वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९० पृ. ८
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्याने वर्गणी सादर करून
  • तुम्ही तुमच्या दृष्टीकोणात विधायकता ठेवा
  • धैर्याने सतत कार्य करीत राहा
  • अधिक काळजी—अधिक उत्तम सेवा
    आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९०
km ५/९० पृ. ८

सुवार्ता सादरता

धैर्याने वर्गणी सादर करून

१ द वॉचटावर मासिक हे भूतलावरील सर्वोत्तम पवित्र शास्त्र अभ्यास पाक्षिक आहे यात कोणताही प्रश्‍न नाही! हे खरे आहे अशी तुमची खात्री आहे का? जर होय, तर त्याचे वर्गणीदार बनण्याची संधि सर्वांना मिळू नये का?

२ टेहळणी बुरुज वाचनाने स्वतः तुमचा केवढा फायदा झाला आहे? कदाचित, आम्हातील प्रत्येकजन या मासिकाने केलेल्या विविध मार्गीय मदतीबद्दल सांगू शकेल. काही म्हणतील आम्ही जगत असलेल्या काळाबद्दलची वैशिष्ठे जाणून घेण्यात व दक्ष राहण्यास सावध करणारे ते प्रमुख साधन आहे. किंवा ते आमची “काळाची लक्षणे,” ज्यामुळे मानवजात आज एवढ्या गोंधळात पडलेली आहे, ती ओळखण्यात व खरा अर्थ समजावून घेण्यात मदत करीत आहे. (मत्तय १६:३) इतर म्हणू शकतील की, देवाचे राज्य लवकरच त्यांची पिळवणूक करणाऱ्‍यांचा नायनाट करील या त्यातील सुवार्तेनेच आम्ही केवढे सुखावलो आहोत. द वॉचटावर या मासिकाने ११० वर्षे आधीच्या सुरवातीपासून ह्‍या विचारांचा कैवार घेतला आहे. याच उल्लेखनीय मासिकाने आम्हा सर्वांचे खंडणीच्या अतुल्य तरतुदीवर विश्‍वास उभारण्यात बहुमोल साहाय्य केले की, ज्यायोगे अपूर्णावस्थेतील मानवास सार्वकालिक जीवन मिळविण्याची संधि उपलब्ध झालेली आहे. इतरांनीही ही सत्ये संपादित करण्याची आवश्‍यकता आहे.

तुम्ही तुमच्या दृष्टीकोणात विधायकता ठेवा

३ टेहळणी बुरुज मासिकात मानवी समर्थन नव्हे तर देवाच्या सूज्ञानावर जोर दिलेला असतो. (यशया ५५:८, ९) हे ज्ञान आज सर्वांसाठी निकडीचे बनले आहे. ते जीवनात सुधार करू शकते आणि योग्य उद्देशांना रुजविण्यात मदत करते. हे “वाचवून ठेविण्यात” जरुरीचे आहे. (नीती ९:१-६) असे हे पटले तर, हे ओळखून की इतरांना ज्याची गरज आहे ते आम्हापाशी आहे, आम्ही प्रत्येक लेख लक्षपूर्वक वाचावा, याकरिता की, त्यातून अशी विधाने निवडू शकू जी घरमालकांना ऐकावीशी वाटतील. याप्रकारची पूर्वतयारी तुम्हाठायी विधायक आत्मा वास करीत असल्याची ग्वाही क्षेत्रकार्यात मासिके सादर करण्याद्वारा देईल.

४ काही जन वर्गणीची सादरता करण्यात कचरतील. ते कदाचित घरमालकासोबत चांगली चर्चा करतील, एवढेच काय पण संभाषणासाठी विषयही चर्चेस घेतील पण शेवटी दोन मासिके आणि एक माहितीपत्रक ७ रुपयांना दाखवून वर्गणी सादर करणे तसेच राहते. का बरे? किंमत? तसे जर वाटते तर हे काही उचित समर्थन नाही. जगीक प्रकाशनांच्या तुलनेत वर्गणीची किंमत अगदीच कमी आहे. आणि वाचकांच्या मूल्यपनावर पाहिल्यास ही किंमत काहीच नाही. यास्तव निर्धार करा व वर्गणीची सादरता करा. द वॉचटावर पाक्षिकाकरता रु. ४० किंवा अवेक! या त्याच्या साथीदार मासिकासह रु. ८०.

५ एका भगिनीने निश्‍चय केला की, वर्गण्या मिळवीन. यास्तव तिने दोन महिन्याच्या कालावधीत ५० वर्गण्या मिळवीन हा चंग बांधला. पहिल्या महिन्यात तिने एकूण ३१ वर्गण्या मिळविल्या व दोन महिन्यात एकंदर ५०ची संख्या पुरी झाली. ती म्हणते, कोणाकडे तेवढी रक्कम नसते पण वर्गणीदार होऊ इच्छितात अशा काही लोकांकडे ती तीन किंवा चार वेळा परतभेटीस गेली व घरमालकास शेवटी वर्गणीदार बनविले. (वा.पु.८९ पान ६०-१; तसेच वा.पु.९० पृष्ठे ४७-९ पहा.) जपानमध्ये जेथे वर्गणीची किंमत रु. २३५ पर्यंत जाते, बंधूंनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ७१,६०० वर्गण्या मिळविल्या; हा ५७ टक्के वाढीचा त्याच वर्षातील एक नवा उच्चांक आहे.

धैर्याने सतत कार्य करीत राहा

६ आमच्या सेवकपणात आम्ही निर्भिड असण्याचे पुरेसे कारण आम्हापाशी आहे—कारण यहोवा आमचा पाठीराखा आहे. (प्रे. कृत्ये १४:३) आज सुवार्ता प्रचार होण्यात यहोवा ज्या प्रमुख माध्यमांचा उपयोग करुन घेत आहे त्यापैकी एक टेहळणी बुरुज आहे. जर आम्ही वर्गणी मिळविली व नंतर मासिकांचे वाचन करावे अशा उत्तेजक वाच्यतेसह परत भेटी घेतल्या तर आमच्या या परिश्रमपूर्वक प्रयत्नांनी कदाचित एखाद्याचे जीवन वाचेल. यास्तव या, आपण मोठ्या उत्साहाने व निर्भिडपणे, ज्या सर्वांचा आम्हास परिचय आहे व ज्या सर्वांना आम्ही क्षेत्रकार्यात भेटू, वर्गणी सादर करु.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा