ख्रिस्ती जीवन
“यहोवासाठी एक भेट”
आज आपण कोणत्या मार्गाने यहोवाला स्वेच्छेने भेट देऊ शकतो? (१इत २९:५, ९, १४) यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक आणि जगभरात चाललेल्या कामाला साहाय्य करण्यासाठी आपण खाली दिलेल्या अनेक मार्गांनी स्वेच्छेने दान देऊ शकतो.
ऑनलाईन किंवा दानपेटीत टाकलेलं दान पुढील गोष्टींसाठी वापरलं जातं:
जगभरात चाललेलं काम
शाखा कार्यालय आणि स्थानिक भाषांतर कार्यालय यांच्या बांधकामाठी आणि ते चालवण्यासाठी
ईश्वरशासित प्रशालांसाठी
खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी
नैसर्गिक विपत्तीदरम्यान होणाऱ्या बचावकार्यासाठी
छपाई, व्हिडिओ निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यांसाठी
स्थानिक मंडळीचा खर्च
मंडळीच्या खर्चासाठी जसं की, लाईट किंवा पाण्याच्या बिलासाठी आणि राज्य सभागृहाच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी
शाखा कार्यालयाला पैसे पाठवण्यासाठी मंडळीत मांडण्यात आलेले ठराव. म्हणजे:
जगभरातल्या राज्य सभागृह आणि संमेलन गृह यांच्या बांधकामासाठी
जागतिक साहाय्य व्यवस्थेसाठी
इतर जागतिक कार्यांसाठी
अधिवेशनं आणि संमेलनं
प्रांतीय अधिवेशनांसाठी दिल्या जाणाऱ्या दानाचा उपयोग जगभरात चाललेल्या कामासाठी केला जातो. मग या दानाचा उपयोग प्रांतीय, खास आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांशी संबंधित असलेला खर्च भागवण्यासाठी केला जातो.
विभागासाठी देण्यात येणारं दान संमेलन हॉलच्या भाड्यासाठी, तिथला खर्च चालवण्यासाठी आणि देखरेखीसाठी वापरण्यात येतं. तसंच विभागाचा इतर खर्चही यातून भागवला जातो. उरलेला पैसा जगभरात चाललेल्या कामासाठी दान म्हणून देण्याचं विभागातले वडील मिळून ठरवू शकतात.