उपकारस्तुतीचं गीत.
१०० पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवाचा जयजयकार करा!+
२ आनंदाने यहोवाची सेवा करा.+
जल्लोष करत त्याच्यासमोर या.
३ यहोवाच देव आहे हे ओळखा.+
त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.+
आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातली मेंढरं आहोत.+
४ उपकारस्तुती करत त्याच्या फाटकांमधून या,+
स्तुती करत त्याच्या अंगणांत या.+
त्याला धन्यवाद द्या; त्याच्या नावाची स्तुती करा.+
५ कारण यहोवा चांगला आहे;+
त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ
आणि त्याचा विश्वासूपणा पिढ्या न् पिढ्या टिकून राहतो.+