वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ राजे रूपरेषा

      • एलीया संदेष्टा दुष्काळ येईल असं सांगतो (१)

      • कावळे एलीयाला अन्‍न पुरवतात (२-७)

      • एलीया सारफथच्या विधवेकडे जातो (८-१६)

      • विधवेचा मुलगा मरतो आणि त्याला पुन्हा जिवंत केलं जातं (१७-२४)

१ राजे १७:१

तळटीपा

  • *

    म्हणजे “माझा देव यहोवा आहे.”

  • *

    शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”

समासातील संदर्भ

  • +यहो २२:९
  • +१रा १७:१५, १६, २२, २४; १८:३६, ३८, ४६; २रा २:८, ११; लूक १:१७; योह १:१९, २१
  • +अनु २८:१५, २३; यिर्म १४:२२; लूक ४:२५; याक ५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. १०

१ राजे १७:४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२५; मत्त ६:११

१ राजे १७:६

समासातील संदर्भ

  • +गण ११:२३; शास १५:१९

१ राजे १७:७

समासातील संदर्भ

  • +१रा १८:५

१ राजे १७:९

समासातील संदर्भ

  • +लूक ४:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १३-१४

१ राजे १७:१०

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:३२, ३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १३-१४

१ राजे १७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १३-१४

१ राजे १७:१२

समासातील संदर्भ

  • +२रा ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १४

१ राजे १७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १४

१ राजे १७:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१०; ३७:१७, १९; फिलि ४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १४

१ राजे १७:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:४१, ४२; लूक ४:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १४-१५

१ राजे १७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १४-१५

१ राजे १७:१७

समासातील संदर्भ

  • +२रा ४:१९, २०

१ राजे १७:१८

समासातील संदर्भ

  • +ईयो १३:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १५

१ राजे १७:१९

समासातील संदर्भ

  • +२रा ४:२१, ३२

१ राजे १७:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो ९९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १५

१ राजे १७:२२

समासातील संदर्भ

  • +याक ५:१६
  • +अनु ३२:३९; १शमु २:६; २रा ४:३२, ३४; १३:२१; लूक ७:१५; ८:५४, ५५; योह ५:२८, २९; ११:४४; प्रेका ९:४०, ४१; २०:९, १०; रोम १४:९; इब्री ११:१७, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९९, पृ. १६

१ राजे १७:२३

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:३५

१ राजे १७:२४

समासातील संदर्भ

  • +योह ३:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ राजे १७:१यहो २२:९
१ राजे १७:११रा १७:१५, १६, २२, २४; १८:३६, ३८, ४६; २रा २:८, ११; लूक १:१७; योह १:१९, २१
१ राजे १७:१अनु २८:१५, २३; यिर्म १४:२२; लूक ४:२५; याक ५:१७
१ राजे १७:४स्तो ३७:२५; मत्त ६:११
१ राजे १७:६गण ११:२३; शास १५:१९
१ राजे १७:७१रा १८:५
१ राजे १७:९लूक ४:२५, २६
१ राजे १७:१०इब्री ११:३२, ३७
१ राजे १७:१२२रा ४:२
१ राजे १७:१४स्तो ३४:१०; ३७:१७, १९; फिलि ४:१९
१ राजे १७:१५मत्त १०:४१, ४२; लूक ४:२५, २६
१ राजे १७:१७२रा ४:१९, २०
१ राजे १७:१८ईयो १३:२६
१ राजे १७:१९२रा ४:२१, ३२
१ राजे १७:२०स्तो ९९:६
१ राजे १७:२२याक ५:१६
१ राजे १७:२२अनु ३२:३९; १शमु २:६; २रा ४:३२, ३४; १३:२१; लूक ७:१५; ८:५४, ५५; योह ५:२८, २९; ११:४४; प्रेका ९:४०, ४१; २०:९, १०; रोम १४:९; इब्री ११:१७, १९
१ राजे १७:२३इब्री ११:३५
१ राजे १७:२४योह ३:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ राजे १७:१-२४

१ राजे

१७ गिलाद+ प्रदेशात, तिश्‍बी इथे राहणारा एलीया*+ हा अहाब राजाला म्हणाला: “मी ज्याची सेवा करतो* त्या इस्राएलच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत येत्या काही वर्षांत पाऊस किंवा दव पडणार नाही!”+

२ मग एलीयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३ “इथून निघ आणि पूर्वेकडे जा. तिथे यार्देनच्या पूर्वेला असलेल्या करीथच्या खोऱ्‍यात लपून राहा. ४ तिथल्या झऱ्‍याचं पाणी तुला प्यायला मिळेल आणि तिथे मी कावळ्यांना तुला अन्‍न पुरवण्याची आज्ञा देईन.”+ ५ तेव्हा तो लगेच निघाला आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं; तो यार्देनच्या पूर्वेला असलेल्या करीथच्या खोऱ्‍यात जाऊन राहू लागला. ६ तिथे सकाळ-संध्याकाळ कावळे त्याला भाकर व मांस आणून द्यायचे आणि तो झऱ्‍याचं पाणी प्यायचा.+ ७ पण काही दिवसांनी झऱ्‍याचं पाणी आटलं,+ कारण देशात पाऊस पडत नव्हता.

८ मग यहोवाकडून त्याला असा संदेश मिळाला: ९ “ऊठ, आणि सीदोन देशातल्या सारफथ इथे जाऊन राहा. पाहा! तिथे मी एका विधवेला तुला अन्‍न पुरवण्याची आज्ञा देईन.”+ १० म्हणून तो निघाला आणि सारफथला गेला. तो शहराच्या दरवाजाजवळ पोहोचला, तेव्हा एक विधवा लाकडं गोळा करत असलेली त्याला दिसली. तो तिला हाक मारून म्हणाला: “कृपा करून मला प्यायला एक पेलाभर पाणी आण.”+ ११ ती पाणी आणायला जाऊ लागली, तेव्हा त्याने तिला हाक मारून म्हटलं: “कृपया माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडाही घेऊन ये.” १२ त्यावर ती त्याला म्हणाली: “तुझ्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! माझ्याकडे एकही भाकर नाही; फक्‍त मोठ्या मडक्यात मूठभर पीठ आणि छोट्या कुपीत थोडंसं तेल आहे.+ आता मी काही लाकडं गोळा करून घरी जाईन. मग माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी काहीतरी खायला बनवीन. हे आमचं शेवटचं जेवण असेल, त्यानंतर आम्ही दोघं मरून जाऊ.”

१३ मग एलीया तिला म्हणाला: “घाबरू नकोस. जा आणि तू म्हणालीस तसं कर. पण त्याआधी तुझ्याजवळ जे काही आहे त्यातून माझ्यासाठी एक छोटी भाकर बनवून आण. मग त्यानंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी काहीतरी बनव. १४ कारण इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘ज्या दिवसापर्यंत यहोवा जमिनीवर पाऊस पाडत नाही, त्या दिवसापर्यंत तुझ्याकडे असलेल्या मोठ्या मडक्यातलं पीठ आणि लहान मडक्यातलं तेल संपणार नाही.’”+ १५ म्हणून मग ती गेली आणि एलीयाने सांगितल्याप्रमाणे तिने केलं. आणि तिला, तिच्या कुटुंबाला आणि एलीयाला बऱ्‍याच दिवसांपर्यंत पुरेसं अन्‍न मिळत राहिलं.+ १६ यहोवाने एलीयाद्वारे सांगितलं होतं त्याप्रमाणे तिच्या मोठ्या मडक्यातलं पीठ आणि लहान मडक्यातलं तेल संपलं नाही.

१७ या गोष्टी घडल्यानंतर असं झालं, की त्या स्त्रीचा मुलगा आजारी पडला. आणि त्याचा आजार वाढून शेवटी तो मेला.+ १८ तेव्हा ती स्त्री एलीयाला म्हणाली: “हे खऱ्‍या देवाच्या माणसा! माझ्याशी तुमचं काय वैर? माझ्या पापांची आठवण करून द्यायला आणि माझ्या मुलाला मारून टाकायला तुम्ही आला आहात का?”+ १९ त्यावर तो तिला म्हणाला: “मुलाला माझ्याकडे दे.” मग त्याने त्या मुलाला आपल्या हातात घेतलं आणि त्याला उचलून छतावर असलेल्या आपल्या खोलीत नेलं. तिथे त्याने मुलाला आपल्या बिछान्यावर ठेवलं.+ २० मग यहोवाचा धावा करून तो म्हणाला: “हे माझ्या देवा यहोवा!+ ज्या विधवेच्या घरी मी राहतोय तिच्या मुलाला मारून तू तिच्यावरही संकट आणत आहेस का?” २१ मग मुलाच्या अंगावर तीन वेळा वाकून तो यहोवाचा धावा करत म्हणाला: “हे माझ्या देवा यहोवा! कृपा करून या मुलाचा जीव त्याच्यात परत येऊ दे.” २२ यहोवाने एलीयाची विनंती ऐकली+ आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला व तो जिवंत झाला.+ २३ मग एलीयाने त्या मुलाला छतावरच्या खोलीतून खाली आणलं आणि त्याला आपल्या आईकडे देऊन तो म्हणाला: “पाहा! तुझा मुलगा जिवंत आहे!”+ २४ तेव्हा ती स्त्री एलीयाला म्हणाली: “आता माझी खातरी पटली आहे, की तुम्ही खरंच देवाचे माणूस आहात.+ आणि तुमच्या तोंडून निघणारं यहोवाचं वचन खरंय.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा