देवाच्या वचनात सामर्थ्य आहे
१ बायबलने लाखो लोकांच्या जीवनावर बराच प्रभाव पाडला आहे. कोणताही मनुष्य जे देऊ शकतो त्यापेक्षा बायबल जे काही म्हणते ते अधिक चालना देणारे आहे. (इब्री. ४:१२) त्याने आपल्यासाठी काय केले आहे याकडे लक्ष द्या. खरेच, त्याच्या मूल्याची तुलना केली जाऊ शकत नाही.
२ यहोवाचे साक्षीदार बायबलचे प्रमुख विद्यार्थी आणि समर्थक आहेत. आपण, बायबल वाचनाला आपल्या नियमित ईश्वरशासित आराखड्याचा आवश्यक भाग असे समजले पाहिजे. दूरदर्शन पाहणे किंवा इतर सर्व मनोरंजनाच्या गोष्टींपेक्षा त्यास प्राधान्य दिले पाहिजे.
३ ती नियमित सवय बनवा: नियमित बायबल वाचनाने जो सामर्थ्यशाली प्रभाव पडू शकतो त्यास यहोवाच्या लोकांनी जाणून घेतले आहे. पुष्कळ वर्षांपासून ब्रुकलिनमधील आपल्या एका कारखान्याच्या इमारतीवरील एक मोठे चिन्ह प्रत्येक वाटसरूला “देवाचे वचन पवित्र बायबल दररोज वाचा,” असे आर्जवित आले आहे. बेथेल कुटुंबाच्या नवीन सदस्यांनी त्यांच्या बेथेल सेवेच्या पहिल्या वर्षात संपूर्ण बायबल वाचावे ही अपेक्षा केली जाते.
४ तुमचा व्यग्र आराखडा असतानाही, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या आराखड्यात दिलेले साप्ताहिक बायबल वाचन तुम्ही करता का? असे करणे तुम्हाला कठीण जात असेल, तर नोव्हेंबर दरम्यान सुधारणा करण्याचा प्रयत्न का करू नये? संपूर्ण महिन्याचे बायबल वाचन स्तोत्रसंहिता ६३-७७, हे आहे. त्याकरता एका आठवड्यात तीन ते चार पृष्ठांचे वाचन करण्याची आवश्यकता आहे. काहीजण दररोज थोडेसे वाचन करण्याचे ठरवतात, कदाचित पहाटे किंवा रात्री झोपण्याआधी. तुम्ही ते केव्हाही करत असला, तरी देवाच्या वचनाचे नियमित वाचन केल्याने प्राप्त होणाऱ्या हितकारक लाभांची कापणी तुम्ही करता ही महत्त्वाची गोष्ट आहे.
५ नोव्हेंबर दरम्यान बायबल सादर करा: पुष्कळ लोक बायबलबद्दल आदर दाखवतात आणि आपण त्यातून वाचतो तेव्हा त्यांना ऐकण्याची इच्छा असते. नोव्हेंबर दरम्यान आपण अधिककरून न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आणि द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे सादर करणार आहोत. यामुळे आपल्याला प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देव वचनाचे मूल्य दाखवण्यास उत्तम संधी मिळते. ते करण्यात उत्साही असा.
६ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन याच्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांबद्दल काही विचारपूर्वक विवेचने तयार करा ज्यामुळे ते प्राप्त करण्यासाठी लोकांची आस्था उद्दीपित केली जाईल. त्याचे व्यावहारिक मूल्य ठळकपणे दाखवा आणि द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? या पुस्तकाच्या सादरतेसह ते जोडा. तुम्ही ९२-पृष्ठांच्या बायबल शब्दांच्या सूचीचे मूल्य सिद्ध करून दाखवू शकता किंवा बायबल अभ्यासात “परिशिष्ट” किंवा “बायबल पुस्तकांची सूची” यांचे काय महत्त्व आहे ते दाखवून त्यापैकी एकाला ठळकपणे मांडू शकता. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आधुनिक इंग्रजी भाषेत असल्यामुळे समजण्यास सोपे आहे हे सांगा. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन, यहोवा या ईश्वरी नावाचा उल्लेख ७,२१० वेळा करते हे सांगा.
७ घरमालकास इंग्रजी येत नाही किंवा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन याची सादरता नाकारली जाते तेथे, तुम्ही कदाचित एखादे माहितीपत्रक किंवा १९२-पृष्ठांचे पुस्तक सादर करू शकता. परंतु त्या प्रकाशनात असलेली सुवार्ता आणि मार्गदर्शन देवाच्या वचनातून घेतल्यामुळे व्यावहारिक आहे ही वास्तविकता ठळकपणे नक्की मांडा.
८ होय, बायबल हे देवाचे वचन आहे. आपण ते वाचले, त्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या जीवनात त्याचा सल्ला अनुसरला तर आपण पुष्कळ लाभांची कापणी करू. आपल्याला सूचना आणि आशा देण्याकरता ते लिहिण्यात आले होते. (रोम. १५:४) त्यातून दररोज सल्ला घेणे आणि इतरांना शिकवण्यासाठी त्याचा वापर करण्यास तयार असणे हे अत्यावश्यक आहे.