मिळालेल्या आस्थेकडे लक्ष द्या
१ जेव्हा आम्ही आपली मासिके तसेच इतर ईश्वरशासित प्रकाशनांना सादर करतो, तेव्हा येशूने जाहीर केलेला संदेश आपण विस्तारितपणे प्रसारित करत असतो. यास्तव जे कोणी आस्था दाखवतील त्या प्रत्येकाची परत भेट घेण्यास आम्ही खास परिश्रम केले पाहिजेत.
२ घरमालक आस्था राखून असलेल्या अवेक! मधील खास लेखावर जेव्हा तुम्ही प्रकाशझोत टाकलेला असतो, तेव्हा तुम्ही परत जाता त्यावेळी त्या लेखातील अधिक मुद्यांची तयारी करा, एका मुख्य वचनाभोवती अथवा एक किंवा दोन परिच्छेदांवर तुमचे संभाषण केंद्रित करा. जर आस्था वाढती असली तर, अवेक! हे संपूर्ण कुटुंबासाठी फायदेकारक आहे हे दाखवून द्या. प्रत्येक अंकामध्ये, वातावरण (पर्यावरण), स्व-सुधारणा, सध्याच्या समस्यांशी सामना करणे, व तरुण लोकांच्या विचाराधीन असणारे प्रश्न अशा निरनिराळ्या विषयांचा समावेश असतो. प्रामाणिक आस्था प्रदर्शित केली जाते, तेव्हा अवेक! हे मासिक वर्गणीद्वारे प्राप्त होऊ शकते व त्यांना सहा महिन्यास १२ अंक मिळू शकतात हे घरमालकाच्या निदर्शनास आणून द्या.
३ चालू अवेक!च्या अंकातील कोणत्याही लेखाबाबतीत घरमालक जर आस्था राखून नसेल तर काय? संभाषणाला समाप्त करण्याऐवजी, रिझनिंग पुस्तकातील पान २०६ वरील माहितीचा वापर करून यहोवाच्या साक्षीदारांच्या कामासंबंधी घरमालकास अधिक शिकवण्यास या संधीचा उपयोग करु शकता.
४ तुम्ही अगोदर २ तीमथ्य ३:१-५ याचा वापर करून “द वॉचटावर”चा अंक सादर केला असेल, व मासिकाच्या पान २ वरील माहितीचे स्पष्टीकरण केले असल्यास, तुम्ही परत जाल तेव्हा असे म्हणू शकता:
▪“आपल्या मागील संभाषणात, आजच्या जगात आमच्या भोवताली जे घडते त्याचा अर्थ काय आहे याबद्दल आपण चर्चा केली होती. पुष्कळ लोकांनी देव व त्याच्या पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या जीवनाचे दर्जे याबाबतची आस्था गमावलेली आहे असे दिसते. २ तीमथ्य ३:१-५ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, याचा लोकांच्या एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर खूप प्रभाव झालेला आहे. मग भवितव्यात उत्तम परिस्थिती येण्याची अपेक्षा बाळगण्यास एखादे चांगले कारण आहे असे तुम्हाला वाटते का?” अभिप्रायास अनुमती दिल्यानंतर, २ पेत्र ३:१३ कडे तुम्ही थेट लक्ष वेधवू शकता. रिझनिंग पुस्तकातील पान २२७-३३ कडे वळा, व देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करील याची स्पष्टता द्या.
५ परत भेटीदरम्यान तुम्हाला कळेल की घरमालक त्याच्या धर्माबद्दल बोलण्यास नाखूष आहे, त्याला वाटते की ही वैयक्तिक बाब आहे. तर तुम्ही अशाप्रकारे म्हणू शकता:
▪“जगातील अनेक धर्म वेगवान प्रवास व दळणवळण याच्या साधनामुळे अल्प बनत आहे, मग ते आम्हाला आवडो की न आवडो निरनिराळ्या विश्वासाच्या एकत्र पक्कडीची जागतिकरीत्या उणीव भासत आहे. यास्तव, एकमेकांच्या दृष्टिकोनाची समज राखल्याने वेगवेगळ्या विश्वासाच्या लोकांमधील दळणवळण अर्थपूर्ण होण्याकडे निरवते. असे केल्याने धार्मिक विश्वासावर आधारित असलेला तिरस्कार घालवून दिला जातो. तुम्हाला काय वाटते?” अभिप्रायास वाव दिल्यानंतर, मॅनकाइन्डस् सर्च फॉर गॉड या पुस्तकातील अनुक्रमणिकेच्या तक्त्याकडे घरमालकाचे लक्ष वेधवा.
६ सत्यामध्ये आस्था राखून असणाऱ्या प्रत्येकांकडे परत भेट घ्यावयास व सार्वकालिक जीवनाकडे निरवणाऱ्या मार्गावर येण्यास त्यांना साहाय्य करावयास आपण होता होईल तितका प्रयत्न करु या.—योहान ४:२३, २४.