स्तोत्र
दावीदचं गीत. नेहिलोथसाठी* संचालकाला सूचना.
५ हे यहोवा, माझे शब्द ऐक.+
माझे उसासे लक्ष देऊन ऐक.
२ हे माझ्या राजा, माझ्या देवा! माझ्या याचनेकडे लक्ष दे,
कारण मी तुला विनवणी करतोय.
५ गर्विष्ठ माणूस तुझ्यापुढे उभा राहू शकणार नाही.
दुष्टपणे वागणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतोस.+
६ खोटं बोलणाऱ्यांचा तू नाश करशील.+
हिंसक आणि कपटी लोकांची* यहोवाला घृणा वाटते.+
७ मी तर तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे+ तुझ्या मंदिरात येईन;+
आदरपूर्ण भीतीने मी तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.+
८ हे यहोवा, माझ्या शत्रूंनी मला घेरलंय;
म्हणून, मला तुझ्या नीतिमान मार्गांवर चालव.
तुझा मार्ग माझ्यासाठी मोकळा कर.+
९ कारण त्यांचा एकही शब्द भरवशालायक नाही;
त्यांच्या मनात फक्त कपट भरलंय;
त्यांचं तोंड म्हणजे उघडी कबर!
ते आपल्या जिभेने खोटी स्तुती करत राहतात.*+
१० पण देव त्यांना दोषी ठरवेल;
ते स्वतःच्याच कारस्थानांमुळे अडखळून पडतील.+
त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना हाकलून लाव,
कारण त्यांनी तुझ्याविरुद्ध बंड केलंय.
११ पण तुझा आश्रय घेणारे सर्व आनंदी होतील;+
ते सतत जल्लोष करतील.
तू त्यांच्या वैऱ्यांना त्यांच्याजवळ येऊ देणार नाहीस;
तुझ्या नावावर प्रेम करणारे तुझ्यामुळे हर्षित होतील.
१२ कारण हे यहोवा, तू नीतिमान लोकांना आशीर्वाद देशील;
तुझ्या कृपेची मोठी ढाल त्यांचं संरक्षण करेल.+