पायनियरींग—समृद्ध आशीर्वाद देणारी सेवा
१ आम्ही आनंदी असावे व आमच्या परिश्रमाचे आम्हाला चांगले फळ मिळावे अशी यहोवा इच्छा बाळगतो. (उप. ५:१८) तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ज्या कामात आम्ही सहभागी होऊ शकतो ते आहे राज्याचा प्रचार करण्याचे व शिष्य बनविण्याचे काम. पौलाने तीमथ्याला हा बोध केलाः “सुवार्तिकाचे काम कर. तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीमथ्यी ४:५) त्याने तीमथ्याला उत्तेजन दिले, तसेच, पौलाचे शब्द, आम्हा सर्वांना सेवकपणात पूर्ण हृदयी असण्याचे प्रोत्साहन देतात. काहींच्या बाबतीत ही पूर्ण हृदयी सेवा नियमित पायनियरींग असू शकते. तर मग, तुम्हाला आपल्या परिस्थितीमध्ये पूर्ण वेळेची सेवा करता येऊ शकेल की नाही याचा प्रार्थनापूर्वक विचार करून का बघू नये?
२ निश्चयी हालचाल जरुरीची: पायनियर कार्यात येण्यासाठी आमच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने निर्णायक पावले उचलण्यास हवी. यहोवाच्या सेवेबद्दल अंतःकरणपूर्वक इच्छा निर्माण करा, तसेच लोकांबद्दलचे प्रेम वाढवा. आपली क्षेत्रातील कार्यहालचाल वाढवा; पुनर्भेटी व पवित्र शास्त्राभ्यास वाढवा. व्यावहारिक आराखडा तयार करण्याचे काम करा; व्यवहारी असा. वडीलजन तसेच पायनियर यांच्याकडील प्रस्ताव विचारुन घ्या. प्रचार कार्यात विचारपूर्वक प्रघात अनुसरा. स्वयंशिस्त, पुढाकार आणि दृढनिश्चय या आवश्यक गोष्टी आहेत. (१ करिंथ. ९:२३, २५, २७) अलिकडील महिन्यात ज्यांनी आपली नावे पायनियरींगसाठी नोंदविली आहेत त्यांनी ही सकारात्मक पावले घेतली आहेत.
३ काही निश्चित ध्येये ठेवणे व त्यांच्या अनुषंगाने परिश्रमाने काम करणे हे आम्हाला आमच्या क्षमता उजळवून प्रचार कार्यात प्रगतिशील बनण्यात साहाय्यक करील. दारावर आम्ही आमच्या प्रस्तावना सुधारण्यासाठी किंवा आक्षेपांना जसे हाताळतो त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करु शकतो का? उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकाशनांचा आम्ही पूर्ण उपयोग करतो का? आम्ही प्रगतिशील पवित्र शास्त्र अभ्यास चालवितो का? आता आम्ही साहाय्यक पायनियरींग सुरु करून पुढे नियमित पायनियरींग करण्याचा विचार राखू शकतो का? ध्येये व्यावहारिक स्वरुपाची व ती साध्य करण्याजोगी असली पाहिजेत. अशी ध्येये साध्य केल्यामुळे आमचा प्रभावीपणा सुधरु शकेल व आम्हाला अधिक समाधान मिळेल.—१ तीमथ्य ४:१५, १६.
४ जीवनाचा प्रतिफळदायक मार्ग: योग्य हेतूने व आध्यात्मिक प्रगति करण्याच्या इच्छेने केलेली पायनियरींग पुष्कळ लाभ देते. आम्ही यहोवावर अधिक बळकटपणे आत्मविश्वास टाकू लागतो. सेवकपणात देवाचे वचन नियमित रुपाने हाताळल्यामुळे त्यातील कुशलता वाढते. मंडळीवर हितकारी प्रभाव पडतो व आमच्या आवेशी उदाहरणामुळे इतरांना अधिक सहभाग घेण्याचे उत्तेजन मिळते. पायनियरींगमुळे आपल्याला जीवनाबद्दल अधिक आध्यात्मिक दृष्टीकोण वाढविण्यास मदत मिळते आणि जागतिक इच्छा, आकांक्षा व सोबती वाढविण्यापासून संरक्षण देते.
६ येशूने आपल्या अनुयायांना म्हटलेः “पीक फार, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३७, ३८) कामकऱ्यांची गरज येशूच्या काळी होती त्यापेक्षा आज कितीतरी अधिक आहे. या तातडीच्या जीवनप्रदायक कामात पूर्ण सहभाग घेण्यात पायनियरींग आम्हाला मुभा देते. आपले जीवन आपल्या थोर निर्मात्याच्या पूर्ण वेळेच्या सेवेत वापरण्यामुळे जे समाधान व तृप्ती मिळते त्याची तुलना इतर कोठेही होऊ शकत नाही.—नीती. १०:२२.