नीतिवचनं
४ “लोकांनो, मी तुम्हाला हाक मारते;
मी तुम्हा सर्वांना असं सांगते:
६ ऐका, कारण मी जे सांगत आहे ते महत्त्वाचं आहे,
माझ्या ओठांतून निघणाऱ्या गोष्टी योग्य आहेत.
७ मी हळू आवाजात सत्याची वचनं बोलते,
माझ्या ओठांना दुष्टपणाच्या गोष्टींची घृणा वाटते.
८ माझ्या तोंडून फक्त नीतीचे बोल निघतात.
त्यांपैकी कोणतेही फसवे किंवा कपटी नाहीत.
९ ते प्रामाणिक आहेत हे समंजस लोकांना कळतं,
आणि ते योग्य आहेत हे ज्ञानी लोक ओळखतात.
१३ यहोवाची भीती बाळगणं म्हणजे वाइटाचा द्वेष करणं.+
अहंकार, गर्व,+ दुष्टपणा आणि कपटीपणाच्या गोष्टी+ यांचा मला तिटकारा आहे.
१६ माझ्यामुळेच शासक राज्य करतात
आणि अधिकारी नीतीने न्याय करतात.
१९ माझ्या देणग्या सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा मौल्यवान असतात,
आणि मी दिलेल्या गोष्टी सगळ्यात उत्तम चांदीपेक्षाही चांगल्या
असतात.+
२० मी नीतिमत्त्वाच्या मार्गाने चालते;
मी न्यायाच्या वाटांवर मधोमध चालते.
२१ माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते,
मी त्यांची कोठारं भरून टाकते.
२२ यहोवाने आपल्या कार्यांची सुरुवात म्हणून मला उत्पन्न केलं.+
फार पूर्वीच्या त्याच्या अद्भुत कार्यांपैकी मी पहिली होते.+
२३ मला अगदी प्राचीन काळापासून, सुरुवातीपासून;+
पृथ्वी अस्तित्वात येण्याच्याही आधीपासून स्थापन करण्यात आलं.+
२४ जेव्हा महासागर नव्हते;+ पाण्याने ओसंडून वाहणारे झरे नव्हते,
तेव्हा मी जन्माला आले.
२५ पर्वतांना आपल्या जागी स्थिर करण्यात आलं
आणि डोंगर निर्माण करण्यात आले, त्याआधी मी जन्माला आले.
२६ त्या वेळी, त्याने पृथ्वी आणि तिच्यावरची रानंवनं,
किंवा जमिनीतल्या मातीची पहिली ढेकळंही निर्माण केली नव्हती.
२७ त्याने आकाश तयार केलं,+ तेव्हा मी तिथे होते;
जेव्हा त्याने पाण्यावर क्षितिजाची रेघ* ओढली;+
२८ जेव्हा त्याने आकाशात ढगांची स्थापना केली*
आणि महासागरातले झरे उत्पन्न केले;
२९ जेव्हा त्याने समुद्रासाठी सीमा घालून दिली
आणि त्याच्या लाटांनी ती पार करू नये, असा आदेश दिला;+
जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये स्थिर केले,*
दिवसेंदिवस मी त्याला खूप प्रिय वाटू लागले.+
मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचे.+
३१ त्याने मानवांसाठी बनवलेली पृथ्वी पाहून मला खूप आनंद झाला
आणि मानवांबद्दल मला खूप जिव्हाळा होता.
३२ म्हणून, माझ्या मुलांनो, माझं ऐका;
जे माझ्या मार्गांनी चालतात ते सुखी असतात.