पुनर्भेटीत लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाचा उपयोग करणे
१ सत्यामध्ये आस्था दाखविणाऱ्या लोकांची काळजी घेण्यात परिश्रमी असण्याचे महत्त्व प्रेषित पौलाला माहीत होते. त्याने अशांची तुलना कोवळ्या वनस्पतींसोबत केली. अशा वनस्पतीला नियमित रुपाने पाणी व मशागत जरुरीची असते. (१ करिंथ. ३:६-९) याचप्रमाणे आपण पुनर्भेट घेताना आस्थेवाईक लोकांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांची आध्यात्मिक वाढ होऊ शकेल.
२ आम्ही लक्षात ठेवणे चांगले की, ज्यांची आम्ही परतभेट घेतो अशांना मागील भेटीत ज्या मुद्यांची चर्चा आपण केली होती ते आठवून देण्याची गरज असणार. या कारणास्तव, दर पुनर्भेटीत आपण आधीच्या भेटीत जे काही चर्चिले त्याची त्रोटक उजळणी करणे उचित ठरेल, आणि यात घरमालकाला जे मुद्दे अधिक आवडले होते त्यावर अधिक लक्ष केंदित करावे. घरमालकाला चर्चेत समाविष्ट करा आणि त्याची आस्था तसेच गरजा तत्परतेने जाणून घ्या.
३ आधी “लिव्ह फॉरएव्हर” पुस्तक दिलेले असो वा नसो, पुनर्भेट घेताना पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी तुम्ही कदाचित हा थेट पवित्रा वापरु शकालः
▪ “या पुस्तकाद्वारे आम्ही भेटी दिलेल्या पुष्कळ लोकांना आपल्या पवित्र शास्त्रीय प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.” मग, लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील अनुक्रमणिकेच्या तक्त्याकडे वळून तुम्हाला विचारता येईलः “येथे असणाऱ्या कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला अधिक आस्था वाटते?” ते सांगतील तो अध्याय उघडा आणि प्रत्येक पानावर परिच्छेद व प्रश्न यांचे क्रमांक कसे एकाखाली एक देण्यात आलेले आहे ते त्यांना दाखवा. यामुळे प्रत्येक परिच्छेदातून त्यांना अधिक अर्थपूर्ण माहिती मिळू शकते. काही मुद्यांची चर्चा करा व पुढील भेट देण्याची निश्चित योजना आखा.
४ आणखी एक पवित्रा असा असू शकेलः
▪ “मला आपल्यामध्ये मागील आठवडी झालेले संभाषण खरेच आवडले. पुष्कळ लोकांना असे नेहमी वाटते की, आम्ही वेळोवेळी लोकांची भेट का घेतो. मला वाटले की, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील २९ पृष्ठावर हे जे विवेचन दिलेले आहे ते आवडेल. [परिच्छेद ११ वाचा.] आता आपण जे काही वाचले त्या आधाराने पाहू जाता, आमची भक्ति देवाने स्वीकारावयाची आहे तर कशाची जरुरी आहे असे तुम्ही म्हणाल? [प्रतिसादास वाव द्या आणि घरमालकाची प्रशंसा करा.] मागे, येशूच्या काळी आपला धर्म देवास स्वीकृत वाटत आहे असे काहींना वाटत होते. यांच्याबद्दल याच अध्यायात परिच्छेद २ मध्ये काय म्हटले आहे ते बघा.” वाचा व तेथील मजकूराबद्दल विवेचन करा.
५ पूर्वी जेथे “लिव्ह फॉरएव्हर” पुस्तक दिले होते अशांना दिलेल्या भेटीचा मागोवा घेताना तुम्ही असे म्हणू शकालः
▪ “मागच्या वेळी मी भेटलो तेव्हा आपण जागतिक परिस्थितीत बदल होण्याविषयी बोललो होतो. मग, देवाने दुष्टतेला वाव का दिला याचे आपणाला कधी नवल वाटले होते का?” प्रतिसादास वाव देऊन पृष्ठ ९९ वरील २ऱ्या परिच्छेदाकडे वळा आणि प्रश्न लक्षात घ्या. हा परिच्छेद वाचा, त्याची चर्चा करा आणि शास्त्रवचने काढून बघा. पुस्तकातील काही निवडक चित्रे, उदाहरणार्थ, पृष्ठ ७८, ८४-५, ११९, १४७, १४९-५३ आणि १५६-८ यावरील निवडक चित्रे काढून तुमच्या चर्चेत अधिक भर घालू शकता.
६ जेथे हस्तपत्रिका सोडली असेलः कधी कधी आरंभाच्या भेटीत हस्तपत्रिका सोडली जाते. मग, पुनर्भेटीत त्यातील एक किंवा दोन परिच्छेदांची चर्चा वाचन तसेच शास्त्रवचने बघून करू शकता. मग, यापैकीच्या एखाद्या शास्त्रवचनाची लिव्ह फॉरएव्हर पुस्तकात कशी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे ते दाखवा. घरमालकाने आस्था दाखवल्यास तुम्हाला लिव्ह फॉरएव्हर पुस्तक सादर करता येईल आणि पुढील भेटीत पुढील चर्चा करण्याचे आयोजित करू शकता.
७ आम्हास काळजी वाहण्यासाठी सोपून दिलेल्या ख्रिस्ती विश्वासाच्या कोवळ्या वनस्पतींना पाणी देण्याची विश्वासूपणे काळजी घेतल्यास देव आपल्या गौरव व स्तुतीसाठी त्याची वाढ करील.—१ करिंथ. ३:७.