नीतिवचनं
६ माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्यासाठी जामीन राहिला असशील,+
जर तू एखाद्या परक्या माणसासोबत करार केला असशील,+
२ आणि जर तू वचन देऊन अडकला असशील,
किंवा तुझ्या तोंडून निघालेल्या शब्दांत पकडला गेला असशील,+
३ तर माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस.
तेव्हा, स्वतःला सोडवण्यासाठी असं कर:
त्या शेजाऱ्याकडे जाऊन, तुझ्यावर दया करण्याची त्याला नम्रपणे आणि कळकळीने विनंती कर.+
४ जोपर्यंत तू असं करत नाहीस, तोपर्यंत आपल्या डोळ्यांवर झोप येऊ देऊ नकोस;
किंवा आपल्या पापण्या मिटून विश्रांती घेऊ नकोस.
५ शिकाऱ्याच्या हाती सापडलेल्या हरिणीप्रमाणे;
पारध्याच्या हाती सापडलेल्या पक्ष्याप्रमाणे, स्वतःला सोडवून घे.
७ तिच्यावर कोणी सेनापती, अधिकारी किंवा शासक नसतो,
८ तरी ती उन्हाळ्यात आपल्या अन्नाची सोय करते+
आणि कापणीच्या काळात आपली अन्नसामग्री गोळा करते.
९ अरे आळश्या, कधीपर्यंत असा लोळत पडशील?
कधी आपल्या झोपेतून जागा होशील?
१० जराशी डुलकी घेतो, जराशी झोप घेतो,
हात छातीशी घेऊन अजून थोडासा आराम करतो,+
११ असं म्हणत राहिलास, तर गरिबी एखाद्या लुटारूप्रमाणे,
आणि दारिद्र्य एखाद्या शस्त्रधारी माणसाप्रमाणे तुला गाठेल.+
१२ रिकामटेकडा आणि दुष्ट माणूस कपटीपणाच्या गोष्टी करत फिरतो;+
१३ तो डोळे मिचकावतो,+ पायांनी इशारे करतो, आणि बोटांनी खाणाखुणा करतो.
१४ त्याचं मन कपटी असतं.
तो नेहमी दुष्ट योजना करत राहतो+ आणि भांडणं लावत फिरतो.+
१७ गर्विष्ठ नजर,+ खोटं बोलणारी जीभ,+ निर्दोष रक्त सांडणारे हात,+
१८ दुष्ट कारस्थानं करणारं मन,+ वाईट गोष्टींकडे घाईघाईने धावणारे पाय,
१९ क्षणाक्षणाला लबाड बोलणारा खोटा साक्षीदार+
आणि भावाभावांत भांडणतंटे उत्पन्न करणारा माणूस.+
२१ त्यांचे शब्द नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून ठेव
आणि ते आपल्या गळ्यात बांधून ठेव.
२२ तू चालशील तेव्हा ते तुला मार्ग दाखवतील;
तू झोपशील तेव्हा ते तुझ्यावर पहारा देतील
आणि तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील.*
२३ कारण आज्ञा ही दिव्यासारखी,+
नियम हा प्रकाशासारखा+
आणि सुधारणुकीसाठी दिलेलं ताडन हे जीवनाच्या मार्गासारखं आहे.+
२६ कारण वेश्येमुळे माणूस कंगाल होतो*+
आणि दुसऱ्याच्या बायकोच्या नादी लागणारा आपला अनमोल जीव* गमावून बसतो.
२७ जो छातीशी विस्तव धरतो, त्याचे कपडे जळणार नाहीत का?+
२८ किंवा जो निखाऱ्यांवर चालतो, त्याचे पाय भाजणार नाहीत का?
२९ दुसऱ्याच्या बायकोसोबत संबंध ठेवणाऱ्याच्या बाबतीतही तसंच आहे;
तिला स्पर्श करणाऱ्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही.+
३१ तरीपण, तो पकडला जातो तेव्हा त्याला सातपट भरपाई द्यावी लागते.
त्याला आपल्या घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू देऊन टाकाव्या लागतात.+