तळटीप
a यहोवावर आपलं खूप प्रेम आहे आणि त्याला खूश करायची आपली मनापासून इच्छा आहे. यहोवा पवित्र आहे आणि त्याची उपासना करणाऱ्यांनीही पवित्र असावं असं त्याला वाटतं. पण आपण तर अपरिपूर्ण मानव आहोत. मग हे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. प्रेषित पेत्रने आपल्या भाऊबहिणींना जो सल्ला दिला आणि यहोवाने प्राचीन इस्राएलला जो सल्ला दिला त्यावरून दिसून येतं, की आपणही आपल्या सर्व वागणुकीत पवित्र होऊ शकतो.