स्तोत्र
दावीदचं गीत. मस्कील.*
३२ सुखी आहे तो माणूस, ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्याचं पाप झाकण्यात आलं आहे!+
२ सुखी आहे तो माणूस, ज्याला यहोवा दोषी ठरवत नाही+
आणि ज्याच्या मनात कपट नाही!
४ कारण रात्रंदिवस तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्या मनावर होतं.+
उन्हाच्या तापाने पाणी सुकून जातं, तशी माझी ताकद नाहीशी झाली. (सेला )
मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+
तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला )
मग महापूर आला, तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.
सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील.+ (सेला )
८ तू म्हणालास, “मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.+
मी तुझ्याकडे लक्ष देऊन* तुला सल्ला देईन.+
९ बुद्धी नसलेल्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे होऊ नका;+
त्यांना आवरण्यासाठी लगाम किंवा दोरी लागते,
तेव्हाच ते तुमच्याजवळ येतात.”
१० दुष्टाला पुष्कळ दुःखं भोगावी लागतात;
पण यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यावर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.*+
११ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंद करा आणि हर्षित व्हा;
सरळ मनाच्या लोकांनो, आनंदाने जयजयकार करा.