वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवासारखा देव नाही

        • यहोवा क्षमाशील आहे (५)

        • सगळी राष्ट्रं यहोवाची उपासना करतील (९)

        • “मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे” (११)

        • “मला तुझ्या नावाचं मनापासून भय बाळगायला शिकव” (११)

स्तोत्र ८६:१

तळटीपा

  • *

    किंवा “खाली वाकून ऐक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:६; यश ६६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २१

स्तोत्र ८६:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२८
  • +२इत १६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २१

स्तोत्र ८६:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ५७:१
  • +स्तो २५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २२

स्तोत्र ८६:४

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या या सेवकाचा जीव.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २२

स्तोत्र ८६:५

तळटीपा

  • *

    किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:८; १४५:९; लूक १८:१९
  • +यश ५५:७; मीख ७:१८
  • +स्तो १३०:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५६

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१८, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ५

    १०/१/१९९८, पृ. १२-१३

    १२/१/१९९७, पृ. १०-१४

    ८/१/१९९४, पृ. १२, १६

    १२/१/१९९२, पृ. २२-२३

स्तोत्र ८६:६

समासातील संदर्भ

  • +स्तो १७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २२-२४

स्तोत्र ८६:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:६
  • +स्तो ११६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २२, २३-२४

स्तोत्र ८६:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:११; स्तो ९६:५; १कर ८:५, ६
  • +अनु ३:२४; स्तो १०४:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २४-२५

स्तोत्र ८६:९

समासातील संदर्भ

  • +यश २:२, ३; जख १४:९; प्रक ७:९, १०
  • +प्रक १५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २५

स्तोत्र ८६:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:१८; दान ६:२७
  • +अनु ६:४; स्तो ८३:१८; यश ४४:६; १कर ८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २५

स्तोत्र ८६:११

तळटीपा

  • *

    किंवा “एकाग्र मनाने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:११; ११९:३३; १४३:८; यश ५४:१३
  • +स्तो ४३:३
  • +उप १२:१३; यिर्म ३२:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२०, पृ. ८-१३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९५, पृ. १२-१३

    १२/१/१९९२, पृ. २६-२८

स्तोत्र ८६:१२

समासातील संदर्भ

  • +मत्त २२:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २८-२९

स्तोत्र ८६:१३

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +ईयो ३३:२८; स्तो ५६:१३; ११६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २८-२९

स्तोत्र ८६:१४

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांनी तुला आपल्यापुढे ठेवलं नाही.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१२
  • +स्तो १०:४; ५४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २९

स्तोत्र ८६:१५

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:६; नहे ९:१७; योन ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २९

स्तोत्र ८६:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१६
  • +स्तो २८:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २९-३०

स्तोत्र ८६:१७

तळटीपा

  • *

    किंवा “पुरावा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९३, पृ. २९

    १२/१/१९९२, पृ. २९-३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ८६:१स्तो ३४:६; यश ६६:२
स्तो. ८६:२स्तो ३७:२८
स्तो. ८६:२२इत १६:९
स्तो. ८६:३स्तो ५७:१
स्तो. ८६:३स्तो २५:५
स्तो. ८६:५स्तो २५:८; १४५:९; लूक १८:१९
स्तो. ८६:५यश ५५:७; मीख ७:१८
स्तो. ८६:५स्तो १३०:७
स्तो. ८६:६स्तो १७:१
स्तो. ८६:७स्तो १८:६
स्तो. ८६:७स्तो ११६:१
स्तो. ८६:८निर्ग १५:११; स्तो ९६:५; १कर ८:५, ६
स्तो. ८६:८अनु ३:२४; स्तो १०४:२४
स्तो. ८६:९यश २:२, ३; जख १४:९; प्रक ७:९, १०
स्तो. ८६:९प्रक १५:४
स्तो. ८६:१०स्तो ७२:१८; दान ६:२७
स्तो. ८६:१०अनु ६:४; स्तो ८३:१८; यश ४४:६; १कर ८:४
स्तो. ८६:११स्तो २७:११; ११९:३३; १४३:८; यश ५४:१३
स्तो. ८६:११स्तो ४३:३
स्तो. ८६:११उप १२:१३; यिर्म ३२:३९
स्तो. ८६:१२मत्त २२:३७
स्तो. ८६:१३ईयो ३३:२८; स्तो ५६:१३; ११६:८
स्तो. ८६:१४२शमु १५:१२
स्तो. ८६:१४स्तो १०:४; ५४:३
स्तो. ८६:१५निर्ग ३४:६; नहे ९:१७; योन ४:२
स्तो. ८६:१६स्तो २५:१६
स्तो. ८६:१६स्तो २८:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ८६:१-१७

स्तोत्र

दावीदची प्रार्थना.

८६ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक* आणि मला उत्तर दे,

कारण मी असाहाय्य आणि गरीब आहे.+

 २ माझ्या जिवाचं रक्षण कर, कारण मी एकनिष्ठ आहे.+

तुझ्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या तुझ्या या सेवकाला वाचव,

कारण तू माझा देव आहेस.+

 ३ हे यहोवा, माझ्यावर कृपा कर+

कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.+

 ४ हे यहोवा, तुझ्या या सेवकाला* आनंदी होऊ दे

कारण तुझ्याकडे माझे डोळे लागले आहेत.

 ५ हे यहोवा, तू चांगला+ आणि क्षमाशील आहेस;+

तुला हाक मारणाऱ्‍या सर्वांवर तुझं अपार प्रेम* आहे.+

 ६ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;

आणि माझ्या मदतीच्या याचनांकडे लक्ष दे.+

 ७ संकटाच्या दिवशी मी तुला हाक मारतो,+

कारण तू मला नक्की उत्तर देशील.+

 ८ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोणीही नाही.+

तुझ्यासारखी कार्यं करणारा दुसरा कोणीही नाही.+

 ९ तू निर्माण केलेली सगळी राष्ट्रं

तुझ्यापुढे येऊन तुला नमन करतील.+

हे यहोवा, ती तुझ्या नावाचा गौरव करतील.+

१० कारण तू महान आणि अद्‌भुत गोष्टी करतोस;+

तू, फक्‍त तूच देव आहेस.+

११ हे यहोवा, मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे.+

मी तुझ्या सत्याच्या मार्गाने चालीन.+

मला तुझ्या नावाचं मनापासून* भय बाळगायला शिकव.+

१२ हे यहोवा, माझ्या देवा, मी अगदी पूर्ण मनाने+ तुझी स्तुती करतो

आणि मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.

१३ कारण तू माझ्यावर भरभरून एकनिष्ठ प्रेम केलं आहेस;

तू अगदी खोल कबरेतून* माझा जीव वाचवला आहेस.+

१४ हे देवा, गर्विष्ठ माणसं माझ्याविरुद्ध उठतात;+

क्रूर माणसांची टोळी माझा जीव घ्यायला टपून बसली आहे,

त्यांना तुझ्याबद्दल जराही आदर नाही.*+

१५ पण हे यहोवा, तू दयाळू आणि करुणामय* देव आहेस.

तू सहनशील, एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आणि विश्‍वासू देव आहेस.+

१६ माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्यावर कृपा कर.+

तुझ्या या सेवकाला ताकद दे+

आणि तुझ्या दासीच्या या मुलाला वाचव.

१७ मला तुझ्या चांगुलपणाची एखादी खूण* दाखव,

म्हणजे माझा द्वेष करणारे ती पाहून लज्जित होतील.

कारण हे यहोवा, मला मदत करणारा आणि माझं सांत्वन करणारा तूच आहेस.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा