वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 ७/१ पृ. १४
  • नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • देव अब्राहामासोबत करार करतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 ७/१ पृ. १४

देवाच्या जवळ या

नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश

उत्पत्ति १८:२२-३२

न्यायप्रियता. रास्तपणा. निःपक्षपातीपणा. या उत्कृष्ट गुणांकडे तुम्ही आकर्षित होत नाही का? आपल्याला न्यायी वागणूक मिळावी असे स्वाभाविकपणे सर्वच मानवांना वाटते. दुःखाची गोष्ट म्हणजे आज न्याय मिळणे एक दुर्मिळ गोष्ट बनली आहे. पण, एक असा न्यायाधीश आहे ज्याच्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तो आहे यहोवा देव. तो नेहमी योग्य तेच करतो. हे उत्पत्ति १८:२२-३२ मध्ये सांगितल्याप्रमाणे, यहोवा व अब्राहाम यांच्यात झालेल्या एका संभाषणावरून स्पष्ट होते.a

यहोवाने सदोम व गमोरा शहरांतील परिस्थितीचा आढावा घेण्याचा आपला निर्णय अब्राहामाला सांगितला. तेव्हा, या शहरांत राहणाऱ्‍या नीतिमान लोकांचे आता काय होणार अशी अब्राहामाला काळजी वाटली. त्याचा पुतण्या लोटही तेथेच राहत होता. म्हणून त्याने यहोवाला अशी विनवणी केली: “तू दुर्जनांबरोबर नीतिमानाचाहि संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्‍नास नीतिमान असतील तर . . . त्याच्यातल्या पन्‍नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?” (२३, २४ वचने) देवाने म्हटले की त्या शहरांत केवळ ५० नीतिमान मनुष्य असले, तरी तो त्या शहरांचा नाश करणार नाही. अब्राहामाने यहोवाला आणखी पाच वेळा विनवले. प्रत्येक वेळी नीतिमानांची संख्या कमी करत-करत तो शेवटी दहा वर आला. आणि प्रत्येक वेळी देवाने त्याला आश्‍वासन दिले की तितके नीतिमान मनुष्य असल्यास तो त्या शहरांचा नाश करणार नाही.

अब्राहाम देवासोबत वाद घालत होता का? मुळीच नाही! हा तर अतिशय उर्मटपणा ठरला असता. उलट, अब्राहामाच्या बोलण्यातून त्याची नम्रता व देवाबद्दल त्याला आदर असल्याचे दिसून येते. त्याने स्वतःला “धूळ व राख” असे म्हटले. (२७, ३०-३२ वचने) शिवाय, यहोवा न्यायी आहे आणि तो कधीही दुष्टांबरोबर नीतिमानांचा नाश करणार नाही याचा अब्राहामाला भरवसा असल्याचेही त्याच्या शब्दांतून दिसून येते. त्याने म्हटले: “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”—२५ वे वचन.

अब्राहाम जे काही बोलला ते योग्य होते का? होते आणि नव्हते देखील. सदोम व गमोरा शहरांमध्ये किमान दहा तरी नीतिमान मनुष्य असतील असा जो त्याने विचार केला तो चुकीचा होता. पण, देव “दुर्जनांबरोबर नीतिमानाचाहि संहार” कधीच करणार नाही असे जे अब्राहामाने म्हटले ते नक्कीच योग्य होते. नंतर जेव्हा देवाने त्या दुष्ट शहरांचा नाश केला, तेव्हा आपल्या दोन मुलींसह नीतिमान लोट देवदूतांच्या मदतीने तेथून सुखरूप बाहेर पडला.—२ पेत्र २:७-९.

या अहवालातून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते? सदोम व गमोरा शहरांची आपण पाहणी करणार असल्याचे अब्राहामाला सांगून, खरेतर यहोवाने त्याला त्याचे विचार व भावना व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन दिले. आणि अब्राहामाने आपली काळजी व्यक्‍त केली, तेव्हा देवाने शांतपणे त्याचे ऐकून घेतले. (यशया ४१:८) यावरून, देव नम्र आहे व तो पृथ्वीवरील आपल्या सेवकांना तुच्छ न लेखता त्यांना मान देतो हे किती चांगल्या प्रकारे आपल्या शिकायला मिळते! तर मग, नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश यहोवा देव याच्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू नये का? (w०९ १/१)

[तळटीप]

a त्या प्रसंगी, एक देवदूत यहोवाचा प्रतिनिधी या नात्याने त्याच्या वतीने बोलला. अशाच प्रकारचे दुसरे एक उदाहरण, उत्पत्ति १६:७-११, १३ मध्ये आढळते.

[१४ पानांवरील चित्र]

सदोम व गमोराविषयी अब्राहामाने यहोवाला विनवणी केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा