समयोचित संदेश
जानेवारी १९९३ च्या आमची राज्य सेवा यात घोषणा केल्याप्रमाणे या वर्षी स्मारक विधीच्या काळात दिले जाणारे खास जाहीर भाषण बहुतेक मंडळ्यामध्ये मार्च २८ ला सादर केले जाणार आहे. या समयोचित संदेशाचे शिर्षक “‘देवाची कृत्ये’—त्याविषयी तुम्ही कसा दृष्टीकोन बाळगता?” असे आहे. आस्थेवाईकांना निमंत्रण देण्याचे खास प्रयत्न केले पाहिजेत. याला उपस्थित राहणाऱ्यांना एप्रिल ६ ला स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्यावे.