सेवा वाढवण्याची आत्तापासूनच योजना करा
१. दरवर्षी येणाऱ्या स्मारकविधीमुळे आपल्याला कोणत्या संधी मिळतात आणि यामुळे आपण काय दाखवू शकतो?
१ दर वर्षी येणाऱ्या स्मारकविधीमुळे आपल्याला, “परमेश्वराचे पुष्कळ उपकारस्मरण” करण्याच्या नवनवीन संधी मिळतात. (स्तो. १०९:३०) ज्याने खंडणीची तरतूद केली आहे त्याला आपण अनेक मार्गांनी कृतज्ञता दाखवतो. त्यापैकी एक मार्ग म्हणजे, मार्च महिन्यात आपली सेवा वाढवणे. वाढवू शकाल का तुम्ही? यासाठी तुम्हाला आत्तापासूनच योजना कराव्या लागतील.
२. गेल्या एप्रिल महिन्यात फक्त तीस तास भरून साहाय्यक पायनियरींग करता येऊ शकते, हे जेव्हा तुम्हाला व मंडळ्यांतील इतर बंधुभगिनींना समजले तेव्हा तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया काय होती?
२ साहाय्यक पायनियरींग: एप्रिल महिन्यात फक्त तीस तास भरून आपण साहाय्यक पायनियरींग करू शकतो, हे जेव्हा मंडळ्यांतील बंधुभगिनींना समजले तेव्हा अनेकांना खूप आनंद झाला होता. एका तरुण बांधवाने असे लिहिले: “मी अजूनही माध्यमिक शाळेत शिकत असल्यामुळे मला सामान्य पायनियरींग करणे जमत नाही. पण, मी एप्रिल महिन्यात ३० तासांच्या साहाय्यक पायनियरींगचा अर्ज भरून ५० तास भरण्याचा प्रयत्न करणार आहे.” पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्या एका बहिणीने असे लिहिले: “फक्त तीस तास! मी तर ते सहज भरू शकेन.” या तरतूदीची घोषणा करण्यात आली तेव्हा, ऐंशीतील पूर्वी पायनियर असलेल्या एका बहिणीने म्हटले: “मी याच दिवसाची वाट पाहत होते! माझे ते पायनियरींगचे दिवस माझ्या जीवनातले सर्वात उत्तम दिवस होते, हे यहोवाला माहीत आहे.” ज्यांना साहाय्यक पायनियरींग करता आले नाही त्यांनी सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याची ध्येये ठेवली.
३. मार्च, एप्रिल व मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्याकरता कोणकोणती कारणे आहेत?
३ मार्च महिन्यात पुन्हा आपण साहाय्यक पायनियरींग करू शकतो कारण या महिन्यातही आपण, एकतर ३० तास किंवा ५० तास भरू शकतो. शिवाय, शनिवार १७ मार्च पासून आपण ५ एप्रिल रोजी होणाऱ्या स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांच्या खास वाटप मोहिमेत भाग घेणार आहोत. अनेक बंधुभगिनी सेवेमध्ये त्यांनी सहभाग वाढवल्यामुळे इतके आनंदित होतील, की त्यांना एप्रिल व मे महिन्यातही ५० तास भरून साहाय्यक पायनियरींग करावीशी वाटेल.
४. आपण आपली सेवा कशा प्रकारे वाढवू शकतो आणि सेवा वाढवल्यामुळे काय होईल?
४ स्मारकविधीच्या काळादरम्यान कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपली सेवा कशा प्रकारे वाढवू शकतो, याची चर्चा तुम्ही तुमच्या पुढील कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी करू शकता. (नीति. १५:२२) तुमच्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद मागा. (१ योहा. ३:२२) सेवा वाढवल्यामुळे तुम्ही यहोवाची आणखी जास्त प्रमाणात स्तुती करू शकाल आणि तुमच्या आनंदातही आणखी भर पडेल.—२ करिंथ. ९:६.