यशया
२५ हे यहोवा, तू माझा देव आहेस.
मी तुझा गौरव करीन, तुझ्या नावाची मी स्तुती करीन.
तू दाखवून दिलंस, की तू विश्वासू आणि भरवशालायक आहेस.+
२ तू शहराला दगड-मातीचा ढिगारा बनवलं आहेस,
मजबूत भिंती असलेल्या शहराला तू धुळीत मिळवलं आहेस.
विदेश्यांचा मजबूत किल्ला आता राहिला नाही;
तो परत कधीच उभारला जाणार नाही.
तू वादळी पावसापासून आश्रयस्थान
आणि रखरखीत उन्हात सावली बनला आहेस.+
जेव्हा जुलूम करणाऱ्यांचा क्रोध भिंतीवर आदळणाऱ्या वादळी पावसासारखा,
५ आणि कोरड्या प्रदेशातल्या उन्हाच्या झळांसारखा असतो,
तेव्हा तू परक्यांची गर्जना शांत करतोस.
ढगाच्या छायेमुळे जशी उन्हाची झळ नाहीशी होते,
तसं तू जुलूम करणाऱ्यांच्या गाण्याचा आवाज बंद केला आहेस.
६ सैन्यांचा देव यहोवा राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांसाठी या पर्वतावर+ मेजवानी ठेवेल;
तो उत्तम अन्नपदार्थांची,+
आणि उत्तम द्राक्षारसाची मेजवानी ठेवेल;
तो चरबीयुक्त चमचमीत अन्नपदार्थांची,
आणि गाळलेल्या, उत्तम प्रतीच्या द्राक्षारसाची मेजवानी ठेवेल.
७ सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना झाकणारं कफन,
आणि सगळ्या राष्ट्रांवर पसरलेलं आच्छादन तो या पर्वतावरून काढून टाकेल.
तो संपूर्ण पृथ्वीवरून आपल्या लोकांची बदनामी दूर करेल.
कारण यहोवा स्वतः हे बोलला आहे.
९ त्या दिवशी लोक म्हणतील:
“पाहा! हा आमचा देव आहे!+
हा यहोवा आहे!
त्याच्यावर आमची आशा आहे.
चला आनंदोत्सव करू, हर्ष करू!
कारण तो आपला तारणकर्ता आहे.”+
१० या पर्वतावर यहोवाचा हात राहील.+
आणि शेणाच्या ढिगाऱ्यात गवताची काडी तुडवली जाते,
तसं मवाबला त्याच्याच जागी तुडवलं जाईल.+
११ पोहणारा पोहताना जसे आपले हात मारतो,
तसे तो आपले हात उगारून मवाबला मारेल.
तो आपल्या हातांच्या कौशल्याने
त्याची घमेंड उतरवेल.+
१२ सुरक्षेच्या उंच भिंती असलेलं त्याचं मजबूत शहर तो पाडून टाकेल,
तो ते जमीनदोस्त करून धुळीस मिळवेल.