स्तोत्र
א [आलेफ ]
३ ते कधीही अनीतीने वागत नाहीत;
ते त्याच्या मार्गांवर चालतात.+
४ तुझ्या आदेशांचं काळजीपूर्वक पालन केलं जावं,
अशी तू आज्ञा दिली आहेस.+
६ मग, तुझ्या सर्व आज्ञांवर मनन करताना
मला लज्जित व्हावं लागणार नाही.+
८ मी तुझ्या कायद्यांचं पालन करीन;
मला कधीही कायमचं सोडून देऊ नकोस.
ב [बेथ ]
९ एक तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो?
तुझ्या शब्दांप्रमाणे वागून आणि नेहमी सावध राहून.+
१० मी अगदी पूर्ण मनाने तुझा शोध घेतो.
तुझ्या आज्ञांपासून मला भरकटू देऊ नकोस.+
१२ हे यहोवा, तुझी स्तुती असो!
मला तुझे कायदे शिकव.
१३ तुझ्या तोंडून निघालेल्या सर्व न्याय-निर्णयांचं,
मी आपल्या ओठांनी वर्णन करतो.
ג [गिमेल ]
१७ आपल्या या सेवकावर दया कर,
म्हणजे मी जिवंत राहीन आणि तुझ्या शब्दांचं पालन करीन.+
१८ तुझ्या नियमशास्त्रातल्या सुंदर गोष्टी स्पष्टपणे दिसाव्यात,
म्हणून माझे डोळे उघड.
१९ या देशात मी एक विदेशी म्हणून राहतोय.+
तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस.
२० तुझ्या न्याय-निर्णयांच्या ओढीने,
माझा जीव सतत व्याकूळ असतो.
२१ जे गर्विष्ठ आहेत आणि जे तुझ्या आज्ञांपासून भरकटतात,
अशा शापित लोकांचं तू ताडन करतोस.+
२२ माझ्यापासून अपमान आणि तिरस्कार दूर कर,
कारण मी तुझ्या स्मरण-सूचना पाळल्या आहेत.
ד [दालेथ ]
२५ मी धुळीत पडलोय.+
तू दिलेल्या वचनाप्रमाणे मला जिवंत ठेव.+
२६ माझ्या सर्व कार्यांबद्दल मी तुला सांगितलं आणि तू मला मार्गदर्शन केलंस;
मला तुझे कायदे शिकव.+
२८ दुःखामुळे मी रात्रभर जागा राहतो.
तुझ्या शब्दांनी मला बळ दे.
२९ कपटी मार्गापासून मला दूर ठेव,+
आणि तुझं नियमशास्त्र मला शिकवून माझ्यावर कृपा कर.
३० मी विश्वासूपणाचा मार्ग निवडलाय.+
तुझे न्याय-निर्णय योग्य आहेत हे मला माहीत आहे.
३१ मी तुझ्या स्मरण-सूचनांना जडून राहतो.+
हे यहोवा, माझी निराशा* होऊ देऊ नकोस.+
ה [हे ]
३४ मी तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालावं
आणि अगदी पूर्ण मनाने त्याचं पालन करावं,
म्हणून मला समजबुद्धी दे.
३५ मला तुझ्या आज्ञांच्या वाटेने चालव,+
कारण यामुळे मला आनंद होतो.
३६ माझ्या मनाला स्वतःच्या फायद्याकडे नाही,+
तर तुझ्या स्मरण-सूचनांकडे लक्ष द्यायला शिकव.
३९ मला ज्याची भीती वाटते, तो अपमान माझ्यापासून दूर कर,
कारण तुझे न्याय-निर्णय चांगले आहेत.+
४० पाहा, मला तुझ्या आज्ञांची किती ओढ लागली आहे!
तुझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला जिवंत ठेव.
ו [वाव ]
४२ मग मला टोमणे मारणाऱ्याला मी उत्तर देईन,
कारण मी तुझ्या शब्दांवर भरवसा ठेवतो.
४३ सत्याचे शब्द माझ्या तोंडातून काढून टाकू नकोस,
कारण मी तुझ्या न्याय-निर्णयाची आशा धरली आहे.*
४४ मी तुझ्या नियमशास्त्राचं नेहमी,
सदासर्वकाळ पालन करीन.+
४७ मला तुझ्या आज्ञा आवडतात,
खरंच, मला त्या प्रिय आहेत.+
ז [झाइन ]
४९ तुझ्या या सेवकाला दिलेलं अभिवचन आठवणीत ठेव,
त्याद्वारे तू मला आशा देतोस.*
५० माझ्या दुःखात मला यामुळे सांत्वन मिळतं,+
कारण तुझ्या शब्दांनी मला जिवंत ठेवलंय.
५३ तुझ्या नियमशास्त्राच्या विरोधात वागणाऱ्या दुष्टांचा
मला संताप येतो.+
५४ मी जिथे जिथे विदेशी म्हणून राहिलो,*
तिथे तिथे तुझे कायदे माझ्यासाठी गीतांसारखे होते.
५५ हे यहोवा, मला तुझ्या नियमशास्त्राचं पालन करता यावं,
म्हणून मी रात्री तुझं नाव आठवतो.+
५६ ही माझी सवय आहे,
कारण मी तुझ्या आदेशांचं पालन करत आलोय.
ח [हेथ ]
५९ तुझ्या स्मरण-सूचनांकडे माझी पावलं पुन्हा वळवण्यासाठी,
मी आपल्या मार्गांचं परीक्षण केलंय.+
६० मी लगेच तुझ्या आज्ञा पाळतो;
मी उशीर करत नाही.+
६२ तुझ्या नीतिमान न्याय-निर्णयांबद्दल
मी मध्यरात्री उठून तुझी उपकारस्तुती करतो.+
६४ हे यहोवा, पृथ्वी तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने भरलेली आहे;+
मला तुझे कायदे शिकव.
ט [तेथ ]
६५ हे यहोवा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे
तू आपल्या या सेवकाचं भलं केलं आहेस.
६८ तू चांगला आहेस+ आणि तुझी कार्यंही चांगली आहेत.
मला तुझे कायदे शिकव.+
६९ गर्विष्ठ लोक माझ्यावर खोटे आरोप लावतात,
पण मी अगदी मनापासून तुझ्या आदेशांचं पालन करतो.
י [योद ]
७३ तू आपल्या हातांनी मला निर्माण केलंस आणि घडवलंस.
मला समजबुद्धी दे,
म्हणजे मला तुझ्या आज्ञा समजतील.+
७५ हे यहोवा, तुझे न्याय-निर्णय नीतिमान आहेत याची मला जाणीव आहे;+
तुझ्या विश्वासूपणामुळेच तू मला शिक्षा दिली आहेस.+
पण मी तर तुझ्या आदेशांवर मनन* करीन.+
७९ जे तुझं भय मानतात आणि ज्यांना तुझ्या स्मरण-सूचना माहीत आहेत,
त्यांना माझ्याकडे परत येऊ दे.
८० मला निर्दोष मनाने तुझ्या कायद्यांचं पालन करायला साहाय्य कर,+
म्हणजे मला लज्जित व्हावं लागणार नाही.+
כ [खाफ ]
८४ तुझ्या या सेवकाला किती दिवस वाट पाहावी लागेल?
माझा छळ करणाऱ्यांविरुद्ध तू कधी न्यायदंड आणशील?+
८५ तुझं नियमशास्त्र मोडणारे गर्विष्ठ लोक
माझ्यासाठी खड्डे खणतात.
८६ तुझ्या सर्व आज्ञा भरवशालायक आहेत.
लोक उगाच माझा छळ करतात; मला मदत कर!+
८७ त्यांनी पृथ्वीवरून मला जवळजवळ नाहीसं केलं होतं,
पण तुझ्या आदेशांचं पालन करण्याचं मी सोडलं नाही.
८८ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला जिवंत ठेव,
म्हणजे तू दिलेल्या स्मरण-सूचना मी पाळीन.
ל [लामेद ]
९० तुझा विश्वासूपणा पिढ्या न् पिढ्या टिकून राहतो.+
तू पृथ्वीची स्थापना केली आहेस, म्हणून ती स्थिर आहे.+
९१ ते* सर्व तुझे सेवक आहेत,
तुझ्या न्याय-निर्णयांमुळे ते आजपर्यंत अस्तित्वात आहेत.
९३ तुझे आदेश मी कधीही विसरणार नाही,
कारण त्यांमुळेच तू मला जिवंत ठेवलं आहेस.+
९५ दुष्ट लोक माझा नाश करण्याची संधी शोधतात,
पण मी तुझ्या स्मरण-सूचनांकडे बारकाईने लक्ष देतो.
מ [मेम ]
९७ तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे!+
९८ तुझ्या आज्ञा सतत माझ्या डोळ्यांसमोर असतात,
त्यामुळे मी आपल्या शत्रूंपेक्षा बुद्धिमान ठरतो.+
९९ माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्याकडे जास्त सखोल समज आहे,+
कारण मी तुझ्या स्मरण-सूचनांवर मनन* करतो.
१०० मी वयस्क माणसांपेक्षा समजदारपणे वागतो,
कारण मी तुझे आदेश पाळतो.
१०१ मला तुझ्या शब्दांचं पालन करायचंय,
म्हणून मी कोणत्याही दुष्ट मार्गावर चालायला तयार होत नाही.+
१०२ तुझ्या न्याय-निर्णयांपासून मी दूर जात नाही,
कारण तू मला मार्गदर्शन दिलं आहेस.
१०४ तुझ्या आदेशांमुळे मी समजदारीने वागतो.+
म्हणूनच मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.+
נ [नून ]
१०६ तुझे नीतिमान न्याय-निर्णय पाळण्याची मी शपथ घेतली आहे
आणि मी ती पूर्ण करीन.
१०७ मी खूप दुःखं सोसली आहेत.+
हे यहोवा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे मला जिवंत ठेव.+
१०८ हे यहोवा, स्वेच्छेने दिलेल्या माझ्या स्तुतीच्या अर्पणांचा* स्वीकार कर+
आणि मला तुझे न्याय-निर्णय शिकव.+
१०९ माझं जीवन सतत धोक्यात आहे,
पण मी तुझं नियमशास्त्र विसरलो नाही.+
११२ मी तुझ्या कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत
पालन करण्याचा निश्चय केलाय.*
ס [सामेख ]
११५ दुष्ट लोकांनो, माझ्यापासून दूर राहा,+
म्हणजे मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळू शकेन.
११६ हे देवा, तू वचन दिल्याप्रमाणे मला साहाय्य कर,+
म्हणजे मी जिवंत राहीन;
११८ तुझ्या कायद्यांपासून भरकटणाऱ्यांना तू नाकारतोस,+
कारण ते खोटे आणि कपटी आहेत.
११९ पृथ्वीवरच्या सर्व दुष्टांना तू निरुपयोगी गाळासारखं फेकून देतोस.+
म्हणून मला तुझ्या स्मरण-सूचना प्रिय आहेत.
१२० तुझ्या भयाने माझा थरकाप उडतो;
मला तुझ्या न्याय-निर्णयांची भीती वाटते.
ע [आयन ]
१२१ मी न्यायाला आणि नीतीला धरून वागलोय.
माझ्यावर जुलूम करणाऱ्यांच्या हाती मला देऊ नकोस.
१२२ तुझ्या या सेवकाचं भलं होईल अशी हमी दे;
गर्विष्ठांना माझ्यावर अत्याचार करू देऊ नकोस.
१२५ मी तुझा सेवक आहे; तुझ्या स्मरण-सूचना कळाव्यात,
म्हणून मला समजबुद्धी दे.+
१२६ हे यहोवा, तुझी कार्य करण्याची वेळ आली आहे,+
कारण त्यांनी तुझे नियम मोडले आहेत.
१२७ मी तर तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा,
अगदी शुद्ध सोन्यापेक्षाही मौल्यवान समजतो.+
१२८ म्हणून तुझ्याकडून येणाऱ्या सर्व सूचना* मला योग्य वाटतात;+
प्रत्येक खोट्या मार्गाची मला चीड येते.+
פ [पे ]
१२९ तुझ्या स्मरण-सूचना अद्भुत आहेत.
म्हणून मी त्या पाळतो.
१३२ तुझ्या नावावर प्रेम करणाऱ्यांसाठी असलेल्या तुझ्या न्याय-निर्णयाप्रमाणे,+
माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्यावर कृपा कर.+
१३३ तुझ्या शब्दांनी माझ्या पावलांना सुरक्षित मार्ग दाखव;*
कोणत्याही दुष्ट गोष्टीला माझ्यावर अधिकार गाजवू देऊ नकोस.+
१३४ जुलूम करणाऱ्यांपासून मला वाचव;*
मी तुझे आदेश पाळीन.
१३५ तुझ्या या सेवकावर तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश पडू दे+
आणि मला तुझे कायदे शिकव.
१३६ लोक तुझं नियमशास्त्र पाळत नाहीत,
हे पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहतात.+
צ [सादे ]
१३८ तुझ्या स्मरण-सूचना नीतिमान आहेत;
त्या पूर्णपणे विश्वसनीय आहेत.
१३९ माझ्या आवेशाने मला झपाटून टाकलंय,+
कारण माझे शत्रू तुझे शब्द विसरले आहेत.
१४२ तुझं नीतिमत्त्व सर्वकाळाचं आहे+
आणि तुझं नियमशास्त्र खरं आहे.+
१४३ माझ्यावर संकटं आणि दुःखं आली,
तरी तुझ्या आज्ञा मला प्रिय वाटतात.
१४४ तुझ्या स्मरण-सूचना सर्वकाळासाठी नीतिमान आहेत.
मला समजबुद्धी दे,+ म्हणजे मी जिवंत राहीन.
ק [खुफ ]
१४५ मी पूर्ण मनाने हाक मारतोय. हे यहोवा, मला उत्तर दे.
मी तुझ्या कायद्यांचं पालन करीन.
१४६ मी तुला प्रार्थना करतो, मला वाचव!
मी तुझ्या स्मरण-सूचना पाळीन.
१४९ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे माझी प्रार्थना ऐक.+
हे यहोवा, तुझ्या न्यायाप्रमाणे मला जिवंत ठेव.
१५० लाजिरवाणी कामं* करणारे माझ्याजवळ येतात;
तुझ्या नियमशास्त्रापासून ते खूप दूर गेले आहेत.
१५२ तू तुझ्या स्मरण-सूचना सर्वकाळासाठी स्थिर केल्या आहेस,
हे मी फार पूर्वी शिकलो.+
ר [रेश ]
१५३ माझं दुःख पाहा आणि माझी सुटका कर,+
कारण मी तुझं नियमशास्त्र विसरलो नाही.
१५५ तारण दुष्टांपासून खूप दूर आहे,
कारण त्यांनी तुझ्या कायद्यांचा शोध घेतला नाही.+
१५६ हे यहोवा, तुझी दया महान आहे.+
तुझ्या न्यायाप्रमाणे मला जिवंत ठेव.
१५७ माझा छळ करणारे आणि माझे वैरी पुष्कळ आहेत;+
पण मी तुझ्या स्मरण-सूचनांपासून भरकटलो नाही.
१५८ विश्वासघात करणाऱ्यांकडे पाहून मला घृणा वाटते
कारण ते तुझ्या शब्दांप्रमाणे चालत नाहीत.+
१५९ पाहा, मला तुझे आदेश किती प्रिय आहेत!
हे यहोवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला जिवंत ठेव.+
१६० तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत,+
आणि तुझे सगळे नीतिमान न्याय-निर्णय सर्वकाळासाठी आहेत.
ש [शिन ]
१६२ मोठा खजिना सापडलेल्या माणसासारखा,
मी तुझ्या शब्दांमुळे आनंदित होतो.+
१६४ तुझ्या नीतिमान न्याय-निर्णयांमुळे,
मी दिवसातून सात वेळा तुझी स्तुती करतो.
१६५ तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यांना खूप शांती मिळते;+
ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.
१६६ हे यहोवा, मी तुझ्या तारणाच्या कार्यांची आशा धरली आहे
आणि मी तुझ्या आज्ञा पाळतो.
१६८ मी तुझे आदेश आणि तुझ्या स्मरण-सूचना पाळतो,
मी जे काही करतो, ते तुला माहीत आहे.+
ת [ताव ]
१६९ हे यहोवा, माझी मदतीची याचना तुझ्यापर्यंत पोहोचू दे.+
तुझ्या शब्दांतून मिळणारी समजबुद्धी मला दे.+
१७० माझी कृपेची याचना तुझ्यापुढे येऊ दे.
तू वचन दिल्याप्रमाणे* मला वाचव.
१७१ माझ्या ओठांतून तुझी स्तुती ओसंडून वाहू दे,+
कारण तू मला तुझे कायदे शिकवतोस.
१७२ माझ्या जिभेला तुझ्या शब्दांचं गुणगान करू दे,+
कारण तुझ्या सर्व आज्ञा नीतिमान आहेत.
१७३ तुझा हात मला मदत करण्यासाठी नेहमी तयार असो,+
कारण तुझ्या आदेशांचं पालन करण्याची मी निवड केली आहे.+
१७४ हे यहोवा, तुझ्याकडून मिळणाऱ्या तारणाची मी वाट पाहतोय;
मला तुझं नियमशास्त्र प्रिय आहे.+
१७५ मला जिवंत राहू दे, म्हणजे मी तुझी स्तुती करीन;+
तुझे न्याय-निर्णय मला साहाय्य करोत.
१७६ वाट चुकलेल्या मेंढरासारखा मी भरकटलोय.+
तुझ्या या सेवकाला शोध,
कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.+