शांती व निर्भयतेच्या देवाच्या मार्गाचा प्रचार करा
१ शांती व निर्भयतेसाठी मनुष्याने अनेक योजना केल्या आहेत, परंतु यातील कोणतीही जगातील लोकांच्या गरजा पूर्ण करू शकली नाहीत. निर्भय व शांतिपूर्ण जगाच्या आड येणारी अडखळणे धार्मिक, वंश व राष्ट्रीय द्वेष, याबरोबर राजनैतिक महत्वाकांक्षा व लोभ, ही असली तरी, खऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे की खरे अडखळण दियाबल सैतान, व यहोवा देवाच्या अधीन होण्याचा मनुष्याचा नकार हे आहे.—स्तोत्र. १२७:१; यिर्मया ८:९; १ योहान ५:१९.
२ जानेवारी महिन्यात आम्ही आमच्या शेजाऱ्यांना शांती व निर्भयतेसाठी देवाचाच मार्ग केवळ एकमेव आहे व मानवजातीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी यहोवाजवळ अंतिम उपाय आहे हे पाहण्याकरता मदत करणार आहोत.
३ हस्तपत्रिकांचा वापर करा: संस्थेने आमच्यासाठी तयार केलेल्या हस्तपत्रिकांचा चांगला वापर करून आम्ही उभारणीकारक संदेशाची सहभागिता करू शकतो. संभाषण सुरू करून पवित्र शास्त्र अभ्यास करण्याप्रत विविध हस्तपत्रिकांचा कसा वापर केला जाऊ शकतो याची आम्ही आधी प्रात्यक्षिके पाहिली आहेत. या जगाच्या अंताविषयी पवित्र शास्त्रातील विविध भविष्यवाण्यांची पूर्णता, यातील काही तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता, या हस्तपत्रिकेतील पृष्ठे ५ व ६ वर उल्लेखिलेल्या आहेत, ज्या पुष्कळांचे लक्ष वेधवू शकतात.
४ यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे? हस्तपत्रिका क्र. १४ संक्षिप्तपणे त्या प्रश्नाचे उत्तर देते. ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसपेक्षा आमचे विश्वास वेगळे का आहेत याचे ते स्पष्टीकरण देते व देवाच्या राज्यावर लोकांना विश्वास ठेवण्यास मदत करण्याच्या आमच्या सतत प्रयत्नास कारण देते. हे राज्य लवकरच काय साध्य करील ते दाखविते व येणाऱ्या नाशातून बचावण्याची भव्य आशा प्रकट करते.
५ आज लाखो लोक चिंतातूर आहेत, व बरे होण्याची तसेच खरी शांती, निर्भयता व स्वस्थतेच्या समयाची वाट पाहून आहेत. शांतिदायक नवीन जगातील जीवन (हस्तपत्रिका क्र. १५) पुष्कळांसाठी उत्तेजनाचा खरा स्त्रोत असू शकते.
६ हस्तपत्रिका क्र. १६, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ज्यांनी मृत्यूत काहींना गमावले आहे अशांना सांत्वन देते व देवाच्या नवीन जगात त्यांच्या प्रिय जनांना पुन्हा उठलेले पाहण्याची आशा पुरविते.
७ पवित्र शास्त्र अभ्यास सुरू करा: पवित्र शास्त्राचा अभ्यास हस्तपत्रिका, माहितीपत्रक, मासिक, किंवा एखाद्या पुस्तकाने सुरू केला जाऊ शकतो. तुम्हाला असे समजले की घरमालकाजवळ अगोदरच आमचे प्रकाशन आहे तर, पवित्र शास्त्र अभ्यास करण्यासाठी त्याचा कसा वापर करू शकतो याचे चतुराईने प्रात्यक्षिक दाखवा. घरमालकाची आस्था वाढवून पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू करण्यासाठी आमच्या हस्तपत्रिका व आपल्या समस्या—त्या सोडविण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक उत्कृष्ट साधने आहेत. याशिवाय, या महिन्यात आम्ही १९२ पृष्ठांची जुनी प्रकाशने सादर करणार आहोत. घोषणेच्या रकान्यात पुस्तकांच्या दिलेल्या यादीत तुमच्या भाषेत सुचविलेली सादरता याकडे कृपया लक्ष द्या व यातील प्रकाशने मिळवून सेवेत त्यांचा वापर करा.
८ खरी निर्भयता निर्माणकर्त्या यहोवा देवाकडूनच केवळ येऊ शकते. देवाच्या वचनातील सत्यासाठी लोकांची मने व हृदये उघडी करून जी आशा आम्हासाठी राखलेली आहे तिच्यात टिकून राहण्यासाठी होता होईल तितक्या लोकांना आम्ही मदत केली पाहिजे. शांती व निर्भयतेचा देवाच्या मार्गाचा प्रचार करण्यासाठी आम्हाजवळ असलेल्या शिकविण्याच्या साधनांचा आम्ही चांगला वापर करू या.—यशया. २:३, ४.