गीत २५ (२०४)
“हा मी आहे! मला पाठीव”
(यशया ६:८)
१. देवाच्या उज्ज्वल नामा,
जन लावती काळीमा.
देवास ते नाकारती,
अशक्त त्यास म्हणती.
कोण पुशील काळिमा?
गाईल त्याची महिमा?
‘हा मी आहे! पाठीव मला.
निष्ठेने गाईन स्तुतीला’.
(समूह)
२. देवास ना घाबरती,
मंदगती हिणवती.
मूर्तींस पूजती कोणी,
कैसर देवाच्या स्थानी.
कोण सांगे जे भविष्यात?
अंतिम युद्धाच्या इशाऱ्यास?
‘हा मी आहे! पाठीव मला.
धैर्ये देईन इशाऱ्याला’.
(समूह)
३. टाकती उसासे दीन,
दुष्टाई त्यास कारण.
निर्मल मने शोधती,
सत्य, जे दे खरी शांती.
कोण देई शांती दीनां?
हात नीतिमान होण्या?
‘हा मी आहे! पाठीव मला.
शिकवीन मी दीनाला’.
(समूह)
नसे दुजा सन्मान भला,
हा मी! पाठीव मला’.