२१-२७ जुलै
नीतिवचनं २३
गीत ९७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. मद्यपानाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्यासाठी सुज्ञ सल्ले
(१० मि.)
तुम्ही मद्य घेणार असाल, तरी जास्त प्रमाणात पिऊ नका (नीत २३:२०, २१; टेहळणी बुरूज०४ १२/१ १९ ¶५-६)
जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे होणाऱ्या वाईट परिणामांचा विचार करा (नीत २३:२९, ३०, ३३-३५; टेहळणी बुरूज२३.१२ १४ ¶४)
दारू कितीही चांगली दिसत असली, तरी फसू नका (नीत २३:३१, ३२)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत २३:२१—लठ्ठ असण्यात आणि खादाड असण्यात काय फरक आहे? (टेहळणी बुरूज०४ ११/१ ३१ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २३:१-२४ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
६. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) वाईट सवय सोडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ४)
गीत ३५
७. एखाद्या कार्यक्रमात किंवा सोहळ्यात मद्य ठेवावं का?
(८ मि.) चर्चा.
लग्न सोहळा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये मद्य ठेवावं का? हा एक वैयक्तिक निर्णय आहे. असं असलं तरी, हा निर्णय आपण बायबलच्या तत्त्वांचा आणि इतर गोष्टींचा विचार करून घेतला पाहिजे.
लग्नाच्या जेवणात मद्य ठेवावं का? हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
खाली दिलेल्या बायबल तत्त्वांमुळे कार्यक्रमात मद्य ठेवावं की नाही हे ठरवताना आपल्याला कशी मदत होईल?
योह २:९—येशूने एका लग्नाच्या मेजवानीत पाण्याचा द्राक्षारस केला.
१कर ६:१०—“दारुडे . . . देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.”
१कर १०:३१, ३२—“तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सगळं देवाच्या गौरवासाठी करा. . . . [इतरांसाठी] अडखळण बनू नका.”
तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?
चांगले निर्णय घेता यावेत म्हणून, वेगवेगळी बायबल तत्त्वं समजून घ्यायला आपण ‘विचारशक्तीचा’ वापर का केला पाहिजे?—रोम १२:१; उप ७:१६-१८
८. मंडळीच्या गरजा
(७ मि.)
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ २, भाग २ प्रस्तावना आणि पाठ ३