प्रश्न पेटी
● प्रचारक जेथे राहात आहेत ते क्षेत्र ज्या मंडळीचे आहे त्याच मंडळीसोबत मिळून प्रचारकांनी कार्य करावे अशी का शिफारस आहे?
सर्व गोष्टी व्यवस्थित व ईश्वरशासित मार्गाने करणे हे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने असे लिहिलेः “देव अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे. . . . सर्व काही साजेल असे व व्यवस्थितपणे होऊ द्या.”—१ करिंथ. १४:३३, ४०.
वाहनांची अडचण, प्रापंचिक कामाचा आराखडा किंवा देखरेखीच्या मदतीची गरज हे काही अपवाद असले तरी ज्या मंडळीच्या क्षेत्रात आपण राहात आहोत तेथील सभांना उपस्थित राहणे हे चांगले आहे. यामुळे क्षेत्रकार्य सुलभ होते आणि आम्हाला शेजारच्या मंडळीतील बांधवांसोबत कार्य करण्यासाठी लांब प्रवास करावा लागत नाही. हे आम्हाला आमच्या मंडळीतील इतरांसमवेत काम करण्यास तसेच आढळणाऱ्या आस्थेवाईकांना अत्यंत सुलभ असणाऱ्या सभांना मार्गदर्शित करण्यासाठी अधिक चांगले ठरते. तसेच हे आमच्या क्षेत्रात राहणाऱ्या इतर बंधू-भगिनींचा संपर्क ठेवण्यास मदत देते, जे आमच्या गरजेच्या वेळी लगेच धावून येऊ शकतात.
आम्ही स्वैराचाराचा आत्मा टाळावा व राज्य आस्थेला प्रधान स्थानी ठेवून केलेल्या व्यवस्थेतच काम केले पाहिजे. (लूक १६:१०) एखादी नवी मंडळी स्थापिली जाते किंवा पुस्तक अभ्यासांचे पुनर्संघटन केले जाते तेव्हा आपल्याला विशिष्ठ बांधवांशी राहणे आवडेल, पण आपल्या नव्या नेमणूकीनुसार आपल्याला नवे मित्र लाभू शकतात व आपल्या ईश्वरशासित सहवासात आपण अधिक विस्तीर्ण होऊ शकतो. जेव्हा प्रचारक त्यांच्या क्षेत्रातील मंडळीशी संबंध ठेवतात तेव्हा वडीलांना कळपाची देखरेख ठेवण्यास व कळपाची आध्यात्मिक स्थिती सुधारण्यात सोपे जात असते.