स्तोत्र
आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. यदूथूनच्या* चालीवर गायलं जावं.
७७ मी देवाला मोठ्याने हाक मारीन;
मी देवाला हाक मारीन आणि तो माझं ऐकेल.+
२ माझ्या संकटाच्या दिवशी मी यहोवाला शोधतो.+
४ तू मला डोळे मिटू देत नाहीस;
मी बेचैन झालोय आणि माझ्या तोंडून शब्द निघत नाहीत.
५ फार पूर्वीच्या दिवसांबद्दल
आणि गतकाळातल्या वर्षांबद्दल मी विचार करू लागतो.+
६ रात्रीच्या प्रहरी मी माझं गीत* आठवतो;+
मी आपल्या मनाशी विचार करतो;+
मी सर्व गोष्टींचा अगदी कसून शोध घेतो.
७ यहोवा आपल्याला कायमचं टाकून देईल का?+
तो पुन्हा कधीही आपल्यावर कृपा करणार नाही का?+
८ त्याचं एकनिष्ठ प्रेम कायमचं आटलं आहे का?
येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी त्याचं अभिवचन व्यर्थ ठरेल का?
९ देव कृपा करायला विसरलाय का?+
की आपल्या रागामुळे त्याने दया दाखवायचं सोडून दिलंय? (सेला )
१० मी असं म्हणत राहतो: “सर्वोच्च देवाने आपल्याला पाठिंबा* द्यायचं सोडून दिलंय,
याचं मला फार दुःख होतं.”+
११ मी याहची कार्यं आठवीन;
तू फार पूर्वी केलेल्या पराक्रमांची मी आठवण करीन.
१३ हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत.
हे देवा, तुझ्यासारखा महान देव दुसरा कोण आहे?+
१४ तू अद्भुत गोष्टी करणारा खरा देव आहेस.+
तू राष्ट्रांना आपलं सामर्थ्य दाखवलं आहेस.+
१५ तुझ्या शक्तीने* तू तुझ्या लोकांची सुटका केलीस,+
तू याकोबच्या आणि योसेफच्या मुलांना सोडवलंस. (सेला )
१६ हे देवा, समुद्राने तुला पाहिलं;
त्याने तुला पाहिलं आणि तो भयभीत झाला.+
खोल समुद्रात खळबळ माजली.
१७ मेघांनी पाण्याचा वर्षाव केला.
आभाळातून गर्जना होऊ लागली
आणि सर्व दिशांना तुझे बाण सुटले.+