स्मारकविधीच्या स्मरणिका
स्मारकविधीची तारीख रविवारी, मार्च २३ रोजी येते. वडिलांनी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे:
▪ या सभेची वेळ निश्चित करताना, सूर्यास्तापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करा.
▪ वक्त्याला तसेच सर्वांनाच ह्या समारंभाची निश्चित वेळ व स्थान याबद्दल माहिती दिली जावी.
▪ उचित प्रकारची भाकर आणि द्राक्षारस तयार ठेवावा.—फेब्रुवारी १५, १९८५ चे टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठ १९ पाहा.
▪ प्याले, ताटे, साजेसा मेज आणि त्यावरील आच्छादन सभागृहात आणले जावेत व योग्य ठिकाणी ठेवण्यात यावेत.
▪ राज्य सभागृह किंवा सभेचे इतर ठिकाण वेळेआधी चांगले स्वच्छ करावे.
▪ परिचर तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्यांची आगाऊ निवड करून योग्य कार्यपद्धतीबद्दल व त्यांच्या कर्तव्यांबद्दल त्यांना सूचना दिल्या जाव्यात.
▪ उपस्थित न राहू शकणाऱ्या कोणत्याही दुर्बल अभिषिक्तांस बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.
▪ एकापेक्षा अधिक स्मारकविधींसाठी एकच सभागृह वापरण्याची योजना आखली असल्यास मंडळ्यांमध्ये उत्तम सहकार्य असावे जेणेकरून प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग व वाहनतळे यांठिकाणी अनावश्यक गर्दी होणार नाही.