आमच्या सेवेत निःपक्षपातीपणा प्रदर्शित करणे
१ “देव पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे,” असे पेत्राने म्हटले. (प्रे. कृत्ये. १०:३४, ३५) त्या स्पष्ट विदित केलेल्या सत्याच्या पूर्ण परिचयाच्या आधारावर आमची आजची सेवा चालू आहे. यास्तव, सुवार्ता सर्वांपर्यंत पोहचण्यास अटकाव करणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचे सर्व प्रयत्न आम्ही करणे आवश्यक आहे.
२ आम्ही काही भागात जेव्हा घरोघरचे कार्य करतो तेव्हा, आमच्या मंडळीमध्ये वापरली जाणारी भाषा न बोलणारे अथवा न समजणारे लोक भेटणे हे काही असामान्य नाही. भाषेचा अडथळा काही लोकांना आम्ही प्रचार करत असलेल्या राज्याच्या संदेशाचा पूर्ण लाभ घेण्यापासून अटकाव करतो. यापैकी बहिरे, सांकेतिक भाषेद्वारे दळणवळण राखणारे असे लोक असू शकतात. तर मग, सुवार्ता अशा लोकांपर्यंत प्रभावकारकतेने पोहचवण्यास अटकाव करणाऱ्या भाषेच्या अडथळ्यावर मात करण्यास काय साहाय्यक ठरू शकेल?
३ अमेरिकेतील सर्व मंडळ्यांना १९९१ मध्ये संस्थेने S-70a फॉर्म, फॉरेन लँग्वेज फॉलो-अप स्लीपचा साठा पाठवला. ते राहात असलेल्या भागातील मंडळीमध्ये जी भाषा बोलली जाते ती त्यांना बोलता येत नसेल, ज्यामध्ये सांकेतिक भाषेचा वापर करणाऱ्यांचाही समावेश आहे अशांना साहाय्य मिळण्याची खात्री करणे व त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत राज्याचा संदेश मिळण्यासाठी संधी देणे हा ह्या स्लीपचा उद्देश होता.
४ जेव्हा तुम्हाला क्षेत्रामध्ये कोणी बहिरे अथवा मंडळीमध्ये वापरली जाणारी भाषा न जाणणारे असे कोणी भेटतील तेव्हा या स्लीपपैकी एकावर सुवाच्य अक्षराने लिहा. जरी त्या व्यक्तीने सत्याबद्दल आस्था व्यक्त केली नाही तरी ही स्लीप भरावी. तुम्हाला प्रत्येक वेळेस लोकांचे नाव माहीत होणार नाही, पण तुम्ही त्यांचा पत्ता व ते कोणती भाषा बोलतात त्याची यादी करू शकता. ही स्लीप राज्यसभागृहातील क्षेत्र सेवेच्या अहवालाच्या पेटीमध्ये ठेवावी. सचीव त्या स्लीपस् गोळा करतील, अचूकता व सुवाच्यता यासाठी त्याची तपासणी करतील, व यादी केलेली भाषा बोलणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी जवळच्या मंडळीकडे अथवा गटाकडे ते पाठवतील.
५ काही घटनांच्या बाबतीत हे जरूरीचे नसेल. उदाहरणार्थ, अमेरिकेतील स्पॅनीश-भाषिय मंडळींना माहीत आहे की स्पॅनीश बोलणारे लोक कोणत्या क्षेत्रात राहतात. दुसऱ्या बाजूस पाहता, विशिष्ट भाषा बोलणारे लोक हे इतरत्र विखुरलेले असतील. त्यामुळे अशी भाषा जाणणाऱ्या मंडळीला अथवा गटाला विस्तीर्ण क्षेत्र पूर्ण करावे लागेल, व अशा लोकांना साहाय्य करण्यास शोधण्यासाठी मदत मिळाली तर त्याची ते गुणग्राहकता बाळगतील.
६ सर्वसाधारण परिसरात जर आवश्यक भाषेत साक्ष देण्यासाठी कोणतीही मंडळी अथवा गट नसेल पण ती भाषा जाणत असणारा तेथील स्थानिक मंडळीमध्ये कोणी एक प्रचारक असू शकेल व तो भेटीला सांभाळू शकेल. शहर पर्यवेक्षकासोबत सल्ला घेऊन देखील, कोणी ती भाषा जाणणारे आढळले नाही तर, स्थानिक बांधवांनी साक्ष देण्यास त्यांच्या परिने होता होईल तेवढे प्रयत्न करावे. अशा परिस्थितींमध्ये भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! हे माहितीपत्रक खूप फायदेकारक शाबीत झाले आहे.
७ प्रत्येक प्रचारकाने गरज असेल तर फॉलो-अप स्लीपचा वापर करण्यास सतर्क असावे. मंडळीकडे S-70a फॉर्मचा साठा नसल्यास आवश्यक माहिती छोट्याशा कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून वर सांगितल्याप्रमाणे करावे. सर्व लोकांपर्यंत, सुवार्ता पोहचण्यासाठी मग त्यांची भाषा कोणतीही असो, आम्ही कठीण परिश्रम करतो तेव्हा, आम्ही आमचा देव यहोवा याच्यावरील आमची प्रीती प्रदर्शित करत असतो, “ज्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.”—१ तीम. २:४.