राहण्यासाठी मी तुम्हाला नेत आहे, तो तुम्हाला ओकून टाकणार नाही.+ २३ ज्या राष्ट्रांना मी तुमच्यासमोरून हाकलून लावत आहे, त्यांच्या रीतींप्रमाणे तुम्ही चालू नका,+ कारण त्यांनी याच सर्व गोष्टी केल्या आहेत आणि मला त्यांची घृणा वाटते.+ २४ म्हणूनच, मी तुम्हाला असं सांगितलं आहे: “तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल आणि मी तुम्हाला तो देश, म्हणजेच दूध आणि मध वाहत असलेला देश वारसा म्हणून देईन.+ मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला सर्व लोकांपासून वेगळं केलं आहे.”+ २५ तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये, तसंच शुद्ध आणि अशुद्ध पक्ष्यांमध्ये फरक केला पाहिजे;+ मी तुमच्यासाठी अशुद्ध ठरवलेल्या कोणत्याही प्राण्यामुळे, पक्ष्यामुळे किंवा जमिनीवर रांगणाऱ्‍या कोणत्याही जीवजंतूमुळे तुम्ही स्वतःला* दूषित करू नका.+ २६ तुम्ही माझ्या दृष्टीत पवित्र असलं पाहिजे, कारण मी यहोवा पवित्र आहे+ आणि तुम्ही माझे लोक व्हावेत, म्हणून मी तुम्हाला इतर लोकांपासून वेगळं केलं आहे.+

२७ पुरुष किंवा स्त्री यांच्यापैकी कोणी भूतविद्या करणारे किंवा ज्योतिषी असतील,* तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं.+ लोकांनी त्यांना दगडमार करावा. त्यांच्या रक्‍ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा