स्तोत्र
दावीदचं गीत.
१४४ यहोवा माझा खडक आहे,+ त्याची स्तुती असो!
तो मला लढाईचं प्रशिक्षण देतो
आणि युद्धासाठी सज्ज करतो.+
२ तो माझा गड आहे; तो माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करतो.
तो माझा सुरक्षित आश्रय* आणि माझा सोडवणारा आहे.
तो माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय घेतलाय.+
त्याने लोकांना माझ्या अधीन केलंय.+
३ हे यहोवा, शेवटी माणूस काय आहे, की तू त्याच्याकडे पाहावं?
नाशवंत मानव काय आहे, की तू त्याच्याकडे लक्ष द्यावं?+
८ ते खोटं बोलतात
आणि आपला उजवा हात उंचावून खोटी शपथ घेतात.
९ हे देवा, मी तुझ्यासाठी एक नवीन गीत गाईन.+
दहा तारांच्या तंतुवाद्यावर मी तुझं गुणगान करीन.*
११ मला विदेश्यांच्या हातून सोडव,
आणि खोटं बोलणाऱ्यांपासून माझी सुटका कर.
ते आपला उजवा हात उंचावून खोटी शपथ घेतात.
१२ मग आमची तरुण मुलं भराभर वाढणाऱ्या रोपांसारखी असतील,
आणि आमच्या मुली, महालाच्या कोपऱ्यासाठी कोरलेल्या नक्षीदार खांबांसारख्या होतील.
१३ आमची कोठारं सर्व प्रकारच्या अन्नधान्याने ओसंडून वाहतील;
आमच्या शेतांतले कळप हजारो-लाखो पटींनी वाढतील.
१४ पोटात गर्भ असलेल्या आमच्या गुराढोरांना इजा होणार नाही,
किंवा त्यांचा गर्भपात होणार नाही;
आमच्या चौकांमध्ये कोणीही दुःखामुळे आक्रोश करणार नाही.
१५ ज्या लोकांची अशी स्थिती आहे, ते सुखी आहेत!
यहोवा ज्यांचा देव आहे, ते लोक सुखी आहेत!+