वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • ख्रिस्ताचं पुनरुत्थान (१-११)

      • पुनरुत्थान, विश्‍वास ठेवण्यासाठी आधार (१२-१९)

      • ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही एक हमी (२०-३४)

      • हाडामांसाचं शरीर, अदृश्‍य शरीर (३५-४९)

      • अमरत्व आणि अविनाशीपण (५०-५७)

      • जास्तीत जास्त प्रमाणात प्रभूचं काम (५८)

१ करिंथकर १५:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:१, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १४-१५

१ करिंथकर १५:२

तळटीपा

  • *

    किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १४-१५

१ करिंथकर १५:३

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:१५; यश ५३:८, १२; दान ९:२६; १पेत्र २:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १४-१५

१ करिंथकर १५:४

समासातील संदर्भ

  • +यश ५३:९; मत्त २७:५९, ६०
  • +स्तो १६:१०
  • +योन १:१७; लूक २४:४६
  • +मत्त २८:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

१ करिंथकर १५:५

तळटीपा

  • *

    याला पेत्र असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:२; लूक २४:३३, ३४
  • +योह २०:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २५

    ७/१/१९९८, पृ. १४-१५

    १/१/१९८९, पृ. ३२

    अनुकरण, पृ. २३३-२३४

१ करिंथकर १५:६

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१९, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. २६-२७

    ७/१/१९९८, पृ. १४-१५

    १०/१/१९९५, पृ. १४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३१

१ करिंथकर १५:७

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:१७
  • +प्रेका १:३, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ४-५

    ७/१/१९९८, पृ. १४-१६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११२

१ करिंथकर १५:८

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:३-५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २९

    ७/१/१९९८, पृ. १४-१६

१ करिंथकर १५:९

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:३; गल १:१३

१ करिंथकर १५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. २३-२४

    ८/१/२०००, पृ. १४

१ करिंथकर १५:१२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:२; १७:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १४, १६-१७

    ८/१५/१९९७, पृ. १२

    ८/१/१९९३, पृ. १५

    ९/१/१९९०, पृ. २९

१ करिंथकर १५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९७, पृ. १२

१ करिंथकर १५:१५

समासातील संदर्भ

  • +प्रेका ३:१५
  • +प्रेका २:२४; ४:१०; १३:३०, ३१

१ करिंथकर १५:१७

समासातील संदर्भ

  • +रोम ४:२५; इब्री ७:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १६-१७

१ करिंथकर १५:१८

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:५९; १कर १५:१४; १पेत्र १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ५-६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १६-१७

१ करिंथकर १५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १६-१७

१ करिंथकर १५:२०

समासातील संदर्भ

  • +प्रेका २६:२३; कल १:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ५-६

    ७/१५/२०००, पृ. १३

    ७/१/१९९८, पृ. १७

    ३/१/१९९८, पृ. १३

    ६/१/१९८७, पृ. १९

१ करिंथकर १५:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१७, १९
  • +योह ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७

१ करिंथकर १५:२२

समासातील संदर्भ

  • +रोम ५:१२
  • +रोम ५:१७; ६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ५-६, ३०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७

१ करिंथकर १५:२३

समासातील संदर्भ

  • +प्रक १:५
  • +मत्त २४:३; १थेस ४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ११-१२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. १३

    ७/१/१९९८, पृ. १७, २२-२४

    ४/१/१९८७, पृ. १९-२०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७२-१७३

    उपासनेतील ऐक्य, पृ. ७४

१ करिंथकर १५:२४

समासातील संदर्भ

  • +दान २:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २२९-२३०

    प्रकटीकरण कळस, पृ. २९१, ३००

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०००, पृ. २०

    ७/१/१९९८, पृ. २१

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १८२

१ करिंथकर १५:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १९

१ करिंथकर १५:२६

समासातील संदर्भ

  • +प्रक २०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ६-७

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. ४

    शुद्ध उपासना, पृ. २२९-२३०

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. २३-२७

    ९/१५/२०१२, पृ. ११

    ७/१/१९९८, पृ. २१-२२

    ४/१/१९८७, पृ. १९

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१९, पृ. १

    प्रकटीकरण कळस, पृ. २९१, ३००

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १८२

१ करिंथकर १५:२७

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:६; इफि १:२२
  • +इब्री २:८
  • +१पेत्र ३:२२

१ करिंथकर १५:२८

समासातील संदर्भ

  • +योह १४:२८
  • +१कर ३:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१९, पृ. ६

    शुद्ध उपासना, पृ. २२९-२३०

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. २७

    ९/१५/२०१२, पृ. ११-१२

    १२/१/२००७, पृ. १२

    ७/१/१९९८, पृ. २२

    ६/१/१९९४, पृ. ३०-३१

१ करिंथकर १५:२९

समासातील संदर्भ

  • +रोम ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २७

    १०/१/२००३, पृ. २९

    ८/१५/२०००, पृ. ३०

    ७/१५/२०००, पृ. १७-१८

    ७/१/१९९८, पृ. १७

१ करिंथकर १५:३०

तळटीपा

  • *

    किंवा “सतत.”

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३६; २कर ११:२३-२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७

१ करिंथकर १५:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७-१८

१ करिंथकर १५:३२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “माणसाच्या दृष्टिकोनाने.”

समासातील संदर्भ

  • +२कर १:८
  • +यश २२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००७, पृ. ३

    ६/१५/२००२, पृ. २६-२८

    ७/१५/२०००, पृ. १८

    ७/१/१९९८, पृ. १७-१८

    ११/१/१९९७, पृ. २४-२५

    ८/१५/१९९७, पृ. १२

    ११/१/१९९६, पृ. १६

    ९/१/१९९०, पृ. २८

    ९/१/१९८९, पृ. २२

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६३

१ करिंथकर १५:३३

तळटीपा

  • *

    किंवा “नीती बिघडते.”

समासातील संदर्भ

  • +नीत १३:२०; १कर ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

    सावध राहा!,

    क्र. ३ २०१९, पृ. ९

    १०/८/२००५, पृ. १३-१४

    ३/८/१९९७, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१५, पृ. २५-२६

    ७/१५/२०१२, पृ. १५

    ५/१/२००७, पृ. २०-२१

    ४/१/२००६, पृ. ९

    ७/१५/२०००, पृ. १८

    ७/१/१९९८, पृ. १८

    ११/१/१९९७, पृ. २३-२५

    ७/१५/१९९७, पृ. १८

    २/१/१९९४, पृ. १६

    ८/१/१९९३, पृ. १४-१९

    ६/१/१९९२, पृ. २५-२६

    ७/१/१९८८, पृ. ६

    उपासनेतील ऐक्य, पृ. ४४-४५

१ करिंथकर १५:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १८

१ करिंथकर १५:३५

समासातील संदर्भ

  • +१यो ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १०-१२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. १८

    ७/१/१९९८, पृ. १९

१ करिंथकर १५:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १९-२०

१ करिंथकर १५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १९-२०

१ करिंथकर १५:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १९-२०

१ करिंथकर १५:४०

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:३; लूक २४:४
  • +इब्री २:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. १८

    ७/१/१९९८, पृ. २०

१ करिंथकर १५:४१

समासातील संदर्भ

  • +उत्प १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. २०

    ६/१/१९९३, पृ. २१-२२

१ करिंथकर १५:४२

समासातील संदर्भ

  • +रोम २:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. १८-१९

    ७/१/१९९८, पृ. २०

१ करिंथकर १५:४३

समासातील संदर्भ

  • +कल ३:४
  • +प्रक २०:४

१ करिंथकर १५:४५

समासातील संदर्भ

  • +उत्प २:७
  • +योह ५:२६; १ती ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. २६

    ३/१५/२०००, पृ. ४

    ४/१/१९९०, पृ. ११, १३-१४

१ करिंथकर १५:४७

समासातील संदर्भ

  • +उत्प २:७
  • +योह ३:१३

१ करिंथकर १५:४८

समासातील संदर्भ

  • +फिलि ३:२०, २१

१ करिंथकर १५:४९

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:३
  • +रोम ८:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. २०

१ करिंथकर १५:५०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ११-१२

    नवे जग भाषांतर, पृ. २५२४

१ करिंथकर १५:५१

समासातील संदर्भ

  • +१थेस ४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७

    २/१५/१९९५, पृ. २२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७३

१ करिंथकर १५:५२

समासातील संदर्भ

  • +१थेस ४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. १७

    २/१५/१९९५, पृ. २२

१ करिंथकर १५:५३

समासातील संदर्भ

  • +रोम २:६, ७
  • +२कर ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. २५

    ७/१/१९९८, पृ. २०

१ करिंथकर १५:५४

समासातील संदर्भ

  • +यश २५:८; प्रक २०:६

१ करिंथकर १५:५५

तळटीपा

  • *

    किंवा “तुझा डंख.”

समासातील संदर्भ

  • +होशे १३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. १५

    २/१५/१९९५, पृ. ९-१०

१ करिंथकर १५:५६

तळटीपा

  • *

    किंवा “आणणारा डंख.”

  • *

    किंवा “जे पापाला बळ देतं ते.”

समासातील संदर्भ

  • +रोम ६:२३
  • +रोम ३:२०; ७:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. १५

    ७/१५/२०००, पृ. १९

१ करिंथकर १५:५७

समासातील संदर्भ

  • +योह ३:१६; प्रेका ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. २४

१ करिंथकर १५:५८

समासातील संदर्भ

  • +कल १:२३; इब्री ३:१४; २पेत्र ३:१७
  • +रोम १२:११
  • +२इत १५:७; १कर ३:८; प्रक १४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. १३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. २२

    ७/१५/२०००, पृ. १९

    ७/१/१९९८, पृ. २४

    ७/१/१९९१, पृ. १५

    राज्य सेवा,

    ६/२०००, पृ. १

    १/१९९५, पृ. १

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. १५:१प्रेका १८:१, ११
१ करिंथ. १५:३स्तो २२:१५; यश ५३:८, १२; दान ९:२६; १पेत्र २:२४
१ करिंथ. १५:४यश ५३:९; मत्त २७:५९, ६०
१ करिंथ. १५:४स्तो १६:१०
१ करिंथ. १५:४योन १:१७; लूक २४:४६
१ करिंथ. १५:४मत्त २८:७
१ करिंथ. १५:५मत्त १०:२; लूक २४:३३, ३४
१ करिंथ. १५:५योह २०:२६
१ करिंथ. १५:६मत्त २८:१६, १७
१ करिंथ. १५:७प्रेका १२:१७
१ करिंथ. १५:७प्रेका १:३, ६
१ करिंथ. १५:८प्रेका ९:३-५
१ करिंथ. १५:९प्रेका ८:३; गल १:१३
१ करिंथ. १५:१२प्रेका ४:२; १७:३१
१ करिंथ. १५:१५प्रेका ३:१५
१ करिंथ. १५:१५प्रेका २:२४; ४:१०; १३:३०, ३१
१ करिंथ. १५:१७रोम ४:२५; इब्री ७:२५
१ करिंथ. १५:१८प्रेका ७:५९; १कर १५:१४; १पेत्र १:३
१ करिंथ. १५:२०प्रेका २६:२३; कल १:१८
१ करिंथ. १५:२१उत्प ३:१७, १९
१ करिंथ. १५:२१योह ११:२५
१ करिंथ. १५:२२रोम ५:१२
१ करिंथ. १५:२२रोम ५:१७; ६:२३
१ करिंथ. १५:२३प्रक १:५
१ करिंथ. १५:२३मत्त २४:३; १थेस ४:१६
१ करिंथ. १५:२४दान २:४४
१ करिंथ. १५:२५स्तो ११०:१, २
१ करिंथ. १५:२६प्रक २०:१४
१ करिंथ. १५:२७स्तो ८:६; इफि १:२२
१ करिंथ. १५:२७इब्री २:८
१ करिंथ. १५:२७१पेत्र ३:२२
१ करिंथ. १५:२८योह १४:२८
१ करिंथ. १५:२८१कर ३:२३
१ करिंथ. १५:२९रोम ६:४
१ करिंथ. १५:३०रोम ८:३६; २कर ११:२३-२७
१ करिंथ. १५:३२२कर १:८
१ करिंथ. १५:३२यश २२:१३
१ करिंथ. १५:३३नीत १३:२०; १कर ५:६
१ करिंथ. १५:३५१यो ३:२
१ करिंथ. १५:४०मत्त २८:३; लूक २४:४
१ करिंथ. १५:४०इब्री २:६, ७
१ करिंथ. १५:४१उत्प १:१६
१ करिंथ. १५:४२रोम २:६, ७
१ करिंथ. १५:४३कल ३:४
१ करिंथ. १५:४३प्रक २०:४
१ करिंथ. १५:४५उत्प २:७
१ करिंथ. १५:४५योह ५:२६; १ती ३:१६
१ करिंथ. १५:४७उत्प २:७
१ करिंथ. १५:४७योह ३:१३
१ करिंथ. १५:४८फिलि ३:२०, २१
१ करिंथ. १५:४९उत्प ५:३
१ करिंथ. १५:४९रोम ८:२९
१ करिंथ. १५:५११थेस ४:१७
१ करिंथ. १५:५२१थेस ४:१६
१ करिंथ. १५:५३रोम २:६, ७
१ करिंथ. १५:५३२कर ५:४
१ करिंथ. १५:५४यश २५:८; प्रक २०:६
१ करिंथ. १५:५५होशे १३:१४
१ करिंथ. १५:५६रोम ६:२३
१ करिंथ. १५:५६रोम ३:२०; ७:१२, १३
१ करिंथ. १५:५७योह ३:१६; प्रेका ४:१२
१ करिंथ. १५:५८कल १:२३; इब्री ३:१४; २पेत्र ३:१७
१ करिंथ. १५:५८रोम १२:११
१ करिंथ. १५:५८२इत १५:७; १कर ३:८; प्रक १४:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर १५:१-५८

करिंथकर यांना पहिलं पत्र

१५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला,+ जो तुम्ही स्वीकारला आणि ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली, त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. २ मी घोषित केलेल्या आनंदाच्या संदेशाला जर तुम्ही पक्कं धरून ठेवलं, तर त्याद्वारे तुमचं तारण होईल;* नाहीतर, तुमचं विश्‍वास ठेवणं व्यर्थ ठरेल.

३ कारण, ज्या गोष्टी मला समजल्या, त्यांपैकी मी तुम्हाला शिकवलेली मुख्य गोष्ट ही, की शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला+ ४ आणि त्याला पुरण्यात आलं;+ आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे,+ तिसऱ्‍या दिवशी+ त्याला उठवण्यात आलं.+ ५ तो केफाला*+ आणि मग १२ प्रेषितांना दिसला.+ ६ त्यानंतर, तो एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला.+ त्यांच्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे, तर बहुतेक जण अजूनही आपल्यात आहेत. ७ नंतर, तो याकोबला+ आणि मग सगळ्या प्रेषितांना दिसला.+ ८ पण सर्वात शेवटी, अकाली जन्मलेल्यासारखा जो मी, त्या मलासुद्धा तो दिसला.+

९ कारण, प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे. इतकंच काय, तर प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.+ १० पण आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे. आणि त्याने मला दाखवलेली अपार कृपा मुळीच व्यर्थ ठरली नाही. कारण मी इतर सगळ्या प्रेषितांपेक्षा जास्त मेहनत केली; अर्थात, ती मी स्वतःच्या बळावर केली असं नाही, तर माझ्यावर असलेल्या देवाच्या अपार कृपेमुळे केली. ११ तर मग, मी असो किंवा इतर प्रेषित असोत, आम्ही याच प्रकारे प्रचार करतो आणि तुम्हीही याच प्रकारे विश्‍वास ठेवला.

१२ आता, जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला अशी घोषणा केली जात आहे,+ तर मग, मेलेल्यांचं पुनरुत्थान* होणार नाही, असं तुमच्यापैकी काही जण कसं म्हणतात? १३ जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. १४ पण, जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर नक्कीच आपलं प्रचार करणं व्यर्थ आहे आणि तुमचा विश्‍वाससुद्धा व्यर्थ आहे. १५ तसंच, आपण देवाबद्दल खोटी साक्ष देणारे ठरलो आहोत.+ कारण, देवाने ख्रिस्ताला उठवलं असं बोलून आपण देवाच्या विरोधात साक्ष दिली आहे;+ जर मेलेले लोक खरोखर उठवले जाणार नसतील, तर याचा अर्थ देवाने ख्रिस्तालाही उठवलं नाही. १६ कारण जर मेलेले उठवले जाणार नाहीत, तर मग ख्रिस्तही उठवला गेला नाही. १७ आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमच्या विश्‍वासाला काहीच अर्थ नाही; तुम्ही अजूनही तुमच्या पापांतच आहात.+ १८ तसंच, जे ख्रिस्ती लोक मरण पावले त्यांचासुद्धा कायमचा नाश झाला आहे.+ १९ जर आपण फक्‍त याच जीवनासाठी ख्रिस्तावर आशा ठेवली असेल, तर आपली सगळ्यांपेक्षा जास्त दयनीय स्थिती आहे.

२० पण, आता ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे; तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.+ २१ कारण मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे,+ त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं.+ २२ कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत,+ त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.+ २३ पण प्रत्येकाला त्याच्या योग्य क्रमाप्रमाणे: ख्रिस्त, जो पहिलं फळ आहे.+ त्यानंतर, जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या उपस्थितीदरम्यान उठवले जातील.+ २४ मग, अंत होईल. त्या वेळी, सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा केल्यावर तो आपल्या देवाला आणि पित्याला राज्य सोपवून देईल.+ २५ कारण देव सर्व शत्रूंना ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवेपर्यंत ख्रिस्ताने राजा म्हणून राज्य केलं पाहिजे.+ २६ आणि शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.+ २७ कारण देवाने, “सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून त्याच्या पायांखाली ठेवल्या आहेत.”+ ‘सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून,’+ असं जे तो म्हणतो त्यावरून स्पष्टच आहे, की ज्याने सर्व गोष्टी मुलाच्या अधीन केल्या, तो स्वतः त्याच्या अधीन नाही.+ २८ पण सगळ्या गोष्टी मुलाच्या अधीन केल्या जातील, तेव्हा ज्याने सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन केल्या, त्याला मुलगाही अधीन होईल.+ हे यासाठी, की देवाने सगळ्यांसाठी सर्वकाही व्हावं.+

२९ मग, मृत्यूसाठी बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांचं काय?+ जर मेलेल्यांचं पुनरुत्थानच होणार नसेल, तर ते मृत्यूसाठी बाप्तिस्मा तरी का घेतात? ३० आणि आपणसुद्धा नेहमी* आपला जीव धोक्यात का घालतो?+ ३१ बांधवांनो, मी तर दररोज मृत्यूचा सामना करतो. आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्यामध्ये मला तुमच्याबद्दल असलेल्या अभिमानावरून, मी हे खातरीने सांगतो. ३२ इतर माणसांप्रमाणे* जर मीसुद्धा इफिसमध्ये हिंस्र प्राण्यांशी लढलो असेन,+ तर त्याचा मला काय फायदा? जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर “चला, आपण खाऊ-पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे.”+ ३३ फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.*+ ३४ शुद्धीवर या आणि चांगली कामं करा; पाप करत राहू नका. कारण काहींना देवाबद्दल जराही ज्ञान नाही. तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे.

३५ पण, कोणी म्हणेल: “मेलेल्यांना कसं उठवलं जाईल? ते कोणत्या प्रकारच्या शरीराने उठतील?”+ ३६ अरे मूर्ख माणसा! तू जे काही पेरतोस ते जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत जिवंत केलं जात नाही. ३७ आणि तू जे पेरतोस ते वाढलेलं रोपटं नाही, तर फक्‍त बी असतं; मग, ते गव्हाचं बी असेल किंवा दुसरं एखादं बी. ३८ पण, देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो त्याला वाढवतो आणि प्रत्येक बी वाढतं तेव्हा ते वेगवेगळं असतं. ३९ सगळीच शरीरं एकसारखी नसतात. माणसांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर प्राण्यांचं शरीर दुसऱ्‍या प्रकारचं; पक्ष्यांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर माशांचं शरीर दुसऱ्‍या प्रकारचं. ४० तसंच, जे स्वर्गात आहेत त्यांचं शरीर+ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांपेक्षा+ वेगळं असतं; स्वर्गात असलेल्यांच्या शरीराचं तेज एक प्रकारचं, तर पृथ्वीवर राहणाऱ्‍यांच्या शरीराचं तेज दुसऱ्‍या प्रकारचं असतं. ४१ सूर्याचं तेज एक प्रकारचं आहे, तर चंद्राचं तेज एक प्रकारचं+ आणि ताऱ्‍यांचं तेज आणखी वेगळ्या प्रकारचं. खरंतर, प्रत्येक ताऱ्‍याचं तेज दुसऱ्‍या ताऱ्‍याच्या तेजापेक्षा वेगळं असतं.

४२ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीतसुद्धा हेच खरं आहे. शरीर नाशवंत स्थितीत पेरलं जातं आणि अविनाशीपणात उठवलं जातं.+ ४३ ते अपमानात पेरलं जातं आणि गौरवात उठवलं जातं.+ ते अशक्‍तपणात पेरलं जातं आणि सामर्थ्यात उठवलं जातं.+ ४४ ते हाडामांसाचं शरीर म्हणून पेरलं जातं आणि अदृश्‍य शरीर म्हणून उठवलं जातं. जसं हाडामांसाचं शरीर असतं, तसं अदृश्‍य शरीरसुद्धा असतं. ४५ म्हणून असं लिहिलं आहे: “पहिला माणूस आदाम हा जिवंत प्राणी बनला.”+ शेवटला आदाम जीवन देणारा अदृश्‍य प्राणी बनला.+ ४६ पण, पहिलं शरीर अदृश्‍य नाही. पहिलं शरीर हाडामांसाचं आणि त्यानंतर अदृश्‍य शरीर आहे. ४७ पहिला माणूस पृथ्वीवरचा आहे आणि त्याला मातीपासून बनवण्यात आलं;+ तर दुसरा माणूस स्वर्गातून आहे.+ ४८ या जगातले लोक, देवाने ज्याला मातीपासून बनवलं त्याच्यासारखे आहेत; आणि स्वर्गात असणारे, जो स्वर्गातून आला त्याच्यासारखे आहेत.+ ४९ ज्याप्रमाणे आपण मातीपासून बनवलेल्याच्या स्वरूपात आहोत,+ त्याचप्रमाणे आपण स्वर्गातून आलेल्याच्या स्वरूपात असू.+

५० पण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की मांस आणि रक्‍त देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही; तसंच, जे नाशवंत आहे त्याला अविनाशीपण मिळू शकत नाही. ५१ पाहा! मी तुम्हाला एक पवित्र रहस्य सांगतो: आपण सगळेच मृत्यूची झोप घेणार नाही, तर आपण सगळे बदलून जाऊ.+ ५२ शेवटचा कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आपण बदलून जाऊ. कारण कर्णा वाजेल+ आणि जे मेलेले आहेत ते अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. ५३ कारण हे जे नाशवंत शरीर आहे, ते अविनाशीपण धारण करेल+ आणि हे जे मरण पावणारं शरीर आहे, ते अमरत्व धारण करेल.+ ५४ पण जेव्हा हे नाशवंत शरीर, अविनाशीपण धारण करेल आणि हे मरणारं शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा शास्त्रवचनांतले हे शब्द पूर्ण होतील: “मृत्यूला कायमचं गिळून टाकण्यात आलं आहे.”+ ५५ “अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी* कुठे आहे?”+ ५६ मरण आणणारी नांगी* म्हणजे पाप,+ आणि पापाचं बळ* नियमशास्त्र आहे.+ ५७ पण, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्याला विजय देतो याबद्दल त्याचे आभार!+

५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा