घोषणा
● प्रकाशन देणगीः
ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना सादर करा. लहान आवृत्ती २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज् दिले जावे.)
नोव्हेंबर: अवेक! किंवा द वॉचटावर अथवा दोघांची वार्षिक वर्गणी, प्रत्येकी ५० रुपयांना. सहा महिन्याची तसेच महिन्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्या मासिकाची वार्षिक वर्गणी रु. २५. (मासिक अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र त्रैक्य किंवा पहा! माहितीपत्रकासोबत ४८ रुपयांना.
जानेवारी: क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक रु. ६ला द्या.)
फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांच्या पुस्तकांची खास सादरता. दोन, रुपये १२ किंवा एक ६ रुपयाला.
एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर हे पुस्तक ३५ रुपयांना द्या. लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन उपलब्ध नाही तेथे १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन जुनी पुस्तके एकत्र १२ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत खास सादरतेचे एक पुस्तक ६ रुपयांना द्या.)
● जानेवारी १९९१ पासून सुरु होणाऱ्या विभागीय देखरेख्यांच्या पहिल्या फेरीत ते मंडळीतील सचिव व जमाखर्च सेवक यांजसोबत जमाखर्चाची हाताळणी कशी होते त्यासाठी थोडा वेळ खर्च करतील. विभागीय देखरेख्यांच्या व्यक्तीगत साहाय्यामुळे मंडळीतील हिशेब, संस्थेने मंडळीच्या आर्थिक व्यवहार हाताळणीविषयी दिलेल्या सूचनांनुरुप होत आहे याची खात्री करून घेता येईल.
● डिसेंबर २०-२३, १९९० मध्ये कलकत्त्यात होणाऱ्या इंग्रजी प्रांतिय अधिवेशनाच्या सभागृहाचा पत्ताः रबिंद्र सरावर स्टेडियम पॅव्हिलियन हॉल. सरत चॅटर्जी अव्हेन्यू, कलकत्ता ७०० ०२९.
कलकत्त्यात डिसेंबर २०-२३, १९९० रोजी होणाऱ्या बंगाली प्रांतिय अधिवेशनाच्या सभागृहाचा पत्ताः मैसूर असोशिएशन हॉल, ९४ डी, राजा बसंत रे रोड, कलकत्ता ७०० ०२९.
गोहाटीमध्ये जानेवारी ३-६, १९९१ रोजी होणाऱ्या प्रांतिय अधिवेशनाच्या सभागृहाचा पत्ताः रबिंद्र भवन, डायहाली पुखारीजवळ, जी. एन. बी. रोड, गोहाटी, आसाम ७८१ ००१.
● ऑक्टोबर १८-२१, १९९० दरम्यान होणारे पुण्याचे (मराठी) प्रांतिय अधिवेशन गुरुवारी दुपारी १२.३०ला सुरु होईल.
● वॉचटावर तसेच अवेक!मधील लेख असलेले माहितीपत्रक क्षेत्र कार्य अहवालात मासिक रकान्यात दाखवावीत. याचा हा अर्थ होतो की, आता ही माहितीपत्रके साहाय्यक पायनियरांना पायनियर दरात उपलब्ध होतील. साहाय्यक पायनियरांसाठीचे पायनियर क्रेडिट लिटरेचरच्या एस-२० फॉर्मवर, तुम्ही ज्या पद्धतीने नियमित व खास पायनियरांसाठी क्रेडिट मागता तसेच मागावे. यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे अधिक रुपात वितरण होईल अशी आशा आहे.