वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • दावीदला संपूर्ण इस्राएलचा राजा बनवलं जातं (१-५)

      • यरुशलेमवर कब्जा (६-१६)

        • सीयोन, दावीदपूर (७)

      • दावीद पलिष्ट्यांना हरवतो (१७-२५)

२ शमुवेल ५:१

समासातील संदर्भ

  • +२शमु २:१, ११; १इत १२:२३
  • +१इत ११:१-३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ९

२ शमुवेल ५:२

समासातील संदर्भ

  • +१शमु १८:१३; २५:२८
  • +उत्प ४९:१०; १शमु १६:१; २५:३०; २शमु ६:२१; ७:८; १इत २८:४; स्तो ७८:७१

२ शमुवेल ५:३

समासातील संदर्भ

  • +२रा ११:१७
  • +१शमु १६:१३; २शमु २:४; प्रेका १३:२२

२ शमुवेल ५:४

समासातील संदर्भ

  • +१इत २९:२६, २७

२ शमुवेल ५:५

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१८

२ शमुवेल ५:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२३; यहो १५:६३; शास १:८, २१
  • +१इत ११:४-६

२ शमुवेल ५:७

समासातील संदर्भ

  • +१रा २:१०; नहे १२:३७

२ शमुवेल ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९७, पृ. ९-१०

२ शमुवेल ५:९

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “असं नाव त्याने दिलं.”

  • *

    किंवा “मिल्लोवर.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

समासातील संदर्भ

  • +१रा ९:१५, २४; ११:२७; २इत ३२:५
  • +१इत ११:७-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२१

२ शमुवेल ५:१०

समासातील संदर्भ

  • +१शमु १६:१३; २शमु ३:१
  • +१शमु १७:४५

२ शमुवेल ५:११

तळटीपा

  • *

    किंवा “घर.”

समासातील संदर्भ

  • +१रा ५:१, ८
  • +२इत २:३
  • +२शमु ७:२; १इत १४:१, २

२ शमुवेल ५:१२

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:१६; स्तो ४१:११; ८९:२१
  • +१रा १०:९; २इत २:११
  • +स्तो ८९:२७

२ शमुवेल ५:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१६
  • +१इत ३:५-९; १४:३-७

२ शमुवेल ५:१४

समासातील संदर्भ

  • +लूक ३:२३, ३१
  • +२शमु १२:२४

२ शमुवेल ५:१७

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:३
  • +स्तो २:२
  • +१शमु २२:१, ५; २४:२२; २शमु २३:१४; १इत १४:८

२ शमुवेल ५:१८

समासातील संदर्भ

  • +यहो १५:८, १२; १इत ११:१५; १४:९

२ शमुवेल ५:१९

समासातील संदर्भ

  • +गण २७:२१
  • +१इत १४:१०-१२

२ शमुवेल ५:२०

तळटीपा

  • *

    म्हणजे “तुटून पडण्यात तरबेज असलेला.”

समासातील संदर्भ

  • +२शमु २२:४१
  • +यश २८:२१

२ शमुवेल ५:२२

समासातील संदर्भ

  • +यहो १५:८, १२; १इत ११:१५; १४:१३-१७

२ शमुवेल ५:२५

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२१, २४
  • +यहो १६:१०
  • +लेवी २६:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. ५:१२शमु २:१, ११; १इत १२:२३
२ शमु. ५:११इत ११:१-३
२ शमु. ५:२१शमु १८:१३; २५:२८
२ शमु. ५:२उत्प ४९:१०; १शमु १६:१; २५:३०; २शमु ६:२१; ७:८; १इत २८:४; स्तो ७८:७१
२ शमु. ५:३२रा ११:१७
२ शमु. ५:३१शमु १६:१३; २शमु २:४; प्रेका १३:२२
२ शमु. ५:४१इत २९:२६, २७
२ शमु. ५:५उत्प १४:१८
२ शमु. ५:६निर्ग २३:२३; यहो १५:६३; शास १:८, २१
२ शमु. ५:६१इत ११:४-६
२ शमु. ५:७१रा २:१०; नहे १२:३७
२ शमु. ५:९१रा ९:१५, २४; ११:२७; २इत ३२:५
२ शमु. ५:९१इत ११:७-९
२ शमु. ५:१०१शमु १६:१३; २शमु ३:१
२ शमु. ५:१०१शमु १७:४५
२ शमु. ५:१११रा ५:१, ८
२ शमु. ५:११२इत २:३
२ शमु. ५:११२शमु ७:२; १इत १४:१, २
२ शमु. ५:१२२शमु ७:१६; स्तो ४१:११; ८९:२१
२ शमु. ५:१२१रा १०:९; २इत २:११
२ शमु. ५:१२स्तो ८९:२७
२ शमु. ५:१३२शमु १५:१६
२ शमु. ५:१३१इत ३:५-९; १४:३-७
२ शमु. ५:१४लूक ३:२३, ३१
२ शमु. ५:१४२शमु १२:२४
२ शमु. ५:१७२शमु ५:३
२ शमु. ५:१७स्तो २:२
२ शमु. ५:१७१शमु २२:१, ५; २४:२२; २शमु २३:१४; १इत १४:८
२ शमु. ५:१८यहो १५:८, १२; १इत ११:१५; १४:९
२ शमु. ५:१९गण २७:२१
२ शमु. ५:१९१इत १४:१०-१२
२ शमु. ५:२०२शमु २२:४१
२ शमु. ५:२०यश २८:२१
२ शमु. ५:२२यहो १५:८, १२; १इत ११:१५; १४:१३-१७
२ शमु. ५:२५यहो १८:२१, २४
२ शमु. ५:२५यहो १६:१०
२ शमु. ५:२५लेवी २६:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल ५:१-२५

२ शमुवेल

५ काही काळाने, इस्राएलचे सर्व वंश हेब्रोनमध्ये दावीदकडे आले+ आणि म्हणाले: “हे बघ! तुझ्याशी आमचं रक्‍ताचं नातं आहे.+ २ पूर्वी जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा युद्धाच्या मोहिमांमध्ये तूच इस्राएलचं नेतृत्व करायचास.+ आणि यहोवा तुला म्हणाला होता: ‘तू माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ आणि इस्राएलचा पुढारी होशील.’”+ ३ अशा प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनमध्ये दावीद राजाकडे आले आणि त्याने हेब्रोनमध्ये यहोवापुढे त्यांच्यासोबत एक करार केला.+ मग त्यांनी संपूर्ण इस्राएलचा राजा म्हणून दावीदचा अभिषेक केला.+

४ दावीद राजा बनला तेव्हा तो ३० वर्षांचा होता. त्याने ४० वर्षं राज्य केलं.+ ५ त्याने हेब्रोनमधून साडेसात वर्षं यहूदावर राज्य केलं; तर, यरुशलेममधून+ त्याने ३३ वर्षं संपूर्ण इस्राएल आणि यहूदावर राज्य केलं. ६ पुढे दावीद राजा आणि त्याची माणसं यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी+ लोकांशी लढाई करायला गेली. तेव्हा यबूसी लोकांनी दावीदला असा टोमणा मारला: “तू आमच्या इथे पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाहीस! आमच्यातले आंधळे-पांगळेसुद्धा तुला हाकलून लावतील.” त्यांना असं वाटत होतं, की दावीद कधीच तिथे येऊ शकणार नाही.+ ७ पण दावीदने सीयोनचा किल्ला काबीज केला; आज त्याला दावीदपूर+ असं म्हटलं जातं. ८ त्या दिवशी दावीद म्हणाला: “यबूसी लोकांवर हल्ला करणाऱ्‍यांनी पाण्याच्या खंदकातून जावं आणि दावीदचा द्वेष करणाऱ्‍या त्या ‘आंधळ्या आणि पांगळ्या’ लोकांना मारून टाकावं!” म्हणून असं म्हटलं जातं: “आंधळे आणि पांगळे कधीच इथे पाऊल ठेवू शकणार नाहीत.” ९ नंतर दावीद त्या किल्ल्यातच राहू लागला. आणि त्याला दावीदपूर असं नाव पडलं.* दावीद तिथे टेकडीवर*+ आणि शहरात इतर ठिकाणी मजबूत भिंती आणि इमारती बांधू लागला.+ १० अशा प्रकारे, दावीद अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला.+ आणि सैन्यांचा देव यहोवा त्याच्या पाठीशी होता.+

११ सोरचा राजा हीराम+ याने दावीदकडे आपले दूत पाठवले. त्यासोबतच त्याने देवदाराचं लाकूड,+ शिवाय सुतारकाम करणारे आणि भिंती बांधण्यासाठी गवंडीही पाठवले. ते दावीदसाठी राजमहाल* बांधू लागले.+ १२ यहोवानेच इस्राएलवर आपलं राज्यपद स्थिर केलं आहे+ आणि त्यानेच त्याच्या इस्राएली लोकांसाठी+ आपल्या राज्याची भरभराट केली आहे,+ याची दावीदला जाणीव झाली.

१३ हेब्रोनमधून यरुशलेममध्ये आल्यावर दावीदने आणखी काही उपपत्नी+ व बायका केल्या. आणि दावीदला आणखी मुलंमुली झाल्या.+ १४ यरुशलेममध्ये झालेल्या त्याच्या मुलांची नावं अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान,+ शलमोन,+ १५ इभार, अलीशवा, नेफेग, याफीय, १६ अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.

१७ दावीदला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं आहे+ ही गोष्ट जेव्हा पलिष्टी लोकांनी ऐकली, तेव्हा ते सगळे त्याच्याशी लढायला आले.+ दावीदला हे समजलं तेव्हा तो एका सुरक्षित ठिकाणी निघून गेला.+ १८ इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईम खोऱ्‍यात पसरले.+ १९ तेव्हा दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी पलिष्ट्यांवर हल्ला करू का? तू त्यांना माझ्या हाती देशील का?” त्यावर यहोवा दावीदला म्हणाला: “जा, त्यांच्यावर हल्ला कर. कारण मी पलिष्ट्यांना नक्की तुझ्या हाती देईन.”+ २० म्हणून मग दावीद बाल-परासीम इथे आला आणि त्याने पलिष्ट्यांवर हल्ला करून त्यांना मारून टाकलं. मग दावीद म्हणाला: “यहोवा माझ्यापुढे जाऊन पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला+ आणि त्याने त्यांचा नाश केला.” त्यामुळे दावीदने त्या जागेचं नाव बाल-परासीम* असं ठेवलं.+ २१ पलिष्टी लोक आपल्या मूर्ती तिथेच सोडून पळून गेले. दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या मूर्ती उचलून नेल्या.

२२ नंतर पलिष्टी लोक पुन्हा एकदा आले आणि रेफाईम खोऱ्‍यात पसरले.+ २३ तेव्हा काय करावं याबद्दल दावीदने यहोवाला विचारलं. त्यावर तो त्याला म्हणाला: “त्यांच्यावर समोरून हल्ला करू नकोस; तर त्यांना वळसा घालून त्यांच्या पाठीमागे जा. आणि मग तुतीच्या झाडांसमोर त्यांच्यावर हल्ला कर. २४ तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला चाल करून येणाऱ्‍या सैन्याचा आवाज येईल तेव्हा लगेच हल्ला कर. कारण पलिष्ट्यांच्या सैन्याचा नाश करायला यहोवा आधीच पुढे गेलेला असेल.” २५ मग, यहोवाने जसं सांगितलं होतं अगदी तसंच दावीदने केलं. आणि तो गेबापासून+ गेजेरपर्यंत+ पलिष्ट्यांना तलवारीने मारत गेला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा