वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ८/१ पृ. १५-२०
  • समंजसपणा विकसित करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समंजसपणा विकसित करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “क्षमा करण्यास तत्पर”
  • बदलणाऱ्‍या परिस्थितींचा सामना करताना लवचीकपणा
  • अधिकाराच्या वापरात समंजसपणा
  • यहोवाचं अनुकरण करा​—समजूतदार असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवा समंजस आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “अशांना प्रिय समजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ८/१ पृ. १५-२०

समंजसपणा विकसित करा

“तुमचा समंजसपणा सर्वांना कळून येवो. प्रभु समीप आहे.”—फिलिप्पैकर ४:५, NW.

१. आजच्या जगात समंजस असणे ही आव्हानात्मक गोष्ट का आहे?

“समंजस मनुष्य”—याला इंग्रजी वृत्तपत्रकार सर ॲलन पॅट्रीक हरबर्ट यांनी दंतकथेतील एक व्यक्‍ती असे म्हटले. वस्तुतः कधी कधी वाटते की, या युद्धग्रस्त असलेल्या जगात समंजस लोकच राहिले नाहीत. पवित्र शास्त्राने भाकीत केले की या ‘शेवटल्या कठीण दिवसात,’ लोक “क्रूर,” “हूड,” व “शांतताद्वेषी” असतील. दुसऱ्‍या शब्दात सांगायचे तर लोक कोणत्याही परिस्थितीत समंजस असणार नाहीत. (२ तीमथ्य ३:१-५) तरीसुद्धा, खरे ख्रिस्ती समंजसपणाला ईश्‍वरी बुद्धिचे चिन्ह जाणून त्याला मोलवान समजतात. (याकोब ३:१७) असमंजस जगात समंजस असणे हे अशक्य असल्याचे आम्हाला वाटत नाही. उलटपक्षी, आम्ही फिलिप्पैकर ४:५ मधील प्रेषित पौलाच्या या प्रेरित सल्ल्याच्या प्रेरणेचा मोकळेपणाने स्वीकार करतो: “तुमचा समंजसपणा सर्वांना कळून येवो.”

२. आम्ही समंजस आहोत का हे ठरविण्यासाठी प्रेषित पौलाचे फिलिप्पैकर ४:५ मधील शब्द आमची कशी मदत करतात?

२ आम्ही समंजस आहोत का याची पारख करण्यासाठी पौलाचे शब्द आम्हाला कसे मदत करतात याकडे लक्ष द्या. आपण स्वतःकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हा तो प्रश्‍न नव्हे तर, इतर जण आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, आम्हाला कसे ओळखले जाते हा आहे. या वचनाचा अनुवाद फिलिप्सचे भाषांतर अशाप्रकारे करते: “समंजस असण्याची साजेशी ख्याती असू द्या.” आम्हातील प्रत्येक जण स्वतःला विचारु शकतो, ‘मला कसे ओळखले जाते? मला समंजस, नमते घेणारा, व सौम्य असे समजतात का? किंवा माझी ख्याती कडक, कठोर, किंवा हूड अशी आहे का?’

३. (अ) “समंजस” यासाठी भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे, व हा गुण अपीलकारक का आहे? (ब) एखादा ख्रिस्ती अधिक समंजस असण्याचे कसे शिकू शकतो?

३ या बाबतीत आमची साजेशी ख्याती, आम्ही येशू ख्रिस्ताचे कितपत अनुकरण करीत आहोत ते प्रदर्शित करील. (१ करिंथकर ११:१) येशू पृथ्वीवर असताना, त्याने पित्याच्या समंजसपणाचे सर्वोच्च उदाहरण पूर्णपणे प्रकट केले. (योहान १४:९) वस्तुतः, पौलाने “ख्रिस्ताची सौम्यता व दया” याविषयी लिहिले तेव्हा, त्याने वापरलेल्या दया (ए·पी·ई·केʹस) याचाही अर्थ, “समंजसपणा” किंवा शब्दशः नमते घेणे असा होतो. (२ करिंथकर १०:१, NW) द एक्स्पोझिटरर्स बायबल कॉमेंटरी याला “नवीन करारातील चरित्राचे वर्णन करण्यासाठी आजपर्यंत वापरलेल्या मोठ्या शब्दांतील एक शब्द” असे म्हणते. ते अपील करणाऱ्‍या गुणांचे वर्णन करत असल्यामुळे एका विद्वानाने या शब्दाचा अनुवाद “मनास गोड वाटणारा समंजसपणा” असा केला. या कारणास्तव, येशूने त्याचा पिता, यहोवा याने समंजसपणा दाखविलेल्या तीन मार्गांची आपण चर्चा करु या. त्याद्वारे आपण अधिक समंजस कसे होऊ शकतो हे शिकू या.—१ पेत्र २:२१.

“क्षमा करण्यास तत्पर”

४. येशूने स्वतःच्या बाबतीत “क्षमा करण्यास तत्पर” असल्याचे कसे दाखवले?

४ येशूने त्याच्या पित्याप्रमाणे वारंवार “क्षमा करण्यास तत्पर” राहून समंजसपणा प्रदर्शित केला. (स्तोत्र ८६:५) येशूला अटक करुन चौकशी करण्यात आली त्या रात्री त्याचा जवळचा सोबती, पेत्र याने त्याला तीन वेळा नाकारले, या प्रसंगाचा विचार करा. स्वतः येशूने आधीच नमूद केले होते: “जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील.” (मत्तय १०:३३) येशूने पेत्रावर हा नियम कडकपणे व निर्दयीपणे लागू केला का? नाही; पुनरूत्थानानंतर येशूने व्यक्‍तिशः पेत्राला भेट दिली. त्याच्या या पश्‍चात्तापी भग्नहृदयी प्रेषिताला सांत्वन व खातरी देण्याकरता ही भेट दिली असावी यात कोणताही संशय नाही. (लूक २४:३४; १ करिंथकर १५:५) त्यानंतर लगेचच, येशूने पेत्राला मोठी जबाबदारी पूर्ण करण्याची अनुमती दिली. (प्रे. कृत्ये २:१-४१) येथे मनास गोड वाटणाऱ्‍या समंजसपणाचे उत्तम प्रदर्शन झाले! यहोवाने येशूला सर्व मानवजातीवर न्यायाधीश म्हणून नियुक्‍त केले असा विचार करणे सांत्वनदायक नाही का?—यशया ११:१-४; योहान ५:२२.

५. (अ) वडिलांची मेंढरांमध्ये कोणती ख्याती असली पाहिजे? (ब) वडिलांनी न्यायदानाची प्रकरणे हाताळण्याआधी कोणत्या साहित्याची उजळणी करण्यास हवी व का?

५ मंडळीत, वडील न्यायाधीशाचे कार्य करतात तेव्हा, ते येशूच्या समंजस उदाहरणाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. ते शिक्षा देणारे आहेत असे समजून मेंढरांनी त्यांची भीती बाळगावी अशी त्यांची इच्छा नाही. उलटपक्षी, ते येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, मेंढरांना आपल्यासोबत प्रेमळ मेंढपाळ आहेत याची सुरक्षितता वाटू लागेल. न्यायविषयक प्रकरणात समंजस, क्षमा करण्यास तत्पर असण्यासाठी ते पुष्कळ प्रयत्न करतात. अशी प्रकरणे हाताळण्याआधी, काही वडिलांना ऑक्टोबर १, १९९२ च्या टेहळणी बुरुज मधील “यहोवा, निःपक्षपाती, ‘सर्व जगाचा न्यायाधीश’” व “वडिलांनो, धार्मिकतेने न्यायनिवाडा करा” या लेखांची उजळणी करणे मदतदायक दिसून आले आहे. यास्तव, ते यहोवाच्या न्याय करण्याच्या पद्धतीचे समालोचन लक्षात घेतात: “जरुर आहे तेथे दृढता, शक्य आहे तेथे दया दाखवणे.” न्यायात दया दाखवण्यास समंजस आधार असला तर तसे करण्यासाठी असलेला कल चुकीचा नाही. (मत्तय १२:७) कठोर व निर्दयी असणे ही गंभीर चूक आहे. (यहेज्केल ३४:४) अशाप्रकारे, वडील जण, शक्यतो न्यायाच्या मर्यादेत प्रेमळ व दयाळुपणाच्या मार्गाचा क्रियाशीलपणे शोध करुन चुका टाळतात.—पडताळा मत्तय २३:२३; याकोब २:१३.

बदलणाऱ्‍या परिस्थितींचा सामना करताना लवचीकपणा

६. जिची मुलगी भुतग्रस्त होती त्या परराष्ट्रीय स्त्रीसोबत वागताना येशूने समंजसपणा कसा प्रदर्शित केला?

६ यहोवाप्रमाणेच, येशूने देखील नव्या परिस्थिती उद्‌भवल्या तेव्हा, त्वरित मार्ग बदलला किंवा त्यांबरोबर जुळवून घेतले हे त्याने स्वतःच्या बाबतीत शाबीत केले. एके प्रसंगी, परराष्ट्रीय स्त्रीने , भुताने फारच जर्जर केलेल्या तिच्या मुलीला बरे करण्याविषयी त्याच्याकडे विनवणी केली. येशू तिला मदत करणार नाही हे त्याने तीन विविध मार्गांद्वारे सूचित केले—प्रथम, त्याने तिला उत्तर दिले नाही; दुसरा, त्याला परराष्ट्रीयांकरता नव्हे तर यहुद्यांकरता पाठविले असे थेटपणे सांगितले; तिसरा मार्ग, दयाळुपणे त्यासारखाच मुद्दा मांडणारा दृष्टांत दिला. तथापि, या सर्वांत ती स्त्री चिकाटी धरुन राहिली. यामुळे तिने आपल्या विश्‍वासाचा असामान्य पुरावा दिला. या दृष्टिकोनाला विचारात घेऊन या अपवादात्मक परिस्थितीत, ही वेळ सामान्य नियम लादण्याची नसून; उच्च तत्त्वांच्या उत्तराविषयी लवचीक असण्याची आहे हे येशू पाहू शकत होता.a अशाप्रकारे, येशूने जी गोष्ट न करण्याचे तीन वेळा सांगितले होते तीच त्याने केली. त्याने त्या स्त्रीच्या मुलीला बरे केले!—मत्तय १५:२१-२८.

७. पालक कोणत्या मार्गांद्वारे समंजसपणा दाखवू शकतात, व का?

७ अशाचप्रकारे, आम्ही देखील उचित असेल तेथे लवचीक असण्याच्या आमच्या स्वेच्छेबद्दल परिचित आहोत का? पालकांनी वारंवार असा समंजसपणा दाखवला पाहिजे. प्रत्येक मूल वेगळे असल्यामुळे, ज्या पद्धती एकाच्या बाबतीत यशस्वी होतात त्याच दुसऱ्‍यासाठी अनुचित असू शकतील. याशिवाय, मुलांची वाढ होते तसे त्यांच्या गरजा बदलतात. पालकांनी ठरविलेल्या वेळी मुलांनी घरी आलेच पाहिजे यात काही तडजोड केली जाऊ शकते का? कौटुंबिक अभ्यासाला उत्साहपूर्ण रीतीपासून लाभ मिळेल का? पालक, काही क्षुल्लक चुकांविषयी फाजील प्रतिक्रिया दाखवत असल्यास, तो किंवा ती लीन होण्यास व सर्व गोष्टी यथास्थित करण्यास इच्छुक असतील का? या मार्गांनी नमते घेणारे पालक मुलांना अनावश्‍यक चिडीस आणण्याचे व यहोवापासून दूर घालवण्याचे टाळतात.—इफिसकर ६:४.

८. मंडळीतील वडील, क्षेत्रातील गरजांशी जुळवून घेण्यासाठी पुढाकार कसा घेऊ शकतात?

८ वडिलांना देखील नवीन परिस्थिती उद्‌भवते तेव्हा, देवाच्या विशिष्ट नियमांची कधीही हातमिळवणी न करता जुळवून घेण्याची गरज आहे. प्रचारकार्यावर देखरेख करताना, क्षेत्रातील बदलाविषयी तुम्ही दक्ष आहात का? शेजारील लोकांचे जीवनमान बदलते तेव्हा, कदाचित सायंकाळचे साक्षकार्य, मार्ग साक्षकार्य, किंवा दूरध्वनीवरील साक्षकार्य करण्यासाठी तत्पर असले पाहिजे. अशा मार्गांना जुळवून घेतल्याने आमच्या प्रचारकार्याच्या आज्ञेला अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होते. (मत्तय २८:१९, २०; १ करिंथकर ९:२६) पौलाने त्याच्या सेवेत सर्व प्रकारच्या लोकांबरोबर जुळवून घेण्याच्या महत्त्वाकडे विशेष लक्ष दिले. उदाहरणार्थ, लोकांना मदत करण्यासाठी, आम्ही देखील स्थानिक धर्मांविषयी व संस्कृतीविषयी शिकून असेच करतो का?—१ करिंथकर ९:१९-२३.

९. वडिलाने गत काळात ज्याप्रकारे समस्या हाताळल्या त्याच रीतीने नेहमी हाताळल्या जाव्यात असा आग्रह का धरु नये?

९ हे शेवटले दिवस अधिक कठीण होत असताना, मेंढपाळांना, त्यांचा कळप आता सामना करीत असलेल्या गोंधळात पाडणाऱ्‍या किचकट व अप्रिय समस्यांसोबत जुळवून घेण्याची गरज आहे. (२ तीमथ्य ३:१) वडिलांनो ही वेळ कडकपणाची नव्हे! एखाद्या वडिलाची समस्या हाताळण्याची पद्धत गतकाळी कार्यक्षम ठरली नसल्यास किंवा त्या विषयाबद्दल “विश्‍वासू बुद्धिमान दास” याला नवे साहित्य प्रकाशित करण्याचे योग्य वाटले असल्यास, ते पूर्वीच्याच पद्धतीने हाताळणी करण्याचा आग्रह धरणार नाही. (मत्तय २४:४५; पडताळा उपदेशक ७:१०; १ करिंथकर ७:३१.) एका विश्‍वासू वडिलाने उत्तम प्रकारे ऐकणाऱ्‍या व्यक्‍तीची अतिशय गरज असणाऱ्‍या खिन्‍न बहिणीला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, तिच्या खिन्‍नतेला त्यांनी अधिक गंभीर समजले नाही, त्यांनी तिच्यापुढे अगदी साधे उपाय मांडले. त्यानंतर, वॉचटावर सोसायटीने पवित्र शास्त्रावर आधारित माहिती, तिच्याच समस्यांना अनुलक्षून प्रकाशित केली. वडिलाने पुन्हा तिच्याशी बोलण्याचे ठरवले पण आता नवीन साहित्याला लागू करुन व तिच्या स्थितीबद्दल सहानुभूती दाखवली. (पडताळा १ थेस्सलनीकाकर ५:१४, १५.) समंजसपणाचे किती उत्तम उदाहरण!

१०. (अ) वडिलांनी एकमेकांना तसेच सर्व वडिलांच्या वर्गाला नमते घेण्याची मनोवृत्ती कशी दाखवली पाहिजे? (ब) वडील वर्गाने असमंजसपणा दाखविणाऱ्‍यांकडे कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?

१० वडिलांनी एकमेकांसाठी नमते घेण्याची मनोवृत्ती दाखवण्याची देखील गरज आहे. वडील वर्ग एकत्र येतो तेव्हा, कामकाजावर एकच वडील प्रभुत्व करीत नाहीत हे किती महत्त्वाचे आहे! (लूक ९:४८) याबाबतीत संचालकाने स्वतःला ताब्यात ठेवण्याची विशेषपणे गरज आहे. वडील वर्गाने घेतलेल्या निर्णयाला एक किंवा दोन वडील असहमती दाखवतात तेव्हा, आपल्याच मताप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत असा आग्रह ते धरणार नाहीत. उलटपक्षी, शास्त्रवचनातील तत्त्वाचे जोवर उल्लंघन होत नाही, तोवर नमते घेतील. तसेच वडिलांना समंजसपणाची आवश्‍यकता असल्याचे ते ओळखतील. (१ तीमथ्य ३:२, ३) दुसऱ्‍या बाजूला पाहता, वडिलांच्या वर्गाने हे ध्यानात ठेवावे की, पौलाने करिंथमधील मंडळीत स्वतःला ‘अतिश्रेष्ठ प्रेषिताप्रमाणे’ समजणाऱ्‍या ‘असमंजस लोकांचे सहन’ केल्यामुळे मंडळीला दटावणी दिली. (२ करिंथकर ११:५, १९, २०) यास्तव, त्यांनी हट्टी, असमंजस प्रकारे वागणाऱ्‍या सहवडिलाला सल्ला देण्यात इच्छुक असावे. परंतु, असे करण्यात त्यांनी स्वतः सौम्य व दयाळू असले पाहिजे.—गलतीकर ६:१.

अधिकाराच्या वापरात समंजसपणा

११. येशूच्या दिवसातील यहुदी धार्मिक नेत्यांनी ज्याप्रकारे अधिकार चालविला होता त्यामध्ये व येशूने केलेला अधिकाराचा वापर यामध्ये कोणता फरक होता?

११ येशू पृथ्वीवर असताना, देवाने दिलेल्या अधिकाराचा वापर व्यवस्थित रितीने करण्याद्वारे त्याने समंजसपणा खरेपणाने दाखवला. त्याच्या दिवसातील धार्मिक पुढाऱ्‍यांपासून तो किती वेगळा होता! एका उदाहरणाचा विचार करा. देवाचा नियम होता की, शब्बाथ दिवशी कोणतेही कामकाज तसेच लाकडे देखील गोळा करावयाची नव्हती. (निर्गम २०:१०; गणना १५:३२-३६) धार्मिक पुढाऱ्‍यांची, लोक त्या नियमाचे कसे पालन करतात यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा होती. यास्तव शब्बाथ दिवशी एखादी व्यक्‍ती काय उचलू शकते हे सांगण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. त्यांनी असा नियम काढला: दोन सुक्या अंजिरापेक्षा काहीही जड असू नये. त्याचप्रमाणे सॅन्डेलच्या तळव्याला खिळे असल्यामुळे त्याचे वाढलेले वजन उचलण्यावर त्यांनी मनाई केली! असे म्हटले जाते की, सर्व जमेस धरले म्हणजे, शब्बाथाविषयी देवाच्या नियमात रब्बींनी ३९ नियमांची भर घातली, त्यानंतर त्या नियमात अगणित नियमांची भर टाकली. दुसऱ्‍या बाजुला पाहता, येशूने लोकांवर नियंत्रण राखण्यासाठी, अनंत निर्बंधकारक नियमांना लादण्याद्वारे किंवा कडक, आवाक्याबाहेरच्या दर्जांद्वारे लज्जित केले नाही.—मत्तय २३:२-४; योहान ७:४७-४९.

१२. येशूने, यहोवाच्या धार्मिक दर्जांच्या बाबतीत मागेपुढे पाहिले नाही, हे आम्ही का म्हणू शकतो?

१२ यास्तव, येशूने देवाच्या धार्मिक दर्जांना उंचावून धरले नाही असे आम्ही गृहीत धरावे का? त्याने निश्‍चितच, देवाच्या दर्जांना उंचावून धरले! त्याला समजले की, मानवांनी त्या नियमांमागील तत्त्व जाणून घेतले तर ते नियम अधिक प्रभावकारी आहेत. परुशी, लोकांवर अगणित नियमांना लादून त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत असताना, येशूने हृदयाप्रत जाण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, त्याला, ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा’ या ईश्‍वरी नियमाविषयी नमते न घेण्याचे माहीत होते. (१ करिंथकर ६:१८) या कारणास्तव, येशूने लोकांना अनैतिकता आचरण्याकडे निरवू शकणाऱ्‍या विचारांविषयी इशारा दिला. (मत्तय ५:२८) अशा शिक्षणाने, कडक व सूत्ररुप नियमांना केवळ ठासून सांगण्यापेक्षा अधिक बुद्धी व समज दिली.

१३. (अ) वडिलांनी ताठर नियमांना व कायद्यांना बनविण्याचे का टाळले पाहिजे? (ब) वैयक्‍तिकाच्या विवेकाचा आदर करणे हे कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे?

१३ आज, जबाबदार बांधवांना त्याप्रमाणेच हृदयाप्रत पोहंचण्याची आवड आहे. यास्तव, ते नियमात स्वच्छंदी, ताठर किंवा त्यांच्या वैयक्‍तिक दृष्टिकोनांना व मतांना लागू करण्याचे टाळतात. (पडताळा दानीएल ६:७-१६.) वेळोवेळी, पेहराव व केशभूषा याविषयी दयाळुपणे आठवण करुन देणे समयोचित आहे. परंतु, एखादा वडील अशा गोष्टींवर बोलत असल्यास किंवा प्रामुख्याने स्वतःची आवड सूचित करणाऱ्‍या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करीत असल्यास, तो समंजस मनुष्य असण्याच्या त्याच्या ख्यातीला धोक्यात घालू शकतो. खरोखर, मंडळीतील सर्वांनी इतरांवर नियंत्रण राखण्याच्या प्रयत्नाला टाळले पाहिजे.—पडताळा २ करिंथकर १:२४; फिलिप्पैकर २:१२.

१४. येशूने इतरांकडून अपेक्षा केलेल्या गोष्टींबद्दल तो समंजस असल्याचे त्याने कसे दाखविले?

१४ वडिलांनी इतर बाबतीत स्वतःचे परीक्षण केले पाहिजे: ‘मी इतरांकडून ज्याची अपेक्षा करतो त्यात समंजस आहे का?’ येशू निश्‍चितच समंजस होता. त्याने त्याच्या अनुयायांना, त्यांच्याकडून पूर्ण जिवाने केलेल्या प्रयत्नांखेरीज अधिक अपेक्षा करीत नसल्याचे व त्याने यांना उच्च समजल्याचे नेहमी दाखविले. त्याने गरीब विधवेने अल्प किंमतीच्या दोन दमड्या टाकल्यावर तिची प्रशंसा केली. (मार्क १२:४२, ४३) मरीयेच्या बहुमोल दानाबद्दल शिष्यांनी तिची टीका केली तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना असे म्हणत दटावले: “हिच्या वाटेस जाऊ नका. . . . हिला जे करता आले ते हिने केले आहे.” (मार्क १४:६, ८) त्याच्या अनुयायांनी त्याच्या अपेक्षांची निराशा केली असली तरी, तो समंजस राहिला. उदाहरणार्थ, त्याला अटक करण्याच्या रात्री त्याच्या घनिष्ठ असणाऱ्‍या तीन प्रेषितांना जागे व सावध राहण्याचे त्याने आर्जवले असताना देखील त्यांनी पुनःपुन्हा झोपी जाण्याद्वारे त्याची निराशा केली. तरीही, त्याने सहानुभूतीपूर्वक असे म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्‍त आहे.”—मार्क १४:३४-३८.

१५, १६. (अ) वडिलांनी कळपावर दबाव न आणण्याचे किंवा सक्‍ती न करण्याची काळजी का घेतली पाहिजे? (ब) एका विश्‍वासू बहिणीने इतरांकडून जी अपेक्षा केली त्यात कशी तडजोड केली?

१५ येशूने त्याच्या अनुयायांना ‘नेटाचा यत्न करण्यासाठी’ उत्तेजन दिले हे खरे आहे. (लूक १३:२४) परंतु, असे करण्यासाठी त्याने कधीही त्यांच्यावर दबाव आणला नाही! त्याने त्यांच्या मनावर बिंबवले, उदाहरण मांडले, पुढाकार घेतला, व त्यांच्या हृदयाप्रत पोहंचण्याचा शोध केला. उर्वरित गोष्टी होऊ देण्यासाठी त्याने यहोवाच्या आत्म्याच्या शक्‍तीवर भरवसा ठेवला. अशाचप्रकारे, वडिलांनी कळपाला आज पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करण्याचे उत्तेजन दिले पाहिजे. परंतु, धाक दाखवून त्यांना घाबरवून दोष देण्याचे किंवा लज्जा आणण्याचे टाळावे. ते यहोवाची सध्या करीत असलेली सेवा, अपुरी किंवा अस्वीकृत असल्याचे सूचित करू नये. “अधिक करा, अधिक करा” असा कडक पण आवेशयुक्‍त पवित्रा, शक्य ते करीत असलेल्यांना नाउमेद करु शकतो! एखाद्या वडिलाने समंजसपणापासून अतिशय वेगळी—“खूष करण्यास कठीण” अशी स्वतःची ख्याती बनवली असल्यास ते किती दुःखद असेल!—१ पेत्र २:१८.

१६ आम्ही सर्वांनीच दुसऱ्‍यांकडून ज्याची अपेक्षा करतो त्यात समंजस असले पाहिजे! आजारी आईची काळजी घेण्यासाठी एका बहिणीने व तिच्या पतीने त्यांची मिशनरी सेवा सोडल्यानंतर, लिहिले: “आम्हा प्रचारकांना येथे मंडळ्यांमध्ये हे काळ खरेच फार कठीण आहेत. विभागिय व प्रांतीय कार्यात असताना, अशा अनेक दबावांपासून सुरक्षितता मिळाली, पण आता, आम्हाला अचानकपणे व दुःखदायकपणे त्यांची जाणीव घडवण्यात आली. उदाहरणार्थ, मी स्वतःला म्हणत असे, ‘त्या बहिणीने या महिन्याच्या योग्य साहित्याला प्रस्तुत का केले नाही? तिने राज्य सेवा वाचली नाही का?’ आता मला याचे कारण माहीत आहे. काहीजण केवळ [सेवेत] जाण्याइतके सर्व काही करु शकतात.” आमचे बांधव जे करीत नाहीत त्याबद्दल त्यांचा न्याय करण्याऐवजी ते करीत असलेल्या गोष्टींबद्दल त्यांची प्रशंसा करणे किती उत्तम आहे!

१७. येशूने समंजसपणाच्या बाबतीत आमच्यासाठी कशाप्रकारे उदाहरण मांडले?

१७ येशूने त्याच्या अधिकाराचा वापर समंजस मार्गाने कसा केला या शेवटच्या उदाहरणाचा विचार करा. येशू त्याच्या पित्याप्रमाणे, अधिकाराचे मत्सराने रक्षण करत नाही. तो देखील अधिकार सुपूर्त करण्यात प्रमुख आहे. त्याने पृथ्वीवरील ‘त्याच्या परिवाराची’ काळजी घेण्यासाठी विश्‍वासू दासाची नियुक्‍ती केली आहे. (मत्तय २४:४५-४७) तसेच, इतरांच्या कल्पना ऐकण्यासाठी त्याला भय वाटत नाही. त्याने अनेकदा त्याच्या श्रोत्यांना विचारले: “तुम्हाला काय वाटते?” (मत्तय १७:२५; १८:१२; २१:२८; २२:४२) हेच आज ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांमध्ये असले पाहिजे. कोणताही अधिकार असला तरी ऐकण्याची अनिच्छा ते दाखवू शकत नाहीत. पालकांनो, ऐका! पतींनो, ऐका! वडिलांनो, ऐका!

१८. (अ) आमची समंजसपणाची ख्याती असल्यास ती आम्ही कशाप्रकारे शोधून काढू शकतो? (ब) आम्ही सर्व जण कशाप्रकारे निश्‍चय करु शकतो?

१८ निःसंशये, आम्हा प्रत्येकाची “समंजस असण्याची ख्याती” असली पाहिजे. (फिलिप्पैकर ४:५, फिलिप्स्‌) पण आमची तशी ख्याती आहे हे आम्हाला कसे समजेल? येशूला लोक त्याच्याविषयी काय म्हणतात, याविषयी कुतूहल वाटले तेव्हा, त्याने त्याच्या भरवसादायक सोबत्यांना विचारले. (मत्तय १६:१३) त्याच्या उदाहरणाचे अनुकरण का करु नये? तुमची ख्याती समंजस आणि नमते घेणारी आहे का याविषयी मनमोकळेपणाने ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता त्याला विचारु शकता. समंजसपणाच्या बाबतीत येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे अधिक जवळून अनुकरण करण्यासाठी, आम्ही सर्वं जण नक्कीच अधिक काही करु शकतो! विशेषपणे आम्ही इतरांवर काही प्रमाणात अधिकार चालवत असल्यास, यहोवा व येशूच्या उदाहरणाचा नेहमी अवलंब करू या. समंजस मार्गाने त्याचा नेहमी वापर करु या. उचित असेल तेथे क्षमा करण्यास, लवचीक असण्यास, किंवा नमते घेण्यास तत्पर असा. खरोखर, आम्हातील प्रत्येक जण “समंजस असण्याचा” प्रयत्न करो!—तीतास ३:२.

[तळटीपा]

a नवीन कराराची वचने (इंग्रजी) हे पुस्तक सांगते: “एपीईकेस [समंजस] असलेल्या व्यक्‍तीला हे माहीत असते की, अशा काही प्रसंगाच्या वेळी एखादी गोष्ट कायदेशीररित्या पूर्णपणे योग्य असली तरी, नैतिकरित्या ती पूर्णपणे चुकीची असते. एपीईकेस मनुष्याला, नियमापेक्षा मोठ्या व उच्च दाबाच्या सक्‍तीखाली असताना नियमाला कधी शिथिल ठेवावे हे माहीत असते.”

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ ख्रिश्‍चनांनी समंजस असण्याची इच्छा का बाळगली पाहिजे?

▫ वडील क्षमा करण्यास तत्पर असण्यासाठी येशूचे अनुकरण कसे करु शकतात?

▫ येशूप्रमाणे आम्ही लवचीक असण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

▫ आम्ही ज्याप्रकारे अधिकाराचा वापर करतो, त्यात समंजसपणा कसा दाखवू शकतो?

▫ आम्ही खरोखर समंजस आहोत का याविषयी स्वतःचे परीक्षण कसे करु शकतो?

[१५ पानांवरील चित्रं]

येशूने पश्‍चात्तापी पेत्राला तत्पर क्षमा केली

[१६ पानांवरील चित्रं]

त्या स्त्रीने असामान्य विश्‍वास दाखविला तेव्हा, येशूला ही वेळ, सामान्य नियम लादण्याची नसल्याचे दिसले

[१८ पानांवरील चित्रं]

पालकांनो ऐका!

[१८ पानांवरील चित्रं]

पतींनो ऐका!

[१८ पानांवरील चित्रं]

वडिलांनो ऐका!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा