स्तोत्र
ל [लामेद ]
१० हे यहोवा, तू असा दूर का उभा राहतोस?
संकटं येतात तेव्हा तू आमच्यापासून का लपतोस?+
२ दुष्ट गर्विष्ठपणे असाहाय्य माणसाचा पाठलाग करतो,+
पण त्याने रचलेल्या कटकारस्थानांमध्ये तो स्वतःच अडकेल.+
נ [नून ]
तो यहोवाचा अनादर करतो.
४ दुष्ट आपल्या गर्वामुळे देवाचा शोध घेत नाही;
“देवच नाही,” अशी त्याला खातरी आहे.+
तो आपल्या सर्व विरोधकांना तुच्छ लेखतो.
६ तो आपल्या मनात म्हणतो: “मी कधीच पडणार नाही;*
पिढ्या न् पिढ्या, मला कधीच संकट पाहावं लागणार नाही.”+
פ [पे ]
७ त्याच्या तोंडात कायम शिव्याशाप, लबाड्या आणि धमक्या असतात;+
छळाच्या आणि नाशाच्या गोष्टी त्याच्या जिभेवर असतात.+
८ तो वस्त्यांजवळ टपून बसलेला असतो;
लपण्याच्या ठिकाणातून बाहेर येऊन, तो निर्दोष माणसाची हत्या करतो.+
ע [आयन ]
त्याचे डोळे लाचार माणसाची शिकार करण्यासाठी वाट पाहत असतात.+
९ सिंह आपल्या गुहेत* असतो, तसा दुष्ट आपल्या लपण्याच्या ठिकाणी टपलेला असतो.+
असाहाय्य माणसाला धरण्यासाठी तो टपून बसतो.
तो जाळं ओढून बंद करतो आणि असाहाय्य माणसाला त्यात धरतो.+
१० लाचार चिरडला जातो आणि त्याला धुळीला मिळवलं जातं;
असाहाय्य माणसं त्याच्या तावडीत* सापडतात.
११ तो मनात म्हणतो: “देव विसरलाय.+
त्याने आपलं तोंड फिरवलंय.
तो लक्षच देत नाही.”+
ק [खुफ ]
१२ हे यहोवा, ऊठ.+ हे देवा, आपलं सामर्थ्य दाखव!+
असाहाय्य माणसांना विसरू नकोस.+
१३ दुष्ट माणूस देवाचा अनादर का करतो?
तो मनात म्हणतो: “देव माझ्याकडून हिशोब मागणार नाही.”
ר [रेश ]
१४ पण तुला संकटं आणि विपत्ती नक्की दिसतात.
त्यांना पाहून तू पाऊल उचलतोस.+
ש [शिन ]
१५ दुष्ट आणि वाईट माणसाचा हात मोडून टाक,+
म्हणजे जेव्हा तू त्याची दुष्टता शोधशील,
तेव्हा तुला ती सापडणार नाही.
१६ यहोवा सदासर्वकाळाचा राजा आहे.+
दुष्ट राष्ट्रांचा पृथ्वीवरून नाश झाला आहे.+
ת [ताव ]
१७ पण हे यहोवा, तू नम्र लोकांची विनंती ऐकशील.+