स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. हे गीत शमीनीथ* या सुरावर तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.
६ हे यहोवा, रागाच्या भरात माझं ताडन करू नकोस,
क्रोधाने मला शिक्षा करू नकोस.+
२ हे यहोवा, माझ्यावर कृपा* कर, कारण मी दुर्बळ होत चाललोय.
हे यहोवा, मला बरं कर,+ कारण माझी हाडं खिळखिळी झाली आहेत.
३ मी* खरंच खूप अस्वस्थ झालोय.+
हे यहोवा, मला सांग, मी अजून किती वाट पाहू?+
६ मी कण्हून कण्हून थकलोय;+
रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो;
माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.+
७ शोकाने माझे डोळे थकले आहेत;+
छळ करणाऱ्यांमुळे माझी दृष्टी अंधूक झाली आहे.
८ दुष्टपणे वागणाऱ्यांनो, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर व्हा,
कारण यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.+
९ यहोवा माझी कृपेची याचना ऐकेल;+
यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल.