स्तोत्र
९४ दुष्टांचा बदला घेणाऱ्या देवा, यहोवा,+
दुष्टांचा बदला घेणाऱ्या देवा, तुझं तेज चमकू दे!
२ हे पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ.+
गर्विष्ठांना त्यांच्या कार्यांप्रमाणे मोबदला दे.+
३ हे यहोवा, दुष्ट लोकांची कधीपर्यंत भरभराट होत राहील?
कधीपर्यंत?+
४ ते बडबडत राहतात आणि उद्धटपणे बोलतात;
वाईट कृत्यं करणारे सर्व जण स्वतःची बढाई मारतात.
५ हे यहोवा, ते तुझ्या लोकांना पायाखाली तुडवतात,+
ते तुझ्या वारशाच्या लोकांवर जुलूम करतात.
६ ते विधवेला आणि देशात राहायला आलेल्या विदेश्याला मारून टाकतात.
ते अनाथ* मुलांचा खून करतात.
८ अविचारी माणसांनो, हे समजून घ्या;
मूर्ख माणसांनो, तुम्ही शहाणपणाने कधी वागाल?+
९ ज्याने माणसाला कान दिले, तो ऐकू शकत नाही का?
ज्याने त्याला डोळे दिले, तो पाहू शकत नाही का?+
१० जो राष्ट्रांना सुधारतो, तो ताडन करू शकत नाही का?+
लोकांना ज्ञान देणारा तोच आहे!+
११ यहोवा माणसांचे विचार जाणतो,
त्यांचे विचार व्यर्थ आहेत हे त्याला माहीत आहे.+
१३ दुष्टांसाठी खड्डा खोदला जात नाही तोपर्यंत,+
तू त्या माणसाला संकटाच्या काळात शांती देशील.
१५ कारण पुन्हा एकदा नीतिमत्त्वाने न्याय केला जाईल
आणि सरळ मनाचे सर्व लोक त्याचं पालन करतील.
१६ दुष्टांच्या विरोधात माझ्या वतीने कोण उभं राहील?
वाईट कृत्यं करणाऱ्यांविरुद्ध कोण माझ्या बाजूने उभं राहील?
२० दुष्ट शासकांचा* तुझ्याशी काय संबंध?
ते कायद्याच्या नावाखाली अत्याचार करण्याच्या योजना आखतात.+
२३ तो त्यांची दुष्ट कामं त्यांच्यावरच उलटवेल.+
त्यांच्या दुष्टपणानेच तो त्यांचा नाश करेल.*