वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १२/१ पृ. ३-५
  • “अहो नम्र जनहो, यहोवाचा शोध करा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अहो नम्र जनहो, यहोवाचा शोध करा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रतेचा शोध का केला पाहिजे?
  • आज ‘नम्रतेचा शोध’ घेणारे
  • नम्रतेने प्रतिसाद द्या
  • नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १२/१ पृ. ३-५

“अहो नम्र जनहो, यहोवाचा शोध करा”

“पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांनो, ज्या तुम्ही यहोवाचे विधी पाळले आहेत, ते तुम्ही त्याला शोधा. न्यायीपण शोधा, नम्रता शोधा. कदाचित्‌ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल.”—सफन्या २:३, पं. रमाबाई भाषांतर.

सफन्या संदेष्ट्याने ते शब्द “पृथ्वीतल्या सर्व नम्र” लोकांना संबोधले, व “यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी” रक्षण होण्यासाठी, त्याने त्यांना “नम्रता शोधा” असे आर्जवले. यामुळे बचावासाठी नम्रता ही पूर्वापेक्षित आहे, याबद्दल जराही शंका राहत नाही. परंतु का?

नम्रतेचा शोध का केला पाहिजे?

नम्रता हा गुण सौम्य वृत्तीचा असून, फाजील आत्मविश्‍वास किंवा अहंकारापासून दूर आहे. त्याचा इतर सद्‌गुणासोबत, जसे की लीनता आणि दीनतेसोबत निकटचा संबंध आहे. असे असल्यामुळे, नम्र व्यक्‍ती, शिकवता येण्याजोग्या असतात व देवाकडील शिस्त जरी काही वेळेसाठी दुःखाची वाटली तरी तिचा ते स्वेच्छेने स्वीकार करणारे असतात.—स्तोत्रसंहिता २५:९; इब्रीयांस १२:४-११.

एखाद्याचे शिक्षण किंवा जीवनातील त्याच्या स्थराशी नम्रतेचा काहीच संबंध असू शकत नाही. तथापि, उच्च शिक्षण घेतलेले किंवा जगीक दृष्ट्या यश संपादन केलेल्यांचा, प्रत्येक गोष्टीत, उपासनेच्याबाबतीत देखील, स्वतःसाठी निर्णय घेण्यास ते लायक आहेत असे वाटण्याचा कल असू शकतो. यामुळे दुसऱ्‍या व्यक्‍तीने त्यांना काही गोष्टी शिकवण्यापासून किंवा सल्ल्याचा स्वीकार करून आवश्‍यक ते बदल त्यांच्या जीवनात करण्यापासून ही गोष्ट त्यांना परावृत्त करू शकते. भौतिक गोष्टीत समृद्ध असलेले इतर जण, त्यांची सुरक्षितता त्यांच्या भौतिक मालमत्तेवर आधारित आहे या चुकीच्या विचारशैलीला बळी पडू शकतात. या कारणास्तव, देवाचे वचन, पवित्र शास्त्रातून आध्यात्मिक संपत्तीची काही गरज नाही असे त्यांना वाटते.—मत्तय ४:४; ५:३; १ तीमथ्य ६:१७.

येशूच्या दिवसातील शास्त्री, परुशी आणि प्रमुख याजकांचा जरा विचार करा. एके प्रसंगी, येशूला धरून आणण्यासाठी पाठवलेले शिपाई तसेच परत आले तेव्हा, परुशांनी म्हटले: “तुम्हीही फसला आहा काय? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परुशांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे काय? पण हा, जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” (योहान ७:४५-४९) दुसऱ्‍या शब्दात सांगावयाचे तर, परुशांच्या मतानुसार, अज्ञानी, न शिकलेलेच केवळ येशूवर विश्‍वास ठेवण्यासाठी सालस आहेत.

असे असतानाही, काही परुशी सत्याकडे आकर्षित झाले व त्यांनी येशूचे तसेच ख्रिश्‍चनांचे समर्थन केले. त्यापैकी निकदेम आणि गमलियेल हे होते. (योहान ७:५०-५२; प्रे. कृत्ये ५:३४-४०) येशूच्या मृत्यूनंतर, “याजकवर्गातील पुष्कळांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.” (प्रे. कृत्ये ६:७) प्रेषित पौल, निसंशये याचे उल्लेखनीय उदाहरण होता. तो गमलियेलकडून शिक्षित होऊन, अतिशय निपूण झाला व यहुदी धर्माचा आदरणीय पुरस्कर्ता बनला. तथापि, कालांतराने, ख्रिस्त येशूच्या हाकेला लीनतेने त्याने प्रतिसाद दिला व त्याचा आवेशी अनुयायी झाला.—प्रे. कृत्ये २२:३; २६:४, ५; गलतीकर १:१४-२४; १ तीमथ्य १:१२-१६.

या सर्व गोष्टी दाखवतात की, एखाद्याची कोणतीही पार्श्‍वभूमी असली किंवा पवित्र शास्त्रातील संदेशाबद्दल एखाद्याला कसेही वाटत असले तरीदेखील, सफन्याचे शब्द लागू होतात. एखाद्याला देवाची संमती हवी असल्यास व त्याच्या वचनाद्वारे मार्गाक्रमण करावे असे वाटत असल्यास, नम्रता अतिआवश्‍यक आहे.

आज ‘नम्रतेचा शोध’ घेणारे

संपूर्ण जगभरात लाखो लोक राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत. यहोवाचे साक्षीदार, अशा लोकांच्या घरी प्रत्येक आठवडी जाऊन, चाळीस लाखापेक्षा अधिक पवित्र शास्त्र अभ्यास चालवत आहेत. ते अनेक तसेच विविध पार्श्‍वभूमीतून व विविध आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमधून आलेले आहेत. तरीसुद्धा, त्यांच्यात एक गोष्ट मात्र सामान्य आहे की, त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी, कोणी पवित्र शास्त्राचा संदेश सादर केला तेव्हा तो स्वीकारण्याएवढी लीनता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मार्गात येणाऱ्‍या अडखळणांवर मात करण्यासाठी ते स्वेच्छेने प्रयत्न करत असल्यामुळे त्यांच्यातील अनेक जण उत्तम प्रगती करत आहेत. होय, आज ते ‘पृथ्वीतील नम्र जनां’पैकी आहेत.

उदाहरणार्थ, मेक्सिकोतील मरीयेचा विचार करा. विश्‍वविद्यालयात तिने वकिलीचा अभ्यास केला व वारसाहक्कामुळे तिची आर्थिक परिस्थिती चांगली होती. या गोष्टीमुळे, तिने अतिशय स्वतंत्र विचारधारा विकसित केली व त्याचे पर्यवसान, ती सांगते की, “बंडखोर, उद्ध्‌ट, शिरजोरी करणारी, व नास्तिकता मानणाऱ्‍या” व्यक्‍तीत झाले. मरीयाला आठवते: “मी असा विचार करु लागले की पैशाने सर्वच गोष्टींना उत्तर मिळते, व देव काही महत्त्वाचा नाही. खरेतर, मला वाटले की तो अस्तित्वातच नाही.” तिने यात भर टाकली की, “माझ्यासाठी धर्म एक थट्टेखोरपणा व केवळ समाजाच्या गरजेसाठी असलेली एक गोष्ट होती.”

तद्‌नंतर, मरीयाने तिचा चुलत भाऊ, यहोवाचा साक्षीदार झाल्यावर त्याच्यात झालेला बदल पाहिला. तिने स्पष्ट केले की, “तो अतिशय वाईट होता, पण आता फारच शांत व सरळ व्यक्‍ती झाला होता.” “नातेवाईकांनी म्हटले की तो प्रचारक असल्यामुळे पवित्र शास्त्र वाचतो व यामुळे आता तो पीत नाही किंवा बायकांच्या मागे लागत नाही. या कारणास्तव, मला अत्यंत गरज असलेली शांती व स्थिरचित्त मिळू शकेल यासाठी त्याने येऊन माझ्यासाठी पवित्र शास्त्र वाचावे, असा मी विचार केला.” याचे पर्यवसान, मरीयाने साक्षीदार जोडप्याकडून पवित्र शास्त्र अभ्यासाचा स्वीकार करण्यात झाले.

अनेक गोष्टींवर तिला मात करावयाची होती, व पतीच्या अधीन राहण्यासाठी, मस्तकपदाविषयी पवित्र शास्त्रीय तत्त्वाचा स्वीकार करणे तिच्यासाठी अतिशय कठीण गोष्ट होती. परंतु तिने तिच्या जीवनात व मनोवृत्तीत आमूलाग्र बदल केले. तिने कबूल केले: “जेव्हापासून बांधव माझ्या घरी येऊ लागले, व त्यांच्यासोबत त्यांनी यहोवाची मदत आणली, तेव्हापासून माझ्या घरात, आनंद, स्थिरचित्त, आणि देवाचा आशीर्वाद आहे.” मरीया आज, समर्पित बाप्तिस्मा झालेली यहोवाची साक्षीदार आहे.

खरी भक्‍ती करताना, नम्रता, किंवा तिचा अभाव एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. अनेकदा, कुटुंबातील पत्नीची, सत्याचा स्वीकार करून देवाची सेवा करण्याची इच्छा असते, पण पती नाराज असतो. काही पतींना, त्यांच्या पत्नीने, दुसऱ्‍या कोणाच्या तरी, म्हणजे यहोवा देवाच्या अधीन असले पाहिजे या गोष्टीचा स्वीकार करणे अतिशय मुश्‍कीलीचे वाटते. (१ करिंथकर ११:३) मेक्सिकोमधील चिहूआहूआ येथील एका स्त्रीने पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा केली, व कालांतराने ती व तिची सात मुले सत्यात आली. पहिल्यांदा तिच्या पतीने विरोध केला होता. का बरे? कारण त्याच्या कुटुंबाने घरोघरी जाऊन प्रचार करत, पवित्र शास्त्र प्रकाशनांना सादर करावे हे त्याला नको होते. असे दिसते की, हे त्याच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे आहे असे त्याला वाटत होते. तथापि, त्याचे कुटुंब देवाची सेवा करण्याच्या त्यांच्या निश्‍चयात स्थिर राहिले. काही काळाने, पतीला, देवाच्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातील मोल दिसू लागले. परंतु यहोवाला त्याने स्वतःचे समर्पण करेपर्यंत १५ वर्षे निघून गेली.

संपूर्ण मेक्सिकोमध्ये, अमेरिकन इंडियन भाषा व त्यांच्या प्रघातानुसार चालणाऱ्‍या रहिवाशांच्या अजूनही अनेक विरळ वसाहती आहेत. काहीजण सत्य शिकत असताना लिहिण्या-वाचण्यास शिकतात तसे पवित्र शास्त्राचा संदेश या लोकांप्रत पोहचत आहे, व त्यांच्या परंपरेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करत आहे. तथापि, लोकांचे कमी शिक्षण झालेले असले, किंवा त्यांच्याकडे पुरेशी भौतिक मालमत्ता असली तरच ते ग्रहणक्षम असतील असा त्याचा अर्थ होत नाही. काहींना जातीय अभिमान व पूर्वजांच्या परंपरेविषयी असलेला जिव्हाळा अनेकदा सत्य स्वीकारण्यास कठीण बनवत असतो. ही गोष्ट, इंडियन खेडेगावात सत्याचा स्वीकार करणाऱ्‍यांचा गावकऱ्‍यांकडून अनेकदा छळ केला जातो याचेही स्पष्टीकरण देते. याप्रकारे नम्रता अनेक आकार घेऊ शकते.

नम्रतेने प्रतिसाद द्या

व्यक्‍तिगतपणे, तुमच्याबद्दल काय? देवाच्या वचनाच्या सत्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात का? किंवा तुम्हासाठी, पवित्र शास्त्राच्या काही सत्यांचा स्वीकार करणे कठीण आहे? तुम्हाला कोणती गोष्ट अडथळा आणत आहे यासाठी कदाचित स्वतःचे परीक्षण करावेसे तुम्हाला वाटेल. सत्याचा स्वीकार केलेले बहुसंख्यांक लोक, कनिष्ठ उगमातून आल्यामुळे तुमचे मनःस्वास्थ्य बिघडले आहे का? तुमच्या विचारसरणीत वैयक्‍तिक अहंकार समाविष्ट असू शकतो का? प्रेषित पौलाच्या शब्दावर मनन करणे उचित आहे: “ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले; आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्‍या करता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये.”—१ करिंथकर १:२७-२९.

तुम्हाला हलक्या दर्जाच्या, मातीच्या भांडयात धन सापडल्यामुळे ते तुम्ही नाकारणार का? कदापि नाही! तरीही, देव, जीवन बचावणाऱ्‍या सत्याचे वचन आम्हाला सादर करण्यासाठी तो मार्ग निवडतो. प्रेषित पौल स्पष्ट करतो: “ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे.” (२ करिंथकर ४:७) नम्रता आणि लीनता, आम्हाला केवळ ‘मातीच्या भांड्यांना’, किंवा मानवी माध्यमांना नव्हे तर, संपत्तीचे खरे मोल पाहण्यास आम्हाला मदत करील. असे केल्याने, “यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी लपवले” जाण्याच्या संभवनीयतेला देखील आम्ही वाढवू, तसेच ‘पृथ्वीचे वतन भोगणाऱ्‍या’ नम्र जनांतील आम्ही असू.—सफन्या २:३; मत्तय ५:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा