स्तोत्र
संचालकासाठी. यहोवाने दावीदला त्याच्या सर्व शत्रूंच्या आणि शौलच्या हातून सोडवलं, तेव्हा यहोवाचा सेवक दावीद याने यहोवासाठी हे गीत रचलं. तो म्हणाला:+
१८ हे यहोवा, तू माझी ताकद आहेस,+ माझं तुझ्यावर प्रेम आहे.
२ यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे, तोच मला वाचवतो.+
माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतलाय.
तो माझी ढाल, माझं तारणाचं शिंग* आणि माझा सुरक्षित आश्रय* आहे.+
३ यहोवा स्तुतिपात्र आहे, मी त्याला प्रार्थना करतो;
तो मला माझ्या शत्रूंपासून वाचवेल.+
६ संकटात मी यहोवाला हाक मारली,
मी माझ्या देवाला मदतीची याचना करत राहिलो.
७ तेव्हा पृथ्वी हादरली आणि थरथरू लागली;+
पर्वत लटपटू लागले
आणि त्यांना हादरे बसले, कारण त्याचा क्रोध भडकला होता.+
८ त्याच्या नाकपुड्यांतून धूर,
आणि त्याच्या तोंडातून भस्म करणारी आग निघू लागली;+
त्याच्यासमोर निखारे धगधगत होते.
१० करुबावर* स्वार होऊन तो उडत आला.+
स्वर्गदूताच्या पंखांवरून तो खाली झेपावला.+
१२ त्याच्यासमोर असलेल्या तेजाने,
ढगांतून गारा आणि निखारे बाहेर पडले.
तेव्हा गारा आणि निखारे बरसू लागले.
१५ हे यहोवा, तुझ्या धमकावण्यामुळे जमिनीचे पाये उघडे पडले;
तुझ्या नाकपुड्यांतून निघणाऱ्या जोरदार श्वासाने,
१६ तो उंचावरून खाली वाकला;
त्याने मला धरून, खोल पाण्यातून बाहेर काढलं.+
१७ त्याने माझा द्वेष करणाऱ्या, माझ्यापेक्षा बलवान असलेल्या,
माझ्या शक्तिशाली शत्रूपासून मला सोडवलं.+
१८ माझ्या संकटाच्या दिवशी ते माझ्यावर उठले,+
पण यहोवा माझ्या पाठीशी होता.
२१ कारण मी यहोवाच्या मार्गांनी चाललो;
माझ्या देवाला सोडून देण्याचा दुष्टपणा मी केला नाही.
२२ त्याचे सर्व न्याय-निर्णय* माझ्यासमोर आहेत;
मी त्याच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करणार नाही.
२४ यहोवाने मला माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;
माझ्या हातांच्या निर्दोषतेप्रमाणे मला प्रतिफळ द्यावं.+
२८ हे यहोवा, तूच माझा दिवा पेटवतोस,
माझ्या देवा, तू माझ्या अंधाराला प्रकाशात बदलतोस.+
त्याचा आश्रय घेणाऱ्या सर्वांसाठी तो ढालीसारखा आहे.+
३१ कारण यहोवाशिवाय दुसरा कोण देव आहे?+
आमच्या देवासारखा भक्कम खडक कोण आहे?+
३३ तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे चपळ करतो;
तो मला उंच ठिकाणी उभं करतो.+
३४ तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो;
माझे बाहू तांब्याचं धनुष्य वाकवू शकतात.
आणि तुझी नम्रता मला महान बनवते.+
३६ माझ्या पावलांसाठी तू मार्ग रुंद करतोस;
माझे पाय घसरणार नाहीत.+
३७ मी आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना गाठीन;
त्यांचा सर्वनाश होईपर्यंत मी परत येणार नाही.
३८ मी त्यांना असं चिरडून टाकीन, की ते पुन्हा उठूच शकणार नाहीत;+
ते माझ्या पायांजवळ पडतील.
३९ तू मला शक्ती देऊन युद्धासाठी सज्ज करशील;
माझ्या वैऱ्यांना तू माझ्यासमोर खाली पाडशील.+
४१ ते मदतीची याचना करतात, पण त्यांना वाचवायला कोणीही नाही;
ते यहोवालाही हाक मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही.
४२ वाऱ्यासोबत उडून जाणाऱ्या धुळीसारखा मी त्यांचा भुगा करीन;
रस्त्यावरच्या चिखलासारखं मी त्यांना फेकून देईन.
४३ माझी टीका करणाऱ्या लोकांपासून तू मला वाचवशील.+
तू मला राष्ट्रांवर प्रमुख म्हणून नेमशील.+
मी ज्या लोकांना ओळखत नाही तेही माझी सेवा करतील.+
४४ माझ्याबद्दल नुसतं ऐकूनही ते माझी आज्ञा पाळतील;
विदेशी लोक घाबरत घाबरत माझ्यापुढे येतील.+
४५ विदेशी लोकांचं धैर्य खचेल,
ते थरथर कापत आपल्या गडांमधून बाहेर येतील.
४६ यहोवा जिवंत देव आहे! खडकासारख्या माझ्या देवाची स्तुती होवो!+
तारण करणाऱ्या देवाचा सन्मान होवो!+
४७ खरा देव माझ्या शत्रूंचा बदला घेतो;+
तो राष्ट्रांना माझ्या अधीन करतो.
४८ तो माझ्या संतप्त शत्रूंपासून मला सोडवतो.
हे देवा, माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून तू मला दूर उंचावर ठेवतोस;+
हिंसाचार करणाऱ्यापासून तू मला वाचवतोस.