यिर्मया
१७ “यहूदाचं पाप लोखंडी लेखणीने लिहिण्यात आलंय.
ते हिऱ्याच्या टोकाने त्यांच्या हृदयांवर,
आणि त्यांच्या वेदींच्या शिंगांवर कोरण्यात आलंय.
२ त्यांच्या मुलांनाही हिरव्यागार वृक्षांजवळ असलेल्या,
आणि टेकड्यांवर व मोकळ्या प्रदेशातल्या डोंगरांवर असलेल्या,+
३ तू तुझ्या संपूर्ण प्रदेशात पाप केलंय.
म्हणून मी तुझी मालमत्ता आणि तुझा सगळा खजिना लूट म्हणून देऊन टाकीन;+
४ मी तुला दिलेला वारसा तू तुझ्याच पापांमुळे गमावून बसशील.+
मी तुला परक्या देशात शत्रूंची गुलामी करायला लावीन.+
५ यहोवा म्हणतो:
“जो* माणसावर भरवसा ठेवतो तो शापित आहे.+
जो माणसाच्या बळावर अवलंबून राहतो,+
आणि ज्याचं मन यहोवापासून दूर जातं, तो शापित आहे.
६ तो वाळवंटात एकट्या पडलेल्या झाडासारखा होईल.
त्याच्या वाटेला काहीच चांगलं येणार नाही.
तो ओसाड रानातल्या कोरड्या ठिकाणांत वस्ती करेल,
कोणीही राहू शकत नाही अशा मिठाच्या प्रदेशात तो वस्ती करेल.
८ तो अशा एका झाडासारखा होईल जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं,
आणि ज्याची मुळं पाण्याच्या दिशेने पसरलेली असतात.
त्याला उन्हाची झळ बसणार नाही,
उलट त्याची पानं नेहमी टवटवीत राहतील.+
दुष्काळाच्या वर्षी त्याला चिंता वाटणार नाही,
आणि तो आपलं फळ द्यायचं थांबवणार नाही.
९ हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं* आहे आणि ते उतावळं आहे.*+
ते कोण ओळखू शकतं?
मी प्रत्येकाच्या मनातल्या खोल विचारांचं* परीक्षण करतो,
आणि प्रत्येकाला त्याच्या वागणुकीप्रमाणे,
त्याच्या कामांप्रमाणे प्रतिफळ देतो.+
त्याची धनसंपत्ती त्याच्या आयुष्याच्या मधोमध त्याला सोडून जाईल,
आणि शेवटी तो मूर्ख ठरेल.”
१२ आमचं पवित्र ठिकाण हे सुरुवातीपासून गौरवण्यात आलेलं वैभवशाली राजासन आहे.+
१३ हे यहोवा, तूच इस्राएलची आशा आहेस.
तुला सोडून जाणाऱ्या सगळ्यांना लज्जित केलं जाईल.
तुझा त्याग करणारे धुळीत लिहिलेल्या अक्षरांसारखे नाहीसे होतील.+
कारण त्या सगळ्यांनी यहोवाला, जिवंत पाण्याच्या झऱ्याला सोडून दिलं आहे.+
१४ हे यहोवा! मला बरं कर, म्हणजे मी बरा होईन.
मला वाचव, म्हणजे माझा बचाव होईल.+
कारण मी तुझीच स्तुती करतो.
१५ बघ! ते मला असं म्हणतात:
“काय झालं यहोवाच्या वचनाचं? अजून का नाही पूर्ण झालं ते?”+
१६ पण माझ्या बाबतीत म्हणायचं, तर मेंढपाळ म्हणून मी तुझ्यामागे चालायचं कधीच सोडलं नाही.
किंवा नाशाचा दिवस यावा अशी अपेक्षाही मी केली नाही.
मी जे काही बोललो, ते सगळं तुला माहीत आहे;
तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही!
१७ मला तुझी दहशत बसू देऊ नकोस.
संकटाच्या दिवशी तूच माझं आश्रयस्थान आहेस.
१८ माझा छळ करणाऱ्यांना लज्जित होऊ दे,+
पण मला लज्जित होऊ देऊ नकोस.
त्यांना दहशत बसू दे,
पण मला दहशत बसू देऊ नकोस.
१९ यहोवाने मला असं सांगितलं: “ज्या दरवाजाने यहूदाचे राजे ये-जा करतात त्या दरवाजाकडे, म्हणजे ‘लोकांच्या पुत्रांच्या दरवाजाकडे’ आणि यरुशलेमच्या सगळ्या दरवाजांकडे जाऊन उभा राहा.+ २० आणि लोकांना असं म्हण, ‘या दरवाजांतून आत येणाऱ्या यहूदाच्या राजांनो, यहूदाच्या सगळ्या लोकांनो आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका. २१ यहोवा म्हणतो: “शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरुशलेमच्या दरवाजांतून कोणतंही ओझं बाहेर नेणार नाही किंवा आत आणणार नाही, याची खबरदारी घ्या.+ २२ शब्बाथाच्या दिवशी आपल्या घरांतून कोणतंही ओझं बाहेर आणू नका आणि कोणतंही काम करू नका.+ मी तुमच्या वाडवडिलांना आज्ञा दिली होती, की त्यांनी शब्बाथाचा दिवस पवित्र मानावा.+ २३ पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. ते हट्टीपणे वागत राहिले आणि त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत किंवा माझी शिस्त स्वीकारली नाही.”’+
२४ ‘यहोवा म्हणतो: “पण जर तुम्ही माझी आज्ञा काटेकोरपणे पाळली आणि शब्बाथाच्या दिवशी या शहराच्या दरवाजांतून कोणतंही ओझं आत आणलं नाही; तसंच शब्बाथाच्या दिवशी कोणतंही काम न करता तुम्ही तो दिवस पवित्र मानला,+ २५ तर दावीदच्या राजासनावर बसणारे राजे आणि अधिकारी+ रथांवर आणि घोड्यांवर बसून या शहराच्या दरवाजांतून आत येतील. राजे आणि त्यांचे अधिकारी, यहूदाची माणसं आणि यरुशलेमचे रहिवासी हे सगळे आत येतील;+ आणि या शहरात कायमची लोकवस्ती होईल. २६ यहूदाच्या शहरांतून, यरुशलेमच्या आसपासच्या ठिकाणांतून, बन्यामीनच्या प्रदेशातून,+ सखल प्रदेशातून,+ डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबहून* लोक येतील. ते आपल्यासोबत होमार्पणं,+ बलिदानं,+ अन्नार्पणं,+ ऊद* आणि आभार मानण्याची अर्पणं घेऊन यहोवाच्या मंदिरात येतील.+
२७ पण जर शब्बाथाचा दिवस पवित्र मानण्याची, आणि शब्बाथाच्या दिवशी यरुशलेमच्या दरवाजांतून ओझी आत न आणण्याची आज्ञा तुम्ही पाळली नाही, तर मी यरुशलेमच्या दरवाजांना आग लावीन. त्या आगीत तिचे मजबूत मनोरे* जळून खाक होतील+ आणि ती आग कधीच विझणार नाही.”’”+