स्तोत्र
दावीदचं गीत. स्तुतिगीत. संचालकासाठी.
१३९ हे यहोवा, तू मला तपासून पाहिलं आहेस आणि तू मला ओळखतोस.+
२ माझं बसणं आणि माझं उठणं तुला माहीत आहे.+
माझे विचार तू दुरूनच ओळखतोस.+
५ माझ्या मागे आणि पुढे, सर्व बाजूंनी तू माझं रक्षण करतोस,
तू आपला हात माझ्यावर ठेवतोस.
७ मी तुझ्या पवित्र शक्तीपासून* निसटून कुठे जाऊ शकतो?
तुझ्यासमोरून मी कुठे पळून जाऊ शकतो?+
८ जर मी आकाशात चढून गेलो, तर तू तिथे असशील,
९ जर मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन,
सर्वात दूरच्या समुद्राजवळ राहायला गेलो,
१० तर, तिथेही तुझा हात मला मार्ग दाखवेल
आणि तुझा उजवा हात मला सांभाळेल.+
११ “अंधार मला नक्कीच लपवू शकेल,” असं जर मी म्हणालो,
तर माझ्याभोवती रात्रीचा अंधार, प्रकाशात बदलेल.
तुझ्यासाठी काळोख आणि प्रकाश सारखाच!+
तुझी कार्यं अद्भुत आहेत,+
याची मला जाणीव आहे.
१५ जेव्हा मला गुप्त ठिकाणी बनवण्यात आलं
१६ मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं;
माझ्या शरीराच्या भागांपैकी एकही अस्तित्वात येण्याआधी,
त्या सर्वांबद्दल आणि त्यांची रचना झाली त्या दिवसांबद्दल,
तुझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं.
१७ म्हणूनच, हे देवा, तुझे विचार मला फार मौल्यवान वाटतात!+
त्यांची बेरीज करता येणार नाही!+
१८ मी ते मोजू लागलो, तर त्यांची संख्या वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.+
सकाळी जाग आल्यावरही, मी ते मोजतच असेन.*+
१९ हे देवा, कृपा करून दुष्टांचा नाश कर!+
म्हणजे हिंसाचार करणारे* माझ्यापासून दूर होतील.
२१ हे यहोवा, जे तुझा द्वेष करतात, त्यांचा मी द्वेष करत नाही का?+
जे तुझ्याविरुद्ध बंड करतात, त्यांची मला घृणा वाटत नाही का?+
२२ हो, अगदी मनापासून मी त्यांचा द्वेष करतो.+
ते खरोखर माझे शत्रू आहेत.