माणसाचे नव्हे—देवाचे वचन
“ह्या कारणांमुळे, आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुति ह्यामुळे करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले; आणि वास्तविक ते तसेच आहे.” (१ थेस्स. २:१३) प्रेषित पौलाच्या आवेशयुक्त प्रचारास हा केवढा फलदायी प्रतिसाद मिळाला!
२ निश्चये, पौल देवाच्या वचनाशी चांगला परिचित होता यात कोणताही प्रश्न नाही. द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? हे नवे प्रकाशन, पवित्र शास्त्र हे यहोवाचेच वचन आहे असा विश्वास प्रस्थापित करण्यात व तो वाढविण्यात एक साजेसे उपकरण आहे. आम्ही पौलासारखा आवेश राखला तर शोधक वृत्तीच्या लोकांना ते वचन त्यांच्याठायीही कसे कार्य करु शकते ते दाखविण्याची मदत देऊ शकू.
३ आमच्या सादरतेत पुढील काही मुद्यांचा आम्हाला समावेश करता येईलः “सर्वात अधिक खप असणारे,” पृष्ठ ७; “पवित्र शास्त्र—सिद्ध झालेले वचन,” पृष्ठ १९; “भूगर्भसंशोधकांना काय करता येते व काय करता येत नाही,” पृष्ठ ५०; “आधुनिक टीकेला सबळ आधार राहिलेला नाही,” पृष्ठ ५६; “आज चमत्कार का होत नाहीत?” पृष्ठ ८५. सर्वांचा सारांश सांगण्यासाठी शेवटला अध्याय “पवित्र शास्त्र व तुम्ही” यामध्ये व्यावहारिक अवलंब दाखविण्यात आलेला आहे.
४ संस्थेच्या कित्येक प्रकाशनांद्वारे समयोचित आध्यात्मिक अन्नाचा मुबलक पुरवठा आम्हाला उपलब्ध आहे हे केवढे कृतज्ञतेचे वाटते! यास्तव, जुलै महिन्यात या आध्यात्मिक अलंकाराची सादरता आमच्या क्षेत्रात प्रभावी रितीने करण्याद्वारे त्याविषयीची आपली रसिकता आपण व्यक्त करू या.