स्तोत्र
तिसरं पुस्तक
(स्तोत्रं ७३-८९)
आसाफचं गीत.+
७३ देव इस्राएलला, शुद्ध मनाच्या लोकांना खरोखर चांगुलपणा दाखवतो.+
२ पण माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती;
मी पडण्याच्या बेतात होतो.+
६ त्यामुळे गर्व त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे;+
हिंसा ते वस्त्रासारखी पांघरतात.
७ लठ्ठपणामुळे* त्यांचे डोळे सुजले आहेत;
त्यांनी कल्पनाही केली नव्हती इतकं त्यांनी मिळवलंय.
८ ते तुच्छतेने हसतात आणि दुष्टपणे बोलतात.+
ते उद्धटपणे इतरांना छळण्याच्या धमक्या देतात.+
९ ते आकाशाइतके उंच असल्यासारखे बोलतात,
ते पृथ्वीवर बढाया मारत फिरतात.
१० म्हणून, देवाचे* लोक त्यांच्याकडे वळतात,
त्यांच्याजवळ असलेल्या भरपूर पाण्यातून ते पितात.
११ ते म्हणतात: “देवाला कसं कळेल?+
सर्वोच्च देवाला या गोष्टी खरंच माहीत आहेत का?”
१२ तर दुष्ट हे असे असतात; त्यांचं सगळं सुरळीत चालतं.+
ते आपली संपत्ती वाढवत राहतात.+
१३ खरंच, मी उगाचच माझं हृदय शुद्ध ठेवलं
आणि निर्दोषतेने आपले हात धुतले.+
१५ पण जर मी मनातल्या या गोष्टी बोलून दाखवल्या असत्या,
तर ते तुझ्या लोकांचा* विश्वासघात करण्यासारखं ठरलं असतं.
१६ मी या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला,
तेव्हा मला मनस्ताप झाला.
१७ शेवटी, मी देवाच्या महान उपासना मंडपात आलो
आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार केला.
१८ खरंच, तू त्यांना निसरड्या जमिनीवर ठेवलं आहेस.+
तू त्यांना खाली पाडून, त्यांचा नाश होऊ देतोस.+
१९ ते एका क्षणात धुळीला मिळतात!+
अगदी अचानक त्यांचा भयंकर अंत होतो!
२० जागा झाल्यावर जसा माणूस स्वप्न विसरून जातो,
तसा हे यहोवा, तू उठशील तेव्हा त्यांना झिडकारशील.*
२२ मी अविचारी आणि मूर्ख माणसासारखा विचार करत होतो;
तुझ्यापुढे मी एखाद्या बुद्धिहीन पशूसारखा झालो होतो.
२५ स्वर्गात मला तुझ्याशिवाय कोण आहे?
तुझ्याशिवाय या पृथ्वीवर मला आणखी काहीही नको.+
२६ माझं शरीर आणि मन जरी थकलं,
तरी देव माझा खडक आहे, तो माझ्या मनाला बळ देतो.
तोच माझा सर्वकाळाचा वाटा आहे.+
२७ तुझ्यापासून दूर राहणाऱ्यांचा नक्कीच नाश होईल.
तुझ्याशी अविश्वासूपणे वागून, तुला सोडून देणाऱ्यांचा* तू सर्वनाश करशील.*+
२८ पण, माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.+
मी सर्वोच्च प्रभू यहोवा याचा आश्रय घेतला आहे;
मी त्याची सगळी कार्यं घोषित करीन.+