१ राजे
२ दावीद आपल्या आयुष्याच्या अखेरीस येऊन पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या मुलाला, शलमोनला या सूचना दिल्या: २ “मी आता मरणार आहे. तेव्हा हिंमत धर+ आणि खंबीर हो.+ ३ तुझा देव यहोवा याच्या बाबतीत असलेलं तुझं कर्तव्य पूर्ण कर. त्याने सांगितलेल्या मार्गांवर चाल. मोशेच्या नियमशास्त्रात+ लिहिलेले त्याचे कायदे, त्याच्या आज्ञा, न्याय-निर्णय* आणि स्मरण-सूचना* यांचं पालन कर. म्हणजे मग, तू जे काही करशील त्यात आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तुला यश मिळेल.* ४ आणि यहोवाने मला जे वचन दिलं होतं ते तो पूर्ण करेल. त्याने असं वचन दिलं होतं: ‘तुझी मुलं माझ्यासमोर पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने*+ विश्वासूपणे चालत राहिली आणि त्यांनी आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं, तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+
५ तसंच, सरूवाचा मुलगा यवाब माझ्याशी कसा वागला हे तुला चांगलं माहीत आहे. आणि त्याने इस्राएलच्या दोन सेनापतींच्या बाबतीत, म्हणजे नेरचा मुलगा अबनेर+ आणि येथेरचा मुलगा अमासा+ यांच्या बाबतीत काय केलं हेसुद्धा तुला माहीत आहे. त्याने शांतीच्या काळात त्यांचा खून करून युद्धाच्या काळाप्रमाणे रक्त सांडलं.+ असं करून त्याने आपला कमरबंद आणि पायातले जोडे रक्ताने डागाळले. ६ म्हणून तू आपल्या बुद्धीचा वापर कर आणि त्याच्या पिकलेल्या केसांना शांतीने कबरेत* जाऊ देऊ नकोस.+
७ पण गिलादी बर्जिल्ल्य+ याच्या मुलांवर मात्र तू एकनिष्ठ प्रेम कर. तुझ्यासोबत तुझ्या मेजावर जेवणाऱ्यांमध्ये तेही असावेत. कारण तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो,+ तेव्हा त्यांनीही मला मदत केली होती.+
८ आणि बहुरीममध्ये राहणाऱ्या बन्यामीन वंशातल्या गेराचा मुलगा शिमी हासुद्धा तुझ्याजवळ आहे. ज्या दिवशी मी महनाइमला+ जात होतो, त्या दिवशी त्याने मला भयंकर शिव्याशाप दिले होते.+ पण तो यार्देनजवळ मला भेटायला आला, तेव्हा मी यहोवाच्या नावाने त्याला शपथ देऊन म्हणालो होतो: ‘मी तुला मारून टाकणार नाही.’+ ९ पण आता त्याला शिक्षा दिल्याशिवाय सोडू नकोस.+ तू बुद्धिमान आहेस, आणि त्याच्या बाबतीत काय करायचं हे तुला माहीत आहे. तू त्याला म्हातारा होऊन शांतीने मरू देऊ नकोस.”*+
१० नंतर दावीदचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात+ दफन करण्यात आलं. ११ दावीदने इस्राएलवर ४० वर्षं राज्य केलं; त्याने हेब्रोनमधून+ ७ वर्षं आणि यरुशलेममधून ३३ वर्षं राज्य केलं.+
१२ मग शलमोन आपल्या वडिलांच्या, दावीदच्या राजासनावर बसला आणि हळूहळू त्याचं राज्य बळकट होत गेलं.+
१३ काही काळाने मग हग्गीथचा मुलगा अदोनीया हा शलमोनच्या आईकडे, बथशेबाकडे आला. तिने त्याला विचारलं: “तू चांगल्या हेतूने आला आहेस ना?” तो म्हणाला: “हो.” १४ पुढे तो म्हणाला: “मला तुमच्याशी काही बोलायचंय.” ती म्हणाली: “बोल.” १५ तेव्हा तो म्हणाला: “तुम्हाला तर माहीतच आहे, की राज्यपद मला मिळणार होतं आणि मी राजा बनावं अशी सगळ्या इस्राएलची अपेक्षा होती.+ पण राज्यपद माझ्यापासून जाऊन माझ्या भावाला मिळालं. कारण यहोवाने त्याला ते दिलं.+ १६ पण आता तुमच्याकडे माझी एकच विनंती आहे. मला नाही म्हणू नका.” त्यावर ती त्याला म्हणाली: “सांग.” १७ तो म्हणाला: “कृपा करून शलमोन राजाला सांगा, की शूनेमकरीण अबीशग+ मला बायको करून दे. तो तुम्हाला नाही म्हणणार नाही.” १८ त्यावर बथशेबा म्हणाली: “ठीक आहे. मी तुझ्यासाठी राजाशी बोलते.”
१९ मग बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. ती आली तेव्हा तिला भेटायला राजा लगेच आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तिला दंडवत घातला. मग तो आपल्या राजासनावर जाऊन बसला. आणि त्याने आपल्या आईसाठी आपल्या उजवीकडे एक आसन ठेवायला सांगितलं. २० मग ती त्याला म्हणाली: “मी तुझ्याकडे एक छोटीशी विनंती करते. मला नाही म्हणू नकोस.” तेव्हा राजा तिला म्हणाला: “आई सांग! मी तुला नाही म्हणणार नाही.” २१ ती म्हणाली: “शूनेमकरीण अबीशग ही तुझ्या भावाला, अदोनीयाला बायको करून दे.” २२ त्यावर शलमोन राजा आपल्या आईला म्हणाला: “अदोनीयासाठी तू फक्त शूनेमकरीण अबीशगच का मागितलीस? त्याच्यासाठी माझं राज्यसुद्धा मागायचं होतंस ना!+ नाहीतरी त्याला अब्याथार याजकाचा आणि सरूवाच्या मुलाचा,+ यवाबचा पाठिंबा आहेच.+ शिवाय तो माझा मोठा भाऊही आहे.”+
२३ मग शलमोन राजा यहोवाच्या नावाने शपथ घेऊन म्हणाला: “अदोनीयाने अशी विनंती केली, म्हणून त्याला आपला जीव गमवावाच लागेल. आणि तसं जर झालं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो. २४ ज्या जिवंत देवाने, यहोवाने मला माझ्या वडिलांच्या, दावीदच्या राजासनावर बसवलं आणि माझं राज्य स्थिर केलं;+ आणि ज्याने आपल्या वचनाप्रमाणे मला राजघराणं* दिलं+ त्या देवाची शपथ, आजच्या आज अदोनीयाला मारून टाकलं जाईल.”+ २५ मग शलमोन राजाने लगेच यहोयादाचा मुलगा बनाया+ याला पाठवलं. त्याने जाऊन अदोनीयावर असा वार केला की तो मेला.
२६ नंतर, अब्याथार+ याजकाला राजा म्हणाला: “तू अनाथोथ+ इथे आपल्या शेतांकडे जा. खरंतर तुला मृत्युदंड मिळाला पाहिजे. पण आज मी तुला ठार मारणार नाही. कारण, माझे वडील दावीद यांच्यासमोर तू सर्वोच्च प्रभू यहोवा याच्या कराराची पेटी उचलायचास.+ आणि माझ्या वडिलांनी जी संकटं सोसली त्या सगळ्यांत तू त्यांच्यासोबत होतास.”+ २७ मग शलमोनने यहोवाचा याजक अब्याथार याला त्याच्या सेवेतून काढून टाकलं. अशा प्रकारे, यहोवाने एलीच्या घराण्याविरुद्ध+ शिलो+ इथे जे सांगितलं होतं ते पूर्ण झालं.
२८ यवाबला ही खबर मिळाली तेव्हा तो यहोवाच्या तंबूकडे पळून गेला,+ आणि तिथे जाऊन तो वेदीची शिंगं घट्ट धरून राहिला; कारण त्याने अबशालोमला जरी पाठिंबा दिला नव्हता,+ तरी अदोनीयाला त्याने पाठिंबा दिला होता.+ २९ मग शलमोन राजाला सांगण्यात आलं: “यवाब यहोवाच्या तंबूकडे पळालाय; तो तिथे वेदीजवळ आहे.” तेव्हा शलमोनने यहोयादाचा मुलगा बनाया याला असा हुकूम देऊन पाठवलं: “जा, त्याला मारून टाक!” ३० म्हणून मग बनाया यहोवाच्या तंबूकडे जाऊन यवाबला म्हणाला: “राजाने हुकूम दिलाय, ‘बाहेर ये!’” पण तो म्हणाला: “नाही! मी इथेच मरेन.” मग बनाया राजाकडे परत आला आणि यवाबने दिलेलं उत्तर त्याने राजाला सांगितलं. ३१ तेव्हा राजा बनायाला म्हणाला: “यवाब म्हणतो तसंच कर. त्याला ठार मारून दफन कर. आणि त्याने विनाकारण सांडलेल्या रक्ताचा दोष+ माझ्या आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावरून दूर कर. ३२ त्याच्या रक्ताचा दोष यहोवा त्याच्याच माथ्यावर मारेल. कारण, माझे वडील दावीद यांच्या नकळत त्याने स्वतःपेक्षा नीतिमान आणि भल्या असलेल्या दोन माणसांना तलवारीने मारून टाकलं होतं; त्याने इस्राएलचा सेनापती+ नेरचा मुलगा अबनेर+ आणि यहूदाचा सेनापती+ येथेरचा मुलगा अमासा+ यांना मारून टाकलं होतं. ३३ त्यांच्या रक्ताचा दोष यवाबवर आणि त्याच्या वंशजांवर कायमचा राहील.+ पण दावीद, त्यांचे वंशज, त्यांचं घराणं आणि त्यांचं राजासन यांच्यावर सर्वकाळ यहोवाची शांती राहो.” ३४ म्हणून यहोयादाचा मुलगा बनाया गेला आणि त्याने यवाबवर वार करून त्याला ठार मारलं; यवाबला ओसाड रानातल्या त्याच्या घराजवळ पुरण्यात आलं. ३५ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया+ याला यवाबच्या जागी सेनापती बनवलं, आणि अब्याथारच्या जागी सादोकला+ याजक म्हणून नेमलं.
३६ नंतर राजाने शिमीला+ बोलावलं आणि तो त्याला म्हणाला: “तू यरुशलेममध्येच घर बांधून राहा. तिथून दुसरीकडे कुठेही जाऊ नकोस. ३७ ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन खोरं+ पार करशील, त्या दिवशी तू मेलाच म्हणून समज! तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच माथ्यावर राहील.” ३८ त्यावर शिमी राजाला म्हणाला: “ठीक आहे. माझ्या प्रभूंनी, राजांनी जसं सांगितलं तसंच मी करीन.” म्हणून शिमी बरेच दिवस यरुशलेममध्ये राहिला.
३९ पण तीन वर्षांनंतर असं झालं, की शिमीच्या दासांपैकी दोघं जण आखीशकडे+ पळून गेले; आखीश हा गथचा राजा माका याचा मुलगा होता. शिमीला जेव्हा सांगण्यात आलं, की “तुझे दास गथमध्ये आहेत,” ४० तेव्हा शिमीने लगेच गाढव तयार केलं आणि आपल्या दासांना शोधण्यासाठी तो गथमध्ये आखीशकडे गेला. शिमी आपल्या दासांना घेऊन गथहून परत आला, ४१ तेव्हा शलमोनला सांगण्यात आलं: “शिमी यरुशलेम सोडून गथला गेला होता, आणि आता परत आलाय.” ४२ तेव्हा शिमीला बोलावून राजा म्हणाला: “मी तुला यहोवाच्या नावाने शपथ घालून अशी ताकीद दिली होती ना, की ‘ज्या दिवशी तू इथून बाहेर पडून दुसरीकडे कुठेही जाशील, त्या दिवशी तू नक्की मरशील’? आणि त्यावर तूही मला म्हणाला होतास ना, की ‘ठीक आहे, तुम्ही म्हणालात तसंच मी करीन’?+ ४३ तर मग, यहोवासमोर घेतलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा तू का पाळली नाहीस?” ४४ राजा पुढे शिमीला म्हणाला: “माझे वडील दावीद यांच्याशी तू किती दुष्टपणे वागलास हे तुझ्या मनाला चांगलं माहीत आहे.+ आता यहोवा तो दुष्टपणा तुझ्याच माथ्यावर मारेल.+ ४५ पण शलमोन राजाला यहोवा आशीर्वादित करेल+ आणि दावीदचं राजासन तो कायमचं स्थापन करेल.” ४६ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया याला आज्ञा दिली, तेव्हा तो गेला आणि त्याने शिमीवर वार करून त्याला ठार मारलं.+
अशा प्रकारे शलमोनच्या राज्याला बळकटी आणि स्थिरता मिळाली.+