वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • येशूला फटके मारून त्याची थट्टा केली जाते (१-७)

      • पिलात पुन्हा येशूला प्रश्‍न विचारतो (८-१६क)

      • गुलगुथा इथे येशूला वधस्तंभावर खिळण्यात येतं (१६ख-२४)

      • येशू आपल्या आईची काळजी घेण्याची व्यवस्था करतो (२५-२७)

      • येशूचा मृत्यू (२८-३७)

      • येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (३८-४२)

योहान १९:१

समासातील संदर्भ

  • +यश ५०:६; मत्त २०:१८, १९; २७:२६; मार्क १५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२३

योहान १९:२

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:२७-२९; मार्क १५:१६, १७; लूक २३:११

योहान १९:३

तळटीपा

  • *

    किंवा “यहुद्यांच्या राजा, नमस्कार!”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:३

योहान १९:४

समासातील संदर्भ

  • +लूक २३:४; योह १८:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२३

योहान १९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२३

योहान १९:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “त्याला वधस्तंभावर मृत्युदंड द्या! त्याला वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”

  • *

    किंवा “वधस्तंभावर खिळा.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:२२; मार्क १५:१३; लूक २३:२१
  • +योह १८:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:७

समासातील संदर्भ

  • +लेवी २४:१६
  • +मत्त २६:६३-६५; योह ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:९

समासातील संदर्भ

  • +यश ५३:७; मत्त २७:१२, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०११, पृ. ४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१०

तळटीपा

  • *

    किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड देण्याचाही.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. ३२

    ७/१/१९९४, पृ. १८

    ६/१/१९९१, पृ. १२

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१२

तळटीपा

  • *

    किंवा “रोमी सम्राटाचे.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “कैसराचा विरोध करतो.”

समासातील संदर्भ

  • +लूक २३:२; प्रेका १७:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१४

तळटीपा

  • *

    म्हणजे, सुमारे सहावा तास.

समासातील संदर्भ

  • +योह १९:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०११, पृ. २१

योहान १९:१५

तळटीपा

  • *

    किंवा “वधस्तंभावर खिळू का?”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. १३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१६

समासातील संदर्भ

  • +दान ९:२६; मत्त २७:२६, ३१; मार्क १५:१५; लूक २३:२४, २५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१७

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:१२
  • +मत्त २७:३२, ३३; मार्क १५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२४

योहान १९:१८

समासातील संदर्भ

  • +योह ३:१४; प्रेका ५:३०; गल ३:१३
  • +यश ५३:९; लूक २३:३३

योहान १९:१९

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३७; मार्क १५:२६; लूक २३:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२५

योहान १९:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२५

योहान १९:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. २७

योहान १९:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३५; मार्क १५:२४; लूक २३:३४
  • +स्तो २२:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १५

    २/१/१९९०, पृ. २७

योहान १९:२५

समासातील संदर्भ

  • +लूक २:३४, ३५
  • +मत्त २७:५५, ५६, ६१; मार्क १५:४०; लूक २३:४९

योहान १९:२६

तळटीपा

  • *

    योह २:४ या वचनाची तळटीप पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह १३:२३; २१:७, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. ९-११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१४, पृ. १५

    ७/१/१९९०, पृ. २०

योहान १९:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. ९-११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१४, पृ. १५

    ७/१/१९९०, पृ. २०

योहान १९:२८

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. ११-१२

योहान १९:२९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:२१; मत्त २७:४८; मार्क १५:३६; लूक २३:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    तरुण लोक विचारतात, पृ. २६९

योहान १९:३०

समासातील संदर्भ

  • +योह १७:४
  • +यश ५३:१२; मत्त २७:५०; मार्क १५:३७; लूक २३:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ११-१२

    १२/१/२००७, पृ. १०

    ६/१/१९९३, पृ. २८

योहान १९:३१

समासातील संदर्भ

  • +योह १९:१४
  • +लेवी २३:५-७
  • +अनु २१:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. १९

योहान १९:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    नवे जग भाषांतर, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १६

    २/१५/२००५, पृ. ७

योहान १९:३४

समासातील संदर्भ

  • +यश ५३:५; जख १२:१०; योह २०:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    नवे जग भाषांतर, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १६

    २/१५/२००५, पृ. ७

योहान १९:३५

समासातील संदर्भ

  • +योह २०:३१; २१:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

योहान १९:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:४६; गण ९:१२; स्तो ३४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १६

    ३/१/२००७, पृ. २३

योहान १९:३७

समासातील संदर्भ

  • +जख १२:१०; प्रक १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १६

योहान १९:३८

समासातील संदर्भ

  • +योह ७:१३; ९:२२
  • +अनु २१:२२, २३; मत्त २७:५७-६०; मार्क १५:४३-४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१७, पृ. १८

योहान १९:३९

तळटीपा

  • *

    एका झाडाचं नाव. बायबलमधल्या काळात या झाडापासून मिळणारा एक सुगंधी पदार्थ, अत्तर म्हणून वापरला जायचा.

  • *

    शब्दशः “शंभर पाऊंड.” म्हणजे, रोमी पाऊंड. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह ३:१, २; ७:५०-५२
  • +लूक २३:५५, ५६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००२, पृ. १०-११

योहान १९:४०

समासातील संदर्भ

  • +योह २०:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१७, पृ. २०

योहान १९:४१

तळटीपा

  • *

    किंवा “वधस्तंभावर खिळण्यात आलं.”

  • *

    किंवा “स्मारक कबर.”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:९

योहान १९:४२

समासातील संदर्भ

  • +योह १९:१४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १९:१यश ५०:६; मत्त २०:१८, १९; २७:२६; मार्क १५:१५
योहा. १९:२मत्त २७:२७-२९; मार्क १५:१६, १७; लूक २३:११
योहा. १९:३यश ५३:३
योहा. १९:४लूक २३:४; योह १८:३८
योहा. १९:६मत्त २७:२२; मार्क १५:१३; लूक २३:२१
योहा. १९:६योह १८:३१
योहा. १९:७लेवी २४:१६
योहा. १९:७मत्त २६:६३-६५; योह ५:१८
योहा. १९:९यश ५३:७; मत्त २७:१२, १४
योहा. १९:१२लूक २३:२; प्रेका १७:६, ७
योहा. १९:१४योह १९:३१
योहा. १९:१६दान ९:२६; मत्त २७:२६, ३१; मार्क १५:१५; लूक २३:२४, २५
योहा. १९:१७इब्री १३:१२
योहा. १९:१७मत्त २७:३२, ३३; मार्क १५:२२
योहा. १९:१८योह ३:१४; प्रेका ५:३०; गल ३:१३
योहा. १९:१८यश ५३:९; लूक २३:३३
योहा. १९:१९मत्त २७:३७; मार्क १५:२६; लूक २३:३८
योहा. १९:२४मत्त २७:३५; मार्क १५:२४; लूक २३:३४
योहा. १९:२४स्तो २२:१८
योहा. १९:२५लूक २:३४, ३५
योहा. १९:२५मत्त २७:५५, ५६, ६१; मार्क १५:४०; लूक २३:४९
योहा. १९:२६योह १३:२३; २१:७, २०
योहा. १९:२८स्तो २२:१५
योहा. १९:२९स्तो ६९:२१; मत्त २७:४८; मार्क १५:३६; लूक २३:३६
योहा. १९:३०योह १७:४
योहा. १९:३०यश ५३:१२; मत्त २७:५०; मार्क १५:३७; लूक २३:४६
योहा. १९:३१योह १९:१४
योहा. १९:३१लेवी २३:५-७
योहा. १९:३१अनु २१:२२, २३
योहा. १९:३४यश ५३:५; जख १२:१०; योह २०:२५
योहा. १९:३५योह २०:३१; २१:२४
योहा. १९:३६निर्ग १२:४६; गण ९:१२; स्तो ३४:२०
योहा. १९:३७जख १२:१०; प्रक १:७
योहा. १९:३८योह ७:१३; ९:२२
योहा. १९:३८अनु २१:२२, २३; मत्त २७:५७-६०; मार्क १५:४३-४६
योहा. १९:३९योह ३:१, २; ७:५०-५२
योहा. १९:३९लूक २३:५५, ५६
योहा. १९:४०योह २०:७
योहा. १९:४१यश ५३:९
योहा. १९:४२योह १९:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १९:१-४२

योहानने सांगितलेला संदेश

१९ मग पिलातने येशूला नेऊन त्याला फटके मारायची आज्ञा दिली.+ २ तेव्हा शिपायांनी काट्यांचा एक मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला एक जांभळा झगा घातला.+ ३ मग ते पुन्हा पुन्हा त्याच्याजवळ येऊन म्हणू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”* असं म्हणून, त्यांनी त्याच्या थोबाडीत मारल्या.+ ४ तेव्हा पिलात पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हणाला: “मला याच्यात काहीच दोष दिसत नाही, हे तुम्हाला कळावं म्हणून मी त्याला बाहेर आणतो.”+ ५ मग काट्यांचा मुकुट आणि जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “बघा! हा माणूस!” ६ पण त्याला पाहताच मुख्य याजक आणि रक्षक मोठ्याने ओरडून म्हणू लागले: “त्याला वधस्तंभावर* खिळा! त्याला वधस्तंभावर खिळा!”*+ तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि मृत्युदंड द्या.* कारण मला तरी त्याच्यात काहीच दोष दिसत नाही.”+ ७ यहुद्यांनी त्याला उत्तर दिलं: “आमचा एक नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे याला मृत्युदंड झालाच पाहिजे.+ कारण मी देवाचा मुलगा आहे असं तो म्हणाला.”+

८ पिलातने हे ऐकलं तेव्हा तो आणखीनच घाबरला. ९ मग पुन्हा राज्यपालाच्या घरात जाऊन त्याने येशूला विचारलं: “तू कुठला आहेस?” पण येशूने काहीच उत्तर दिलं नाही.+ १० म्हणून पिलात त्याला म्हणाला: “तू मला काहीच उत्तर देणार नाहीस का? तुझी सुटका करायचा किंवा तुला मृत्युदंड द्यायचा* मला अधिकार आहे, हे तुला माहीत नाही का?” ११ येशूने त्याला उत्तर दिलं: “देवाने तुम्हाला अधिकार दिला नसता, तर तुमचा माझ्यावर काहीच अधिकार नसता. म्हणूनच, ज्या माणसाने मला तुमच्या हवाली केलं त्याचं पाप जास्त मोठं आहे.”

१२ त्यामुळे पिलात त्याची सुटका करायचा प्रयत्न करू लागला. पण यहुदी ओरडून म्हणाले: “तुम्ही जर याची सुटका केली, तर तुम्ही कैसराचे* मित्र नाही. जो कोणी राजा असल्याचा दावा करतो तो कैसराविरुद्ध बोलतो.”*+ १३ हे ऐकल्यावर पिलातने येशूला बाहेर आणलं आणि ‘फरसबंदी कट्टा’ म्हटलेल्या ठिकाणी (याला इब्री भाषेत गब्बाथा  म्हणतात) तो एका न्यायासनावर बसला. १४ तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता+ आणि दुपारचे सुमारे बारा* वाजले होते. पिलात यहुद्यांना म्हणाला: “पाहा! तुमचा राजा!” १५ पण ते ओरडू लागले: “याला घेऊन जा! याला घेऊन जा! याला वधस्तंभावर खिळा!” पिलातने त्यांना विचारलं: “मी तुमच्या राजाला मृत्युदंड देऊ का?”* तेव्हा मुख्य याजकांनी उत्तर दिलं: “कैसराशिवाय आमचा कोणी राजा नाही.” १६ मग त्याने वधस्तंभावर खिळण्यासाठी त्याला त्यांच्या हाती दिलं.+

तेव्हा त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. १७ येशू आपला वधस्तंभ स्वतः उचलून ‘कवटीची जागा’ म्हटलेल्या ठिकाणी गेला.+ इब्री भाषेत त्याला गुलगुथा  असं म्हटलं आहे.+ १८ तिथे त्यांनी आणखी दोन माणसांसोबत त्याला वधस्तंभावर खिळलं.+ एक माणूस त्याच्या उजवीकडे, तर दुसरा डावीकडे आणि येशू त्यांच्या मधोमध होता.+ १९ तसंच पिलातने वधस्तंभाच्या वर एक पाटी लावली. तिच्यावर असं लिहिलं होतं: “नासरेथचा येशू, यहुद्यांचा राजा.”+ २० बऱ्‍याच यहुद्यांनी ती पाटी वाचली, कारण येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं, ते ठिकाण शहराजवळच होतं. ही पाटी इब्री, लॅटिन आणि ग्रीक भाषेत लिहिण्यात आली होती. २१ पण यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलातला म्हटलं: “‘यहुद्यांचा राजा,’ असं लिहू नका, तर ‘स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणणारा,’ असं लिहा.” २२ यावर पिलातने उत्तर दिलं: “मी जे लिहिलं, ते लिहिलं.”

२३ मग येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर शिपायांनी त्याचे कपडे घेतले आणि त्यांचे चार भाग करून प्रत्येकाला एक, असे आपसात वाटून घेतले. तसंच त्यांनी त्याचा आतला झगासुद्धा घेतला. पण आतला झगा शिवलेला नव्हता, तर वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. २४ म्हणून ते एकमेकांना म्हणाले: “हा झगा फाडण्याऐवजी, तो कोणाला मिळावा हे ठरवायला आपण चिठ्ठ्या टाकू या.”+ शास्त्रवचनांत जे म्हटलं आहे ते पूर्ण होण्यासाठी हे घडलं: “त्यांनी आपसात माझी वस्त्रं वाटून घेतली आणि माझ्या कपड्यांसाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.”+ आणि शिपायांनी खरंच या गोष्टी केल्या.

२५ येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई,+ त्याची मावशी, क्लोपची बायको मरीया आणि मग्दालीया मरीया या उभ्या होत्या.+ २६ जेव्हा येशूने आपल्या आईला आणि ज्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं+ त्या शिष्याला जवळच उभं असलेलं पाहिलं, तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला: “बाई,* पाहा! तुझा मुलगा!” २७ मग तो त्या शिष्याला म्हणाला: “पाहा! तुझी आई!” त्या दिवसापासून, त्या शिष्याने तिला आपल्या घरी राहायला नेलं.

२८ यानंतर, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे पाहून येशू म्हणाला: “मला तहान लागली आहे.” शास्त्रवचनात जे सांगितलं आहे ते पूर्ण होण्यासाठी तो असं म्हणाला.+ २९ जवळच एका भांड्यात आंबट द्राक्षारस भरून ठेवला होता. त्यामुळे त्यांनी त्यात बुडवलेला बोळा एजोबच्या* फांदीच्या टोकावर ठेवून तो त्याच्या तोंडाला लावला.+ ३० तो आंबट द्राक्षारस चाखल्यावर येशू म्हणाला: “पूर्ण झालंय!”+ मग त्याने मान टाकून प्राण सोडला.+

३१ तो तयारीचा दिवस असल्यामुळे,+ शब्बाथाच्या दिवशी (कारण हा मोठा शब्बाथ होता)+ मृतदेह वधस्तंभावर राहू नयेत+ म्हणून यहुद्यांनी पिलातला अशी विनंती केली, की वधस्तंभावर खिळलेल्यांचे पाय तोडावेत आणि त्यांचे मृतदेह खाली उतरवावेत. ३२ त्यामुळे शिपायांनी येशूजवळ वधस्तंभांवर खिळलेल्या पहिल्या माणसाचे आणि त्यानंतर दुसऱ्‍याचेही पाय तोडले. ३३ पण ते येशूच्या जवळ आले, तेव्हा तो आधीच मेला आहे असं त्यांना दिसलं. म्हणून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. ३४ तरी एका शिपायाने त्याच्या कुशीत भाला भोसकला,+ तेव्हा लगेच रक्‍त आणि पाणी बाहेर आलं. ३५ आणि ज्याने आपल्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत त्याने ही साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. आपण जे सांगितलं ते खरं आहे, हे त्याला माहीत आहे आणि तुम्हीसुद्धा विश्‍वास ठेवावा म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.+ ३६ खरंतर, “त्याचं एकही हाड मोडलं जाणार नाही,” असं जे शास्त्रवचनात म्हटलं आहे ते पूर्ण व्हावं म्हणून या गोष्टी घडून आल्या.+ ३७ शिवाय दुसऱ्‍या एका शास्त्रवचनात असं म्हटलं आहे: “ज्याला त्यांनी भोसकलं त्याच्याकडे ते पाहतील.”+

३८ या गोष्टी घडल्यानंतर, अरिमथाई इथल्या योसेफने पिलातला अशी विनंती केली, की आपल्याला येशूचा मृतदेह घेऊन जाऊ द्यावा. हा योसेफ येशूचा शिष्य होता, पण ही गोष्ट त्याने यहुद्यांच्या भीतीमुळे लपवून ठेवली होती.+ पिलातने त्याला परवानगी दिल्यावर तो आला आणि येशूचा मृतदेह घेऊन गेला.+ ३९ तसंच, पहिल्यांदा जो रात्री येशूकडे आला होता तो निकदेमसुद्धा+ आपल्यासोबत गंधरस आणि अगरूचं* सुमारे ३० किलो* मिश्रण घेऊन आला.+ ४० मग त्यांनी येशूचा मृतदेह घेतला आणि यहुदी लोकांच्या दफनविधीप्रमाणे त्याला या सुगंधी मसाल्यांसोबत मलमलीच्या कापडांत गुंडाळलं.+ ४१ त्याला मृत्युदंड देण्यात आला* त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर* होती.+ तिच्यात आजपर्यंत कोणाचाही मृतदेह ठेवण्यात आला नव्हता. ४२ तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे+ आणि कबर जवळच असल्यामुळे त्यांनी येशूला तिथेच ठेवलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा