वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०१ पृ. १
  • ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’
    आमची राज्य सेवा—२०११
  • यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • देवाचा प्रकाश अंधकार दूर करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • जगाच्या प्रकाशाला अनुसरा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km १/०१ पृ. १

‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’

१ नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या सबंध जग आज अंधकारात आहे. पण सत्याचा प्रकाश अंधकारातील ‘निष्फळ कर्मे’ उघड करतो म्हणजे या धोकेदायक अडथळ्यांवर आपण अडखळून पडणार नाही. म्हणूनच प्रेषित पौलाने ख्रिस्ती लोकांना सांगितले: “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला.”—इफिस. ५:८, ११.

२ “प्रकाशाचे फळ” या जगाच्या अंधकारात अगदी ठळक दिसून येते. (इफिस. ५:९) हे फळ उत्पन्‍न करण्यासाठी ख्रिस्ती गुणांचे तेज आपल्या आदर्श व्यक्‍तिमत्त्वात दिसून आले पाहिजे; येशू आपल्यावर संतुष्ट होईल अशाप्रकारची व्यक्‍ती बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसेच, मनःपूर्वक सेवा करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सत्याबद्दल उत्साही मनोवृत्ती दाखवण्याचा आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व गुण आपण आपल्या दररोजच्या जीवनात आणि यहोवाची सेवा करत असताना प्रदर्शित केले पाहिजेत.

३ प्रकाश पडू देण्याकरता प्रत्येक संधीचा उपयोग करा: येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “तुमचा प्रकाश लोकांसमोर . . . पडू द्या.” (मत्त. ५:१६) येशूप्रमाणे आपण देवाच्या राज्याविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी प्रचार करून यहोवाचा प्रकाश लोकांसमोर पाडतो. आपण लोकांच्या घरी, कामाच्या ठिकाणी, शाळेत, शेजाऱ्‍यांना किंवा जेथे संधी मिळेल तेथे लोकांना सत्याची साक्ष देतो तेव्हा ज्योतीसारखे जगात चमकत असतो.—फिलिप्पै. २:१५.

४ येशूने म्हटले होते की, काहींना प्रकाश मुळीच आवडणार नाही. (योहा. ३:२०) ‘ख्रिस्ताच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश’ त्यांच्यावर प्रकाशू नये म्हणून बहुतांश लोक सुवार्तेला नाकारतात तेव्हा आपण खचून जात नाही. (२ करिंथ. ४:४) यहोवा लोकांची अंतःकरणे पाहतो. आणि अधर्माने चालणाऱ्‍या कोणाचाही तो स्वीकार करत नाही.

५ आपण यहोवाच्या मार्गांवर चालतो आणि आध्यात्मिक प्रकाशाचा आनंद लुटतो तेव्हा तो प्रकाश आपण इतरांवर चमकवू शकतो. आपल्या वर्तनावरून आपल्याजवळ “जीवनाचा प्रकाश” आहे असे त्यांनी ओळखले तर ज्योती वाहकांसाठी आवश्‍यक असलेले बदल करण्यास ते देखील प्रेरित होतील.—योहा. ८:१२.

६ आपला प्रकाश लोकांसमोर पाडून आपण निर्माणकर्त्याचे गौरव करतो आणि प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना त्याला जाणण्यास व सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त करण्यास मदत करतो. (१ पेत्र २:१२) आपल्याजवळ ही ज्योती असल्यामुळे इतरांना आध्यात्मिक अंधकारातून मार्ग दाखवून त्यांना प्रकाशाची कर्मे करण्यास आपण तिचा उपयोग करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा